मुंबई : वृत्तसंस्था अखेर राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून उद्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी ट्रॅक्टर ट्रॉलीचा तुटलेला एक्सल दुरुस्तीसाठी लावलेला जॅक निसटल्यामुळे सोमनाथ गोरख कोळी ( २०, रा. भातखेडा, ता. एरंडोल) या मॅकेनिक सोबत आलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोरनार गावात घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरनार येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा एक्सल दुरुस्तीसाठी भातखेडा येथून मॅकेनिक दुरुस्तीसाठी आले. ट्रॉलीला जॅक लावून काम सुरु असताना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक नेसटल्यामुळे सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेला. ग्रामस्थांनी जखमीला बाहेर काढले. एमआयडीसी पोलिसांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
जळगाव : प्रतिनिधी सीएसआर फंड प्राप्त करून शेततळ्याचे कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अजय भागवत बढे यांची ४५ लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी तापी पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व अन्य सात जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात तक्रारदार अजय बढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून शेततळ्याच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यापूर्वी निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेततळ्याचे काम मिळवून देतो असे सांगून ४५ लाख रुपयांत फसवणूक केली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय बढे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक…
जळगाव : प्रतिनिधी काचेची बाटली फेकून का मारली असा जाब विचारल्याच्या कारणावरून आदित्य दीपक हातागडे (१६, रा. जुने बी. जे. मार्केटच्या बाजूला) या मुलाला तीन जणांनी लोखंडी वस्तू पोटावर मारून गंभीर दुखापत केली. ही घटना १ डिसेंबर रोजी जुने बी. जे. मार्केटच्या बाजूला कोंडवाडा परिसरात घडली. याप्रकरणी २ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडवाडा परिसरात राहणारा आदित्य हातागडे याला एका जणाने काचेची बाटली फेकून मारली. त्याने जाब विचारला असता तीन जणांनी शिवीगाळ, मारहाण करत लोखंडी वस्तू पोटात मारून दुखापत केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : प्रतिनिधी गिरणा पंपिंग प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप जेसीबीद्वारे काढून नेताना दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. हा धक्कादायक प्रकार २ डिसेंबर रोजी गिरणा पंपिंग रस्त्यावर आर्यन पार्कसमोर भरदिवसा सुरू होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आले असून त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. गिरणा पंपिंग प्लांटवरून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या ही योजना बंद आहे. गिरणा पंपिंग रस्त्यावर जेसीबीद्वारे चारी खोदून बीडाचे पाइप काढण्यात येत असल्याची माहिती ठेकेदार सुमीत सोनवणे यांनी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांना दिली. बोरोले यांनी पंप अटेंडंट…
जळगाव : प्रतिनिधी विना परवानगी बॅनर लावून शहर विद्रूप केले म्हणून महापालिकेने सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून ६८ बॅनर काढून जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेने २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली, त्यात ही कारवाई करण्यात आली. विधानसभा निवडणूक लागू होताच शहरातून राजकीय पक्षांचे बॅनर्स, झेंडे व होर्डिंग्ज हटविण्यात आले होते. निवडणुकीची आचारसंहिता संपताच अनधिकृत बॅनर मोठ्या प्रमाणात लागले होते. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अतिक्रमण निर्मूलन पथक व किरकोळ वसुली विभागाला संयुक्त मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारही प्रभागांत २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील माळेगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगाय ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. २) रात्री घडली. बोदवड मुक्ताईनगर हा रहदारीचा रस्ता ओलांडताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी ८ ते साडेआठच्या दरम्यान माळेगाव वनविभागातील वनपाल व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता घटना स्थळावर दोन ते तीन वर्षे वयाची निलगाय मृतावस्थेत आढळून आली. निलगायचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. घटनास्थळावर पंचनामा करून मृत निलगायचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर माळेगाव वनविभाग हद्दीत निलगायचा दफन विधी करण्यात आला, अशी माहिती माळेगाव वनविभागाचे…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील एक विवाहिता घरात असताना एका तरुणाने घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी मंगळवारी यावल पोलिस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या फिर्यादीवरून रवींद्र कोळी याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.
बोदवड : प्रतिनिधी दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने चार वर्षाच्या बालकासह ३० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शेलवड घाटी फाट्याजवळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड पासून आठ किमी अंतरावर शेलवड घाटी फाट्याजवळ विना क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनांची धडक बसली. या अपघातात दुचाकीने जामनेरकडे जात असलेला तीस वर्षीय तरुण व त्याच्या सोबत असलेला चार वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. काही वेळ ते जागेवरच पडून होते. काही वेळाने त्या रस्त्याने जाणाऱ्या काही वाहनधारकांनी त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता दोघांना जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती. परंतु ते दोन्ही जामनेर तालुक्यातील…
भुसावळ : प्रतिनिधी धावत्या रेल्वेतून प्रवासी महिलेची २५ ग्रॅम सोन्याची साखळी जबरीने चोरून नेल्याप्रकरणी आरोपी राजकुमार उर्फ साधू कडू दौडे (३२, रा. नेपानगर) यास भुसावळ रेल्वे न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ३ रोजी सुनावली. ११ मे २०१९ रोजी अन्नू सुरेंद्र हरजानी या हबीबगंज एक्स्प्रेस भोपाळ ते मुंबई असा आरक्षित डब्यातून प्रवास करीत असताना भुसावळ रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटल्यावर १:०० वाजेच्या सुमारास आरोपीने आऊटरजवळ फिर्यादी महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने ओढून पलायन केले होते. त्यावरून या महिलेने रेल्वे पोलिसात फिर्याद दिली होती. रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून भुसावळ रेल्वे न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.…

