भुसावळ : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह पाच जणांच्या टोळीस जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या आशयाचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. राजू सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी या पाच जणांचा हद्दपार झालेल्यांमध्ये समावेश आहे. सुरुवातीला सात जणांविरुद्ध प्रशासनाने पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार सातपैकी पाच जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी राजू सूर्यवंशीसह ७ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविले होते. त्याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस, बाजारपेठ आणि वरणगाव पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे…
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगर काठोडा येथे बहिणीच्या विवाह सोहळ्याच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना डोंगरकठोरा, ता. यावल येथे रविवारी घडली. यामुळे आनंदाच्या वातावरणात अचानक शोककळा पसरली. यामुळे गावच सुन्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश भगत (वय ३६) असे या तरुणाचे नाव आहे. राकेश यांनी वयाच्या अवघ्या १०-१२व्या वर्षी वडताल (गुजरात) येथे स्वामीनारायण संप्रदायाचा स्वीकार केला होता, रविवार, दि. १७ रोजी बहीण नम्रता हिचे रविवारी लग्न असल्याने राकेश हे डोंगर कठोरा येथे आले होते. स्वामीनारायण मंदिरात ते थांबले होते. रविवार रोजी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राकेश भगत यांच्या निधनामुळे…
नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख यांच्या कपाळाला गंभीर इजा झाल्याची माहिती आहे. नरखेड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून देशमुख हे परत येत असताना चार युवक अचानक गाडीसमोर आले एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. रक्तस्राव झाल्याने त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. जखमेच्या जागेवर सूज आल्याने डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. देशमुख यांचा रक्तदाबही वाढला होता. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरच्या खासगी इस्पितळात दाखल…
मेष राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीच्या संधी मिळतील. काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसकडून लाभ मिळतील. जुन्या प्रकरणात विजय मिळेल. नोकरीत बढतीचे योग येतील. लांबच्या प्रवासाला जाण्याची किंवा परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. हाडांशी संबंधित आजारांना त्रास आणि त्रास होईल. आठवड्याच्या मध्यात आरोग्य चांगले राहील. कोणताही तणाव आणि मानसिक संकट दूर होईल. वृषभ राशी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. सामाजिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रात आपली प्रतिष्ठा सांभाळा. अति लोभाची प्रवृत्ती टाळा. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरीत इच्छित ठिकाणी बदली होईल. परदेश प्रवासाचे योग येतील. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून शुभ कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे आरोग्य चांगले…
चाळीसगाव : प्रतिनिधी भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांक नंबर ०२ असून निशाणी कमळ आहे. म्हणून मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अनुक्रमांक नंबर २ आणि निशाणी कमळ लक्षात ठेवायचं आहे असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मतदारांना केले आहे. मतदानाला अवघे काहीच तास शिल्लक असतानाच उबाठा च्या प्रचार गाडीतुन अपक्ष डमी उमेदवार चव्हाण चे पत्रके वाटप करत असतांना शहरातील सुज्ञ नागरिकांनी या उबाठा च्या गाडीवाल्याला रंगेहाथ पकडले असून चालकाने तशी कबुली देखील दिली आहे की मशाल च्या ऑफिस मधून मला हे डमी उमेदवार चे पत्रके वाटप साठी देण्यात आले आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील सध्या सोशल…
जळगाव (प्रतिनिधी) शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना व महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचारार्थ शहरातून वाहनावरून रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री खा. रक्षा खडसे यांनी, गेल्या दहा वर्षांमध्ये जळगाव शहरांमध्ये विकास कामाची गंगा आणून चांगले दिवस दाखवणारे आ.राजूमामा भोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन जनतेला केले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली. मोठ्या वाहनांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आ.राजूमामा भोळे यांच्यासह महायुतीच्या मान्यवरांनी नागरिकांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले. रॅली शिवतीर्थसमोरील भाजप कार्यालयापासून रेल्वे स्टेशन, टॉवर चौक, दाणा बाजार, पांडे डेअरी चौक, शिरसोली नाका, काव्यरत्नावली…
बोदवड – प्रतिनिधी इतर मतदारसंघात मतदानातून एक आमदार निवडला जाणार आहे परंतु मुक्ताईनगर मतदासंघांत तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला मतदान करून दोन आमदार निवडणार आहात असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी बोदवड येथिल जाहीर सभेत केले तुमच्या मतदानाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारं आहे आणि सरकार आल्या नंतर रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांना विधानपरिषदचे आमदार बनवण्याचे आश्र्वासन पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहेआणि आपण सुद्धा त्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे आग्रह धरणार आहे म्हणून आपले एक एक मत महत्वाचे असुन तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान रूपी आशीर्वाद देण्याची त्यांनी उपस्थितांना विनंती केली मुक्ताईनगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे…
जळगाव | प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महाविकास आघाडीच्या जळगाव शहर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा जोरदार रॅलीद्वारे गाठला. आज दि. १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रचाराची रॅली शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधून काढण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक १९ मधील महिलांनी जयश्री महाजन यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी उघडपणे आपले मत जयश्रीताई महाजन यांनाच देण्याची तयारी व्यक्त केली. “महिला सक्षमीकरणासाठी आणि शहराच्या विकासासाठी आम्हाला विश्वास आहे की जयश्रीताईच योग्य निवड ठरतील,” असे महिलांनी सांगितले. आपल्यावर जनतेचा विश्वास…
जळगाव : जात प्रमाणपत्रासाठी कोळी समाज बांधवांनी जळगाव शहरात तब्बल २० दिवस आमरण उपोषण करून न्याय मागितला होता. त्यावेळी तुमचे आमदार झोपा काढत होते का, असा सवाल उपस्थित करून ‘त्यांना’ यावेळी असे पाडा की ते पुन्हा कधीच उठणार नाही, अशी गर्जना शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली. महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीणमधील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना उद्धव सेनेचे फायर ब्रॅन्ड नेते शरद कोळी यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. पालकमंत्र्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला. ज्याच्याकडे कधीकाळी साधी मोटारसायकल नव्हती, त्याच्याकडे करोडोंची संपत्ती कुठुन आली. जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी निधी आणला…
जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रामदेववाडीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी असंख्य तरूणांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. स्वतः श्री.देवकर यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे हात बळकट करण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढतच आहे. रामदेववाडीचे सरपंच भगवान भीका चव्हाण, उपसरपंच उखा भीमा राठोड, ग्रा.पं.सदस्य उदल चव्हाण, राजेश राठोड, समाजसेवक राजेश चव्हाण यांनीही शेकडो तरूणांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, शिरसोलीचे माजी सरपंच प्रदीप (बापू)…

