जळगाव : प्रतिनिधी सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून, मंगळवारी (२६ नोव्हेंबर) सोने भावात एक हजार ४०० रुपयांची घसरण होऊन ते १० ग्रॅमसाठी ७६ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ८९ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी भावात मोठी घसरण झाली. दोन दिवसांत मिळून सोने व चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू २,७०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. सोमवारी, २५ रोजी सोने एक हजार ३०० रुपयांनी तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांची घसरण झाली होती. ऑक्टोबर महिन्यापासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर मात्र दोन आठवड्यांपासून भाव कमी-कमी होत गेले. चांदी आता…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील संजय नानसिंग पावरा (२३) याने चारित्र्याच्या संशयावरून संतापाच्या भरात स्वतःच्या दोन चिमुकल्यांना कुन्हाडीने वार करून ठार केले; सुदैवाने १९ वर्षीय पत्नी बचावली पण ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मध्य प्रदेशात शनिवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गौऱ्यापाडा येथे हे दाम्पत्य पाच वर्षांचा मुलगा डेव्हिड आणि तीन वर्षाची मुलगी डिंपल यांच्यासह राहत होते. आरोपीचे पत्नीसोबत १८ नोव्हेंबरला जोरदार भांडण झाले. त्यामुळे पत्नी मुलीसह मध्यप्रदेशच्या सीमेवरील तिच्या आत्याच्या गावी रांजणगाव येथे निघून गेली. संजयच्या आई-वडिलांनी तेथे जाऊन भांडण केले. त्यानंतर नातेवाईक तिला माहेरी देवली येथे घेऊन गेले. त्यानंतर पती मुलाला घेऊन देवलीत दाखल झाला. यावेळी पत्नीसोबत…
मेष राशी तुमचा आजचा दिवस अत्यंत चांगला जाणार आहे. तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी स्त्रोत वाढवाल. त्यातून चांगली मिळकत होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्येतून मुक्ती मिळेल. गावाला जाण्याचा योग आहे. कोर्टकचेरीच्या कामातून मोठा दिलासा मिळेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी उत्साही रहाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व कौशल्यांमुळे तुम्ही चमकाल आणि तुमच्या सहकार्यांना प्रेरणा देऊ शकाल. तुमच्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने तुम्ही सहजपणे तुमचे उद्दिष्ट साध्य करू शकता. कला, लेखन किंवा संगीत यांसारख्या क्रियाकलापांद्वारे आनंद मिळेल. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवून आनंद मिळेल आणि नवीन संबंध स्थापित होतील. वृषभ राशी जीवनातील लहान लहान घटनांचा आनंद घ्या. आज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवून सकारात्मक ऊर्जा मिळेल.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. यंदा महायुतीला जनतेने एकहाती सत्ता दिली असून आता मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी राज्य विधानसभेची मुदत संपते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पदाचा आणि ओघानेच सरकारचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर करावा लागेल. त्याचवेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्यास सांगू शकतात. राजभवनावरील ही औपचारिकता मंगळवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी मुंबईत येत असून, तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होऊ शकते. अमित शहा, राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील फत्तेपूर येथील राज्य मार्ग क्र. ४४ वर झालेल्या भीषण अपघातामध्ये फत्तेपूर येथून मादणीला निघालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मादणी येथील रहिवासी लालखा उखडू तडवी (वय ४५) हे फत्तेपूर येथून सायंकाळच्या सुमारास मादणीकडे निघाले होते. दरम्यान, शे. मुनीर कुरेशी यांच्या शेताजवळ अज्ञान वाहनाने त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स.पो.नि. गणेश फड, पो.उ.नि. आर. के. शेख व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जळगाव : प्रतिनिधी घरात कोणी नसल्याची संधी साधत २६ हजार रुपये चोरताना सोनी पवार (२४, रा. शिवशक्ती नगर) या मोलकरणीला घरमालक महिलेने रंगेहाथ पकडले. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात अॅड. अंजली भुसारी यांचे निवासस्थान असून २३ रोजी त्यांचे पती अॅड. केदार भुसारी हे मालेगाव येथे गेले होते. त्या वेळी अॅड. अंजली व त्यांच्याकडे काम करणारी सोनी पवार या घरी होत्या. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या अॅड. अंजली घरात परत आल्या तर मोलकरणीने कपाटातून २६ हजार रुपये काढून व कपाट पुन्हा लावत असल्याचे दिसले. तिला रंगेहाथ पकडून शहर पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी मोलकरणीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात…
जळगाव : प्रतिनिधी गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून फूल भांडारमध्ये काम करणारे फरदीन खान सादिक खान (२७, रा. दूध फेडरेशन परिसर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोलाणी मार्केटमध्ये एका फूल भांडारमध्ये फरदीन खान सादिक खान हे काम करतात. सोमवारी दुपारी ते मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर असताना पाय सरकल्याने त्यांचा तोल गेला. त्यांनी आधारासाठी तेथे सुरक्षिततेसाठी लावलेल्या रेलिंगला (लोखंडी पाइप) पकडले, मात्र ते गंजून खराब झालेले असल्याने तुटले व फरदीन हे तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, हातापायालाही मार लागला आहे. परिसरातील नागरिकांनी…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे विकास आत्माराम चौधरी (३४, रा. गारखेडा बु, ता. जामनेर) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रेमंड चौकाच्या पुढे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेले विकास चौधरी हे जळगावात एका हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी रात्री ते पायी जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला. काही जणांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी मयताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. खिशात आढळलेल्या कागदपत्रांवरून जामनेर तालुक्यातील विकास…
जळगाव : प्रतिनिधी आईवडील रुग्णालयात तपासणीसाठी तर आजी शेजाऱ्यांकडे गेलेली असताना घरी एकटा असलेल्या ओम ऊर्फ साई पंडित चव्हाण (१५, रा. गणेश कॉलनी) या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता समोर आली. आईवडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या विद्यार्थ्याने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेटचा व्यवसाय असलेले पंडित चव्हाण हे पत्नी, आई, एक मुलगा व एका मुलीसह गणेश कॉलनी परिसरात राहतात. सोमवारी दुपारी ते पत्नीसह खासगी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा ओम हा घरी अभ्यास करीत…
यावल : प्रतिनिधी शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आयेशा नगरात घरफोडीची घटना घडली. घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत कपाटातील सोने व चांदीचे दागिने, रोख रक्कम असा १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार गुरुवारी रात्री निर्दशनास आला. याप्रकरणी शुक्रवारी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयेशा नगरात सैय्यद साबीर सैय्यद मरू हे केळी व्यापारी राहतात. ते सहकुटुंब गुजरात राज्यातील सुरत येथे लग्न समारंभास गेले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांच्या शेजाऱ्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील कपाट फोडलेले दिसले. तेव्हा तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी हवालदार सांगळे, मोहन…

