मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व नेते छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले असतांना महायुती सरकारमध्ये अजित पवार गटाचे दिग्गज नेते व माजी मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राज्यभर असतांना यावेळी महादेव जानकर यांनी छगन भुजबळ यांना सल्ला दिला आहे. यावेळी महादेव जानकर यांनी नेते छगन भुजबळ यांना सल्ला दिला आहे. महादेव जानकर म्हणाले कि, “छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा”, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांना छगन भुजबळांवर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना छगन भुजबळांना एक मोलाचा सल्लाही…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच खुनाची चर्चा जोरदार सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक मोठा अंदाज व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खा.बजरंग सोनवणे म्हणाले कि, वाल्मीक कराड सीआयडी ऑफीसला शरण आले तेव्हा जी गाडी त्यांच्याकडे होती यावरुन सध्या राजकारण तापले आहे. अजित पवार यांना अडकवण्याचा प्लॅन असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तर पुढे बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराड ज्या गाडीने शरण होण्यासाठी सीआयडी ऑफीसला हजर झाले त्या गाडीचा मालक तिथेच होता. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने त्यांना तशी विचारणा देखील केली, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात सन २०१९ मध्ये कोरोनाचा मोठा थैमान सुरु झाला होता आता पुन्हा एकदा चीनमध्ये एका गूढ आजाराने थैमान घातले असून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमुळे रूग्णालय पुन्हा फुल्ल झाले आहेत. या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र तेजीने व्हायरल होत आहेत. चीनमधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. चीनमधील कोरोना आजाराने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. चीनवर त्यावेळी जगभरातून टीका झाली होती. जगभरात लॉकडाऊन लागले होते. आता इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (hMPV) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा…
अमळनेर : प्रतिनिधी पोलिसांना माहिती देतो या संशयावरून दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ याने एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ३१ रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सुभाष चौकात घडली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवशक्ती चौकातील राहुल रमेश भोई (वय २९) हा त्याच्या मित्रांसोबत ३१ रोजी सुभाष चौकात उभा होता. याप्रसंगी दादू उर्फ राजेश रकनाथ निकुंभ याने राहुलला हटकत, तू पोलिसांना माहिती देतो. त्यावरून दादू धोबी याने चाकूने राहुलच्या मानेवर वार केला. परंतु, खांद्यावर तो वार झेलल्याने राहूल जखमी झाला. तर त्याच्या मित्रांनी भांडण सोडवल्यानंतर दादूने ‘आज तो बच गया, अगली बार छोडूंगा नही’ अशी धमकी देत तो…
जळगाव : प्रतिनिधी सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या एका बेरोजगार युवकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवत ९ लाख ८६ हजारांत ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या युवतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुप्रीम कॉलनी परिसरात २६ वर्षीय तरुण वास्तव्याला आहे. तो बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात आहे. १ डिसेंबर २०२४ रोजी त्याला भाषा मुखर्जी, असे नाव सांगणाऱ्या महिलेने मेलवरून तसेच मोबाइलवरून संपर्क साधून नोकरी देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. चांगली नोकरी लावून देते, असे सांगून तरुणाकडून वेळोवेळी ९ लाख ८६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सायबर पोलिसात तक्रार…
रावेर : प्रतिनिधी शहरातून मोताळा येथे विक्रीसाठी विना परवाना मालवाहू वाहनातून प्रत्येकी दोन बैल व एक गोन्ह्याची वाहतूक करताना ही दोन्ही वाहने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी पहाटे साडेचारवाजेच्या सुमारास जप्त करण्यात आले. याबाबत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शेख करीम शेख शफीउद्दीन (वय ३२, प्रशिक नगर, उटखेडा रोड, रावेर) व सैय्यद खलील सैय्यद मंगलू (वय ३३, मोमिनवाडा, रावेर) हे दोन्ही त्यांच्या छोट्या दोन लाख रुपये किमतीच्या मालवाहू वाहनामधून प्रत्येकी २० हजार किमतीचे दोन बैल व १० हजार किमतीच्या एका गोन्ह्याची तर दुसऱ्या दोन लाख रुपये किमतीच्या छोट्या मालवाहू वाहनातून प्रत्येकी २०…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज नगर मधील रहिवासी व आई वडिलांचा एकुलता मुलगा हितेंद्र प्रकाश सोनार (३२) हा तरुण गुजरातमधील अंकलेश्वर येथे कंपनीमध्ये नोकरीस होता. कामावर जाताना १ जानेवारी रोजी त्याचा अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीस असलेल्या या युवकाचे एमएससी पर्यंत शिक्षण झाले होते पाच-सहा वर्षांपासून तो अंकलेश्वर येथील कंपनीमध्ये नोकरीला होता. वरणगाव येथे वृद्ध आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करीत असताना तो त्यांना अंकलेश्वर गुजरात येथे घेऊन गेला होता. तेथेच नोकरी करुन त्या व्यतिरिक्त फावल्या वेळेत तो फर्निचरची कामे करीत होता. अशाप्रकारे रात्रंदिवस मेहनत करून त्याने तेथे घरसुद्धा घेतले होते. अडीच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला. त्याला…
भुसावळ : प्रतिनिधी मंगळवारी (दि.३१) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे मावसभाऊ गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बुधवारी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला. सविस्तर वृत्त असे कि, सर्फराज युनूस पिंजारी (वय २७, रा. किनगाव खुर्द, ता. यावल) आणि त्याचा मावसभाऊ अनिस शकील पिंजारी (रा. खिरोदा, ता.रावेर) हे मंगळवारी रात्री ११.३० वाजता दुचाकीने वरणगावकडून भुसावळकडे येत होते. निंभोरे शिवारात समोरून वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सर्फराज पिंजारी व मावसभाऊ अनिस पिंजारी हे दोघे जखमी झाले. दोघांना वरणगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी भुसावळ तालुका पोलिस…
चोपडा : प्रतिनिधी दुचाकीने चोपड्याकडे येणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाकडून पोलिसांनी गावठी कट्टा हस्तगत केला. १ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावर नाटेश्वर मंदिराच्या टेकडी जवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर येथील क्रांतीनगर भागातील मनीष सुभाष जगताप हा सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशकडून लासूर सत्रासेन रोडने लासुरकडे दुचाकीने येत होता. तेव्हा चोपडा ग्रामीण पोलिसांनी त्याला अडवले असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीचा एक सिल्वर रंगाचा गावठी कट्टा, दोन हजाराचे दोन जिवंत काडतुस मिळून आले.
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जामनेर रोडवरील लक्ष्मी गॅरेजमध्ये गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागल्याने त्यात एक चार चाकी व काही सामान जळून खाक झाले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. नगरपालिकेच्या तीन अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग विझवली गेली नसती तर त्या ठिकाणी पार्क केलेल्या अन्य वाहनांनाही आग लागली असती. आग पसरली असती तर समोरच पेट्रोल पंप होता. त्यामुळे पेट्रोल पंपाला आग लागू शकली असती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅरेजमधील सर्व सामान जळून खाक झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.

