Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी कुन्हाड तांडा येथे कापसाला भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हाड तांडा येथील शेतकरी गजानन मदन तवर (वंजारी) (५६) या शेतकऱ्याने आपली तिन्ही मुले परराज्यात ऊसतोडणीसाठी गेली आहेत. पत्नी शेतात गेली होती. सायंकाळच्या वेळेस गळफास घेतला. सायंकाळी पत्नी शेतातून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मयत शेतकऱ्याच्या नावावर दोन ते तीन बिधे शेती होती. यावर्षी शेतात खरीप हंगामाने साथ न दिल्याने तसेच लागवड केलेल्या कापसाचे उत्पन्न अत्यल्प येत आहे. घरात आलेल्या कापसाला भाव न राहिल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिस पाटील संतोष कोळी यांनी पिंपळगाव हरे. पोलिस…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील महिंदळे येथे समाज मन हेलावून टाकणारी घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. त्यात ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर २७ वर्षीय नराधमाने अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु वृद्धा यातून बचावली व आजपर्यंत जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. परंतु १९ डिसेंबर रोजी तिची मृत्यूशी झुंज संपली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात नवऱ्याने सोडून दिल्याने ती लग्न झाल्यापासून एकटीच राहत होती वयाची ६५ वर्ष गावात आपला एकटाच उदरनिर्वाह चालवत होती. गावातील राहुल भीमराव सावकारे याने रात्री वृद्ध महिलेवर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंत यातन वदा बचावली गेल्या एक महिन्यापासून जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फुपनगरी फाट्याजवळ जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता घडली आहे. फुपनगरी फाट्याजवळ असलेल्या वळणवर अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या वर्षभरात झालेला हा चौथा अपघात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  अपघातात पंकज शंकर कोळी (वय २६) आणि अमोल आनंदा कोळी (वय २७, दोन्ही रा. घार्डी ता. जळगाव) हे दोघे मित्र जागीच ठार झाले. हे दोघे दुचाकीने (एमएच १९ एव्ही ३४४६) जळगावहून घरी घार्डीकडे निघाले असताना कानळदाकडून जळगावकडे खडी भरुन जाणाऱ्या (एमएच १९ झेड ८०६७) डंपरने फुपनगरी फाट्याजवळ जोरदार धडक दिली. अपघाताच्या ठिकाणावरुन ५० ते ७० मीटरपर्यंत दोघांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शाळांसमोर तसेच १०० मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व शनिपेठ पोलिस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत सहा टपऱ्या जप्त करत मालकांवर कारवाई करण्यात आली. १७ रोजी, चौबे शाळा, मनपा शाळा क्रमांक १७च्या १०० मीटरच्या आत कोटपा कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली होती. तरी टपऱ्या सुरूच असल्याने गुरूवार दि. १९ रोजी पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच महानगर पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहा पान टपरीचालकांवर कारवाई केली आहे. यात इकबाल शेख उस्मान शेख (रा. इस्लामपुरा), शंकर…

Read More

यावल : प्रतिनिधी येथील सुतार वाड्यातील शहरी विभागाच्या ७६ क्रमांकाच्या अंगणवाडीतील पोषण आहारात बारीक पांढऱ्या अळ्या निघाल्याने संतप्त पालकांनी अंगणवाडी सेविकेस जाब विचारला. संतप्त नागरिकांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी, भुसावळ यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी अंगणवाडीस भेट दिली. पंचनामा केला असून संबंधित ठेकेदार व पुरवठादारावर दोन दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील सुतार वाड्यात असलेल्या ७६ क्रमांकाच्या शहरी अंगणवाडीमधील पोषण आहार अंतर्गत देण्यात आलेल्या वरणामध्ये पांढऱ्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संतप्त पालकांनी बुधवारी अंगणवाडीत जात सेविकेस जाब विचारत धारेवर धरले. दरम्यान, पालकांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तत्काळ…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी रवींद्र वानखडे यांच्या पथकाने केली. मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा बुद्रुक ता. रावेर येथील मंडळ अधिकारी रवींद्र वानखेडे, तलाठी दुर्गेश भालेराव, तलाठी प्रशांत जाधव यांनी दसनूर लगत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर थांबवले. त्याच्याकडे परवाना विचारला असता आढळून आला नाही. ट्रॅक्टरचालक व मालक ईश्वर विठ्ठल कोळी रा. निंभोरा बुद्रुक हा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १९ सी.४०९३ मधून सुकी नदीतील वाळू नेताना आढळून आला. ईश्वर कोळी याने गुन्हा कबूल केला. हे वाहन पुढील कारवाईसाठी रावेर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले.

Read More

मेष राशी आज आर्थिक कामात यश मिळण्याची शक्यता संमिश्र राहील. तुमच्या विरोधकांना सक्रिय होऊ देऊ नका. सर्वांशी समन्वय राखेल. तुमच्या उणिवा इतरांसमोर उघड होऊ देऊ नका. व्यवसायात संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात विविध अडथळे येतील. वृषभ राशी आज व्यवसायात नवीन करार करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांशी संपर्क लाभदायक ठरेल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवाल. विश्वासघातकी लोकांपासून सावध राहाल. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे कमी होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नोकरदारांना नवीन व्यवसायात रस वाढेल. मिथुन राशी करिअर आणि व्यवसायात सक्रियता दाखवाल. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. अनुकूलतेचा जास्तीत जास्त फायदा घेईल. सर्वांचे हित जपण्याचा विचार असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल.…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिण टेन्शनमध्ये आले होते मात्र या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेविषयी मोठी भूमिका घेतली आहे. राज्यातील जनतेने बिनधास्त रहावे, कारण जी आश्वासने आम्ही दिली आहेत. ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. त्यातील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत जी योजना किंगमेकर ठरली ती लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिले. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.१९) चौथा दिवस आहे. “मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचे आभार मानतो की त्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वीज मीटर फॉल्टी असल्याने सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना सावदा विभागाच्या सहा.अभियंत्यांसह दोन लाईनवर यांच्यावर एसीबीने कारवाई केल्याने वीज कंपनीतील लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे वीज मीटर फॉल्टी असल्याने त्या बदल्यात सकारात्मक अहवाल देण्यासाठी 20 हजाारांची मागणी करीत तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना वीज कंपनीतील सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांना पकडण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाडळसे, ता.यावल येथे ही कारवाई करण्यात आली. यांनी केली कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री.योगेश ठाकूर, श्रीमती नेत्रा जाधव पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापूर्वीच मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराडापर्यंत जात आहेत. त्यामुळे मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तरच या प्रकरणात योग्य चौकशी होईल,’ असे शरद पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या चर्चेत आव्हाड म्हणाले की, “वाल्मीक कराडवर दाखल खंडणीचा गुन्हा आणि देशमुख हत्या प्रकरणात एक लिंक आहे. असं असताना अजूनही वाल्मीक कराडवर हत्येचा गुन्हा का दाखल झालेला नाही? कराडचा ‘आका’ तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेला असताना पोलिस निष्पक्ष चौकशी करतील, अशी आशा…

Read More