Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी सैन्य दलात औषध साठ्याची आवश्यकता असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा. सुदर्शन भवन, चाळीसगाव) यांना ६ लाख ७ हजार ७०० रुपयात ऑनलाइन गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, सुनील चौधरी यांना २३ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने मोबाइलवरून संपर्क साधला. मी चाळीसगाव ग्रेस अकॅडमी मिलिटरी डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून आमच्या डिपार्टमेंटला औषधांची आवश्यकता आहे, त्यानुसार तुम्ही औषधी पाठवा, असे सांगितले. औषधांची यादी मिळाल्यावर संशयिताने ‘फोन पे’वरून दहा रुपये पाठविण्यास सांगितले. चौधरी यांनी दहा रुपये पाठविल्यावर ठगाने त्यांना २० रुपये पाठविले. त्यानंतर सुनील चौधरी यांचा…

Read More

मेष राशी आज कामावर सहकारी विनाकारण तुमच्याशी भांडू शकतात. त्यात अडकण्याऐवजी सुटकेचा मार्ग शोधावा लागेल. यासाठी स्वतःला आधीच तयार करा. व्यवसायात खूप मेहनत करावी लागेल. बेरोजगार होण्याची शक्यता आहे. नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. राजकारणात विरोधक अधिक सक्रिय होतील. वृषभ राशी आज तुम्हाला नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल. क्रीडा जगताशी संबंधित लोकांना उच्च यश मिळेल. तुमची कार्यशैली कामाच्या ठिकाणी चर्चेचा विषय बनू शकते. राजकारणातील महत्त्वाच्या मोहिमेची कमान तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात नवीन मित्र बनू शकतात. मिथुन राशी आज तुम्हाला नोकरीच्या मुलाखती किंवा परीक्षेत यश मिळेल. नोकरी मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. व्यवसाय वाढवण्याच्या योजनांना प्रियजनांकडून मान्यता मिळेल. नोकरदार वर्गाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असणाऱ्या जळगाव आणि चाळीसगाव येथील दोन रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून या दोन्ही गुन्हेगारांची कोल्हापूर आणि नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा गुरुजीत सिंग सुजान सिंग बावरी व 24 राहणार सद्गुरु नगर सिरसोली नाका तांबापुरा याच्या विरुद्ध 11 गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी बावरी याच्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता त्यानुसार 29 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक शरद…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्‍यात आल्‍याचा प्रकार शिकोगोजवळील गॅस स्‍टेशनजवळ घडला. साई तेजा नुकारापू (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा तेलंगणा राज्‍यातील खम्‍मम जिल्‍ह्यातील आहे. बीआरएसचे आमदार मधुसुदन थाथा यांनी अमेरिकेतून मिळालेल्‍या प्राथमिक माहितीचा हवाल देत सांगितले की, साई तेजा नुकारापू याने बीबीए पदवी घेतली आहे. तो अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेत होता. तसेच तो अर्धवेळ एका गॅस स्‍टेशनवर नोकरी करत होता. शनिवारी पहाटे तो ड्युटीवर नव्हता परंतु स्‍टेशनवरील मित्राला मदत करत होता. मित्र काही कामानिमित्त गॅस स्‍टेशनमधून बाहेर गेाहोता. तेव्‍हा गॅस स्टेशनवर आलेल्‍या हल्लेखोरांनी केलेल्‍या गोळीबारात साई तेज याचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती…

Read More

जळगाव : प्रातिनिधी विधानसभा निवडणुकीची धामधूम पार पडतात सर्व लोकप्रतिनिधी आपआपल्या कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच लग्नकार्य, अंत्यविधी, द्वारदर्शन आदींच्या माध्यमातून मतदारसंघात पूर्वीप्रमाणे गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राजकारणात लोकसंपर्काला सर्वाधिक महत्त्व असते. यात लग्नकार्य, वास्तुशांती, अंत्यविधीपासून अन्य कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना हजेरी लावे लागते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांशी संपर्क ठेवणाऱ्या उमेदवारांच्या पारड्यात भरभरून मते पडली, असा काहीसा अनुभव सर्व दिसून आला. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे जेष्ठ चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनीही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणल्याने अनेक बहिणींचा फायदा झाला आहे तर लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 1500 वरून 2100 रूपये करण्याचा अंजेडा असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या नेत्याने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे महायुती सरकारकडूनही शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याची हालचाली सुरु करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत चंद्रभान तोताराम सोनवणे (रा.आमोदा) दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील किनोद-भोकर रस्त्यावर घडली. याप्रकरणी गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात डंपरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चंद्रभान सोनवणे हे त्यांच्या दुचाकीने किनोद-भोकर या रस्त्याने दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने (क्र. एमएच १९ झेड १६४२) जोरदार धडक दिली. या धडकेत चंद्रभान हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

Read More

धरणगाव : प्रतिनिधी हिवाळ्यात अनेक जण सुकामेव्याचे व गावरान तुपाचे लाडू खाणे पसंत करतात. ग्रामीण भागात अनेक फिरत्या विक्रेत्यांकडून गावरान तुपाच्या नावाखाली बनवत भेसळयुक्त तुपाची विक्री होऊन नागरिकांची फसवणूक होत आहे. रवा व वनस्पती तुपाची भेसळ करून बनावट गावरान तुपाची विक्री होते. या तुपामुळे मात्र नागरिकांच्या आरोग्यास धोका असून या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लाडू बनविण्यासाठी गावरान तुपाचा वापर करावा असा अनेकांचा प्रयत्न असतो, मात्र त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी नसते याचाच फायदा फेरीवाले उचलतात. गावरान तूपविक्री करणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये खास करून महिलांचा समावेश असतो. अनेक दुकानांवर गावरान तूप मिळते. मात्र या तुपाच्या दर्जाची तपासणी अन्न व प्रशासन विभागामार्फत होत…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिनावल शिवारातील वडगाव रस्त्यावरील सुकी नदीच्या पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारींची दखल घेत तहसीलदार बंडू कापसे यांनी तीन तलाठींसह शुक्रवारी पहाटे चार वाजता या ठिकाणी धाड टाकली. यावेळी त्यांनी आलेल्शा शाहरूख शेख सगीर (रा. चिनावल, ता. रावेर) यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. चिनावल शिवारातून ट्रॅक्टरवर बसून तहसील कार्यालयापर्यंत तहसीलदार बंडू कापसे यांनी हे ट्रॅक्टर आणले व जप्त केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच सुकी नदीपात्रात ही करवाई केली. यावेळी तहसीलदार कापसे व तलाठी स्वप्नील परदेशी आणि गुणवंत बारेला (रावेर सजा) तथा गोपाळ भगत (खानापूर सजा) यांच्यासह दोन मोटारसायकलवर कडाक्याच्या थंडीत वडगाव मार्गे चिनावल…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील घोडसगाव येथे मुलीच्या भेटीसाठी आलेल्या पित्याला पूर्णाड फाट्याजवळील हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने धडक दिली. यात या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मयताचे नाव विकास रघुनाथ इंगळे (वय ५३) असे आहे. ते वाघाडी ता. रावेर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विकास इंगळे हे मुलीला भेटण्यासाठी घोडसगाव येथे आले होते. दरम्यान, सायंकाळी गावात फिरून येतो, असे सांगून घरातून निघून गेले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुलीचे नातेवाईक आकाश भालेराव यांनी तिचे पती सागर वानखेडे यांना फोन करून सांगितले की, अज्ञात वाहनाच्या धडकेत तुमचे सासरे जागीच ठार झाले आहे. त्यानुसार मुलगी…

Read More