Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचा सरकार स्थापन करण्याचा तिढा अजून सुटला नसून भाजपने सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त काढला आहे. पण महायुतीला या सरकारचे नेतृत्व कोण करणार? याविषयीची उत्कंठा अद्याप संपली नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज तातडीने दिल्लीला जाणार आहेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या नाराजीकडे कानाडोळा करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. त्यानंतर 23 तारखेला निकाल लागला. त्यात सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा दारुण पराभव…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते, तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालायला हवीत, हे महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते. नागपुरातील कठाळे परिवाराच्या सामाजिक कार्याला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त कठाळे कुल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी लोकसंख्याबाबत चिंता व्यक्त केली. लोकसंख्येतील घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यासह जालन्याच्या ‎‎वातावरणात दोन दिवसांपासून‎कमालीचा बदल झाला असून या ‎‎आठवड्यात ३, ४ आणि ७ डिसेंबर‎ रोजी पावसाचा अंदाज हवामान‎खात्याने वर्तवला आहे. हा पाऊस ‎‎रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर ठरू ‎‎शकतो, तर द्राक्षबागांसाठी मात्र ‎‎नुकसानकारक ठरणार आहे.‎ या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‎‎हिवाळ्यातील थंडीला सुरुवात‎झाली. सुरुवातीपासूनच हवेतील‎गारवा वाढत किमान तापमानात‎हळूहळू घट झाली. नोव्हेंबर‎महिन्याच्या तुलनेत तापमानाचा पारा‎पाच ते सात अंशाने घसरला.‎नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ‎‎तापमान कमालीचे घटल्याचे‎पाहायला मिळाले. शिवाय माेठ्या ‎‎प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने ‎‎त्याचाही परिणाम दिसून आला.‎यामुळे जिल्ह्यातील जमिनीच्या ‎‎पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. ‎‎परतीच्या पावसाने मागील‎आठवड्यात ब्रेक लावल्यानंतर‎थंडीला सुरुवात झाली. नोव्हेंबर‎महिन्यात थंडी कमालीची वाढली.‎पुढील कालावधीत कमालीचा‎ चढउतार नोव्हेंबर महिन्यात पाहायला‎ मिळाला,…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी बॅनर फाडून दुकानदारावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पाचोरा शहरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ रोजी मध्यरात्री २च्या सुमारास शहरातील भुयारी मार्गालगत असलेल्या दुकानाजवळील बॅनर फाडले. त्याबाबत दुकानदार भावेश संजय पडोळ याच्याशी सूरज राजू पवार (३०, पाचोरा) व कुणाल मोरे (२९, मिलिंदनगर, पाचोरा) यांनी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच धारदार शस्त्राने पाठीवर, कानाजवळ मारहाण करीत गंभीर जखमी केले. यावरून जखमी भावेश पडोळ यांचे वडील संजय पडोळ यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शेताच्या वादावरून पोलिसाला सख्खा भाऊ आणि पुतण्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता जानवे येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदास अर्जुन पाटील (५२, जानवे) (मुंबई पोलिस) हे ३० रोजी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत रोटा मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले असता त्यांचा भाऊ ट्रॅक्टर पुढे येऊन शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच त्याने हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने गुरुदास यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. पुतण्या कल्पेश चंद्रकांत पाटील यानेदेखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी भांडण आवरले. तेव्हा चंद्रकांत पाटील याने ठार मारण्याची धमकी दिली. दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यावर गुरुदास यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चंद्रकांत पाटील व कल्पेश यांच्याविरुद्ध…

Read More

जळगाव : प्रातिनिधी एका खासगी बँकेतील धनादेश पेटीतून (चेक ड्रॉप बॉक्स) धनादेश चोरून, त्यावर रासायनिक प्रक्रियाद्वारे स्वतःचे नाव टाकून ते धनादेश राज्यातील इतर बैंक खात्यामधून वटवून २ लाख ५८ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे विसनजी नगरातील बैंक ऑफ बडोदा येथे ग्राहकांच्या सुविधेसाठी धनादेश पेटी (चेक ड्रॉप बॉक्स) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेकडून दिवसातून तीन वेळा या पेटीत असलेले धनादेश काढून त्यावर पुढील कार्यवाही केली जाते. ४ ते ७ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या बँकेत काही ग्राहकांनी लेखी तक्रार देत त्यांच्या खात्यात त्यांनी २२ व २३…

Read More

भडगाव : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांत सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली २५ रोजी मध्यरात्री वाळूचे ३ डंपर व १ ट्रॅक्टर जप्त करून तहसील – कार्यालयात जमा केले आहेत. तसेच २९ रोजी टोणगाव येथील घोडदे परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडले. ३० रोजी रात्री १:३० वाजता पिंपळगाव बुद्रुक गिरणा नदीच्या पात्रातून वाळू वाहून नेत असलेले १ डंपर पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे.

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील मुक्ताईनगर -बऱ्हाणपूर रस्त्यावरील पूर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलिसात पो. हे. कॉ. रवींद्र अभिमान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून साकारउल्ला अब्दुल अजीज (३०, रा. इमाम नगर, हरयाणा) व कैफ फारुख खान (१९, रा, ढळायत राजस्थान), तारीफ लूकमान खान (२३, रा. इमाम नगर, हरयाणा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी बऱ्हाणपूरकडून मुक्ताईनगरकडे माल ट्रकमधून (एन.एल. ०१/ एजे १७२५) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील महामार्गावर नवोदय उड्डाणपुलाच्या खाली भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महामार्ग ओलांडणाऱ्या अज्ञात व्यक्तीला जोरदार धडक दिली. यात हा अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या व्यक्तीला महामार्ग रुग्णवाहिकेद्वारे जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल वाल्मिक सोनवणे व जगदीश भोई घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अज्ञात वाहन व व्यक्तीचा रात्री उशिरापर्यंत तपास लागू शकला नाही. जखमी व्यक्तीच्या अंगात लाल रंगाचा टी-शर्ट होता. ही धडक वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने दिल्याची चर्चा परिसरात होती. अवैध वाळू वाहतुक करणारी वाहने वेगाने धावतात. याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : ‘पलको से खुली कल्पनाए’ केवळ शब्दांची जुळणी नाही तर आयुष्यातील विविध भावनांचा खोलपणा दाखवणारा संग्रह आहे. युवा कवयित्रीने अल्पवयात जीवनाचे सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले. शहरातील युवा कवयित्री पलक भूषण झंवर हिच्या ‘पलकोसे खुली कल्पनाए’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रियपल भूमी या फार्म हाऊसवर उद्योजक अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अवघ्या १५ वर्षाच्या वयात पुस्तक लेखन पलकने केले आहे. प्रसंगी मंचावर कबचौ कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, किड्स गुरुकुल इंटरनॅशनलच्या प्राचार्य डॉ.…

Read More