मेष राशी महत्त्वाची कामे होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. धर्म आणि श्रद्धा यामुळे कामाला चालना मिळेल. कोणतीही भीती आणि भीती न बाळगता पुढे जाईल. धैर्याने संपर्क चांगला होईल. तुम्हाला सर्वत्र यश मिळेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. प्रवास होईल. धनप्राप्तीच्या संधी वाढतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जीवनात प्रेम आणि प्रणय वाढेल. ज्यांना संतती हवी आहे त्यांना संततीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. वृषभ राशी तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. राजकारणात विरोधक अधिक सक्रिय होतील. स्वतःला आगाऊ तयार करा. व्यवसायात खूप मेहनत करावी लागेल. आरोग्य सामान्य राहील. अनपेक्षित नफा किंवा तोटा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद घालू नका आणि निष्काळजी व्हा. कुटुंबातील सदस्यांचे…
Author: editor desk
भडगाव : प्रतिनिधी गुढे येथील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या जामदा कालव्यावरील पुलाचे काम अपूर्ण असून, या ठिकाणी मका घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली सोमवारी उलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. गुढे येथील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या जामदा डाव्या कालव्यावरील हा पूल १० ते १२ महिन्यांपासून पाडण्यात आला आहे. नवीन पुलाचे बांधकाम चाळीसगाव सा. बां. विभागाच्या देखरेखीखाली सुरू झाले असून, हे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे गुढे परिसरातील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता खेडगाव, ता. चाळीसगाव येथील शत्रुघ्न पिंजारी यांच्या शेतातील मका काढून वजन करण्यासाठी खेडगाववरून तीन ट्रॅक्टर बहाळ येथे घेऊन जात…
पारोळा : प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यप्रदेश येथील रहिवासी व सध्या शेतमजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या शेतमजुरास लक्झरीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलिसात टंटिया पटेल यांनी फिर्याद दिली आहे. कुटुंबाच्या उदारनिर्वाह करण्यासाठी हे सारेजण मध्यप्रदेश येथून मजुरी कामासाठी म्हसवे येथे आले आहेत. शहरात बाजार करण्यासाठी धरमसिंग धनसिंग पटेल (३५) हे गेले होते. दरम्यान, शहरातून आपल्या झोपडीकडे परत पायी येत असताना पारोळ्याकडून जळगावकडे जाणारी लक्झरी (एमएच४३/एच८१९९) ने धरमसिंग पटेल यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांना जोरदार दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलिसात लक्झरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
जळगाव : प्रतिनिधी दुचाकीने कंपनीमध्ये कामावर जात असलेल्या यादव तात्या हटकर (३६, रा. तांबापुरा) यांना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे ते जखमी झाले. हा अपघात ११ नोव्हेंबर रोजी खोटेनगर थांब्याजवळ झाला. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकी चालकाविरुद्ध १ डिसेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यादव हटकर हे दुचाकीने (क्र. एमएच १९, एए ४३७७) कंपनीमध्ये कामावर जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमएच १९, डीझेड ६११३) हटकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या दोन्ही हाता-पायाला दुखापत होण्यासह दुचाकीचे नुकसान झाले. उपचार घेतल्यानंतर हटकर यांनी १ डिसेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या…
जळगाव : प्रतिनिधी घराचा हिस्सा देण्यावरून वाद होऊन चार जणांनी आरूस्तुलबी मासूम पिंजारी (८०, रा. कोळगाव, ता. भडगाव) यांच्यासह दोघांना मारहाण केली तसेच चाकूनेही दुखापत केली. ही घटना १ डिसेंबरला टागोरनगरात घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंजारी कुटुंबीयांचे जळगावात टागोरनगरमध्ये घर आहे. या घराचा हिस्सा देण्यावरून वाद झाला. तो वाढत जाऊन आरुस्तुलबी पिंजारी यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच इतर दोन जणांना चाकूने दुखापत करण्यात आली. याप्रकरणी आरुस्तुलबी पिंजारी यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील लाडक्या बहिणींनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस यश दिले आहे. आता लाडक्या बहिणींना दीड हजार मिळणार की २१०० रुपये याची उत्सुकता लागली आहे. सरकार येताच आम्ही २१०० रुपये देऊ असे आश्वासन या बहिणींना महायुती सरकारने दिले होते. आतापर्यंत दीड हजार प्रमाणे पाच हप्ते मिळालेले आहेत. जळगाव जिल्ह्यात सव्वा पाच लाख लाडक्या बहिणी आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पैसे लागलीच मिळण्याची आशा मावळली आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून, तो खात्यात कधी जमा…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर या प्रकरणी यावल पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून दोन तरुणांना अटक केली आहे. मिळालेली माहितीनुसार, या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाकडून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस नाईक किशोर परदेशी, अनिल पाटील या पथकाने केला. त्यांनी या मुलीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून ताब्यात घेतले व तिच्या कुटुंबाला सोपविले…
पारोळा : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे फाट्याजवळ सोमवारी दुपारी झालेल्या दोन कारच्या भीषण अपघातात सुरत येथील दाम्पत्य ठार झाले. या अपघातात नाशिक येथील चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर देविदास पाटील (४७) आणि ज्योती सुधीर पाटील (४२, रा. सुरत) असे ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ते पुतणीच्या लग्नासाठी सुरत येथून कारने लोणी बुद्रुक (ता. पारोळा) येथे येत होते. अपघातस्थळापासून लोणी बुद्रुक फक्त आठ किलोमीटर अंतरावर होते सुधीर पाटील हे सुरत येथील किराणा मालाचे व्यापारी होते. ४ रोजी पुतणीचा विवाह असल्याने पाटील दाम्पत्य कारने सुरत येथून लोणी बुद्रूक येथे येत होते. वाटेत म्हसवे फाट्याजवळून ते लोणी बुद्रूक गावाकडे वळण…
जळगाव : प्रतिनिधी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने जामनेर तालुक्यातील रांजणी येथील तक्रारदार महिलेसह इतर महिला थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहचल्या. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले असून कारवाई करावी, अन्यथा आंदोलनास बसण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात संगीता दिलीप मगरे (मु. पो. राजणी, ता. जामनेर) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी राजणी गावात कार्यकर्ते बैंड लावून नाचत होते. त्यावेळी एक जणाने गाणे बंद करा, असे म्हणत वाद घालत मारहाण केली. या संदर्भात संगीता मगरे यांनी फत्तेपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कारवाई होत नसल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे…
मेष राशी कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त राहिल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. परिस्थितीनुसार वागावे. तयारीसह पुढे जा. सल्ले आणि सूचनांकडे लक्ष द्या. धोरणात्मक नियमांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वृषभ राशी कामाच्या ठिकाणी अशी काही घटना घडू शकते ज्यामुळे वर्चस्व वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा. यशाची टक्केवारी जास्त असेल. विरोधक शांत राहतील. ध्येय स्पष्ट ठेवा. करिअर आणि व्यवसायासाठी समर्पित व्हा. मिथुन राशी कामात अशांततेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. संयमाने पुढे जात राहा. दक्षता आणि सातत्य ठेवा. सेवा व्यवसायाच्या क्षेत्रात प्रभावशाली राहील. कामात सावध राहाल. मेहनती राहतील. शिस्त वाढेल. व्यावसायिकतेने काम…

