जळगाव : प्रतिनिधी नंदुरबारहून जळगावला येत असलेल्या दोन मित्रांना जळगाव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम विजय वाघेला (वय २३, अहमदाबाद) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. समर्थ रघुवंशी (वय २२,रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाला आहे. स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन भावसार व रवींद्र पाटील यांनी अपघातातील दोघांना जीएमसीत दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी ओम वाघेला याला मृत घोषित केले. दोन्ही मित्र…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार आहेत, याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेणार आहेत. तसेच याबाबत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय आधीच मान्य असणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचा कोणत्याही नाराजीचा प्रश्न येतच नाही. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. रविवारी पाळधी येथील निवासस्थानी गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. ‘महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून आपल्या गावी शेतात राहण्यासाठी गेले,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला गुलाबराव पाटील…
मेष राशी आज नोकरीत अधिकाऱ्यासोबत विनाकारण मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. जमिनीशी संबंधित कामांच्या संदर्भात काळजी घ्या. व्यवसायात खूप मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन अस्वस्थ राहील. पण, कालांतरानं बदल होतात. आज आरोग्यात चढ-उतार होतील. मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वृषभ राशी आज संगीत, कला, नृत्य, अभिनय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळेल. राजकारणातील तुमची कार्यशैली चर्चेचा विषय ठरेल. नवीन उद्योगाची योजना यशस्वी होईल. आज मुलांच्या आनंदात वाढ होईल. एखाद्या मित्राची भेट होईल. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. नवे सहकारी तयार होतील. संयमाने आणि निष्ठेने काम करा. एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून आता महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख निश्चित झाली आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होणार आहे. महायुती सरकारमध्ये मंत्रिपदांच्या वाटपाबाबत अडचण आहे. शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्याऐवजी गृहमंत्रालयावर ठाम आहेत. 29 नोव्हेंबर रोजी ते अचानक सातारा येथील त्यांच्या वडिलोपार्जित गावी गेल्याने त्यांची नाराजी स्पष्ट दिसून आली. त्यांची प्रकृती खालावली. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. आज दुपारी ते मुंबईला परतणार आहेत. दुसरीकडे, 3 डिसेंबरला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. दिल्लीतून दोन निरीक्षक मुंबईत येणार…
जळगाव : प्रतिनिधी दुचाकीवरून मुलांना इकरा कॉलेज येथे घेऊन जात असलेल्या शेख अकबर शेख अब्बास (वय ३३, रा. अक्सा नगर) यांना चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या अजिज बाबा मुलतानी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली. मुलतानी याने शुक्रवारी शेख अकबर यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत दोन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार अक्सा नगरात घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही एक कारण नसताना अजिज याने चाकू भिरकावून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपनिरीक्षक संजय पाटील यांनी मुलतानी याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात…
जळगाव : प्रतिनिधी मेडिकलचा व्यवसाय नीरज करणारा प्रभाकर चव्हाण (वय २७, रा. चहार्डी, ता. चोपडा ह.मु. भुसावळ) हा तरुण शुक्रवारी रात्री आठ वाजेनंतर जळगाव शहरातून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला असून, त्याची दुचाकी व मोबाइल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मिळून आले आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून व्यवसायाशी संबंधित दोघांसह दुचाकीसोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा हमाल अशा तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज चव्हाण व त्याचे दोन मित्र अशा तिघांनी भुसावळ येथे मेडिकलचा व्यवसाय सुरू केला. नेरी नाका परिसरात एका एजन्सीशी त्यांचा दैनंदिन संबंध असल्याने त्यांचे तेथे येणे जाणे होते. काही दिवसांपासून व्यवसायातून तिघांमध्ये धुसफुस सुरू झाल्याने…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील बोदवड रस्ता ते प्रवर्तन चौकच्या दरम्यान राजस्थानी मार्बलजवळ चारचाकीच्या धडकेत मोटारसायकलवरील नगरपंचायत कर्मचारी ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कर्मचाऱ्याचे नाव मयूर रवींद्र महाजन असे आहे. मयूर महाजन व अतुल वराडे दोघे मोटारसायकलने (एम.एच.१९ ए. एल. ५३४३) जात असताना बोदवड रस्त्यावरील राजस्थानी मार्बल ते साई वॉशिंग सेंटरच्या दरम्यान चारचाकीने क्रमांक (एम.एच. २० सी एच झिरो ५४६) जोरदार धडक दिली. या अपघातात नगरपंचायतचे कर्मचारी मयूर रवींद्र महाजन (३३) यांचा मृत्यू झाला, तर अतुल एकनाथ वराडे (३०) गंभीर जखमी झाले आहेत, अतुल वराडे हेही सिंचन विभागात मुक्ताईनगर येथे कर्मचारी म्हणून कार्यरत…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अट्रावल येथील शेतकऱ्याच्या राजोरा रस्त्यावरील शेतात अज्ञात माथेफिरूने कोयत्याने कापणी योग्य सुमारे १ हजार ८०० केळीची खोडं कापून फेकली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे तब्बल ५ लाख ९४ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षांत अट्रावल गावातील ही चौथी घटना आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी यावल पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अट्रावल, ता. यावल या गावातील शेतकरी मयूर सुरेश वारके यांनी आपल्या अट्रावल शिवारातील राजोरा रस्त्यावर असलेल्या शेतात ४ हजार ८०० केळी खोडं लागवड केली आहे. केळी कापणी योग्य झाली आहे. त्यातील २३० खोड केळी कापणी…
यावल : प्रतिनिधी किनगाव-यावल रस्त्यावर दुचाकी चालकास अडवून दहा हजारांची रोकड व मोबाइल दोन अज्ञात चोरट्यांनी लांबविले होते. ही घटना १६ रोजी घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता २ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भालशिव-पिंप्री ता. यावल येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व शिवलाल भगवान सपकाळे हे चोपडा येथून १६ नोंव्हेंबर रोजी रात्री यावलकडे येत होते. दरम्यान किनगावजवळ त्यांची दुचाकी अडवून हत्याराचा धाक दाखवून धमकी देत मोबाइल व १० हजारांची रोकड लांबवली होती. पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे परमेश्वर जाधव यांनी तपास चक्रे फिरवित संशयित फरहान…
पाचोरा : प्रतिनिधी बंद घराचे कुलूप तोडून घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करीत ४ लाखांची रोकड व दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दहीगाव संत येथे घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दहिगाव संत येथील प्रताप बाबूलाल पाटील ( वय ५२) यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे. दि. २८ रोजी ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता दि. २९ च्या मध्यरात्री गल्लीतील रमेश गुलाबसिंग पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची चर्चा सुरू होती. प्रताप पाटील यांचा पुतण्या सचिन याने काका प्रताप पाटील यांच्या घरी जाऊन पाहिले…

