बीड : वृत्तसंस्था सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहे. तर राजकीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. अशातच धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सारंगी महाजन यांनी मस्साजोगमध्ये जात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. धनंजय देशमुख यांच्यासह कुटुंबीयांची विचारपूस करत प्रकरणावर चर्चा केली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यायला हवा असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. सारंगी महाजन म्हणाल्या की, माझ्या केसमध्ये देखील गोविंद मुंडेंचे वाल्मीक कराड याच्याशी संबंध आहेत आणि त्याचे धनंजय मुंडेसोबत आहे. म्हणजे यात…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला होऊन दोन दिवस उलटून गेले तरी हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. शनिवारी सकाळी संशयिताचे तिसरे छायाचित्र समोर आले आहे. हे चित्र हल्ल्यापूर्वीचे आहे. यामध्ये तो पिवळ्या शर्टमध्ये दिसत आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस सध्या 2 जणांची चौकशी करत आहेत. या दोघांचे दिसणे सैफवर हल्ला करणाऱ्या सारखेच असल्याचे बोलले जात आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत. येथे पोलिसांनी घटनास्थळावरून गोळा केलेले बोटांचे ठसे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, सैफला खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे, मात्र तो सध्या जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नाही. याआधीही संशयिताची दोन छायाचित्रे समोर आली आहेत. सैफच्या…
जळगाव : प्रतिनिधी खेडी शिवरातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्या विद्यानगरात कुत्रा भुंकत आहे त्याला आवरा असे सांगितल्याच्या कारणावरून परिसरात राहणाऱ्या नागरीकांना दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी १७ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या – सुमारास घडली आहे. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेडी शिवारातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्यास विद्या नगर येथे सोनी वाणी या नामक महिलेचा कुत्रा हा नेहमी या परिसरात भुंकत असतो. परिसरात जाणाऱ्या…
जळगाव : प्रतिनिधी लोखंडी पट्टी मारून दुखापत केल्याने याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना वाटेत दोन जणांनी महिलेला शिवीगाळ करीत तिच्या आईवडिलांना मारहाण केली. ही घटना १५ जानेवारी रोजी रात्री चौघुले प्लॉट परिसरात घडली. या प्रकरणी १६ रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुचिता दीपक पाटील (२०, रा. चौघुले प्लॉट) यांचे वडील दीपक शिवनारायण पाटील यांना एकाने लोखंडी पट्टी मारून दुखापत केली होती. याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना वाटेत दोन जणांनी अडविले व सुचिता पाटील यांना शिवीगाळ करीत आई-वडिलांच्या हातावर लोखंडी पट्टी मारली. शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील उसमळी येथे शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणाला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. व दगड मारून दुखापत केली. याप्रकरणी गुरुवारी यावल पोलिस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील उसमळी या गावात आकाश तोताराम बारेला वय १९ हा तरूण आपल्या घरी होता. तेव्हा तेथे रामलाल हरचंद बारेला आणि खुबसिंग शिरताब भिलाला हे दोघे आले आणि शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या रागातून त्याच्याशी वाद घालून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि दगड मारून दुखापत केली. तेव्हा या दोघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला…
रावेर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील सेंधवा पोलिसांनी रोख दोन हजार रुपये बक्षीस घोषित केलेल्या एका गुन्ह्यातील वॉण्टेड फरारी आरोपी महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये संशयास्पद स्थितीत रावेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यास सेंधवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. म. प्र. तील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये संशयास्पद स्थितीत फिरताना मिळून आल्याने रावेर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता तो फरारी आरोपी असल्याचे आढळले. ही रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल, फौजदार तुषार पाटील, पोलिस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलिस शिपाई महेश मोगरे, प्रमोद पाटील, तसेच माधुरी सोनवणे यांनी केली.
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या अरुण भगवान गवळी (रा. गुम्मी, जि. बुलढाणा) याला न्या. एस. आर. भांगडिया-झवर यांनी शुक्रवारी १० वर्षांची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील १४ वर्षीय मुलगी पाचोरा तालुक्यात तिच्या आजोबांकडे शिक्षणासाठी राहत होती. इयत्ता नववीमध्ये असताना २४ डिसेंबर २०१६ रोजी शाळेची वेळ संपल्यावरही ती घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या आजोबांनी तक्रार दिली होती. याचा तपास सुरू असताना याच दिवशी अरुण भगवान गवळी याने तिला रेल्वेने जळगाव येथे बोलावले व तिला घेवून त्याच्या बहीणीकडे गेला होता. रात्रभर तेथे थांबल्यानंतर गवळी याने मुलीला त्याच्या गावी व नंतर छत्रपती…
मेष राशी कामाच्या ठिकाणी सहयोगी वाढतील. महत्त्वाच्या कामात यश आल्यास मनोबल वाढेल. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. प्रशासनाच्या मदतीने हा वाद मिटविला जाईल. जवळच्या मित्राची भेट होईल. बांधकामाच्या कामाला गती मिळेल. आध्यात्मिक कार्यात रुची राहील. नोकरीचा शोध पूर्ण होईल वृषभ राशी महत्त्वाचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा. व्यवहाराचे मुद्दे इतरांवर सोडू नका. व्यवसाय योजना सोपी राहील. व्यवस्थापनात यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पडतील. परदेशी व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. मिथुन राशी तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नोकरीत बढती होईल. व्यावसायिक योजनांना चालना मिळेल. सहकारी विषयात सहभागी होऊ शकता. जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. व्यवसायात नवीन सहयोगी…
नागपूर : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर आता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद रंगला होता त्यावर आता पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताकदिनापूर्वी सुटलेला असेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी 16 ते 18 जानेवारी दरम्यान पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल, असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार मध्यंतरी नसल्याने काहीसा विलंब झाला. तिघांमध्ये समन्वयाने हा प्रश्न सुटेल, असे सांगितले होते. आता त्यांनीच पुन्हा 26 जानेवारी ही नवी तारीख दिली आहे. नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यकाळ संपत असल्याने आज शुक्रवारी त्यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. निवडणुकीचा आणि या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्टशी संबंधित जमीन भ्रष्टाचार प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीला म्हणजेच बुशरा बीबीला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंबंधी वृत्त दिले आहे. हा निर्णय रावळपिंडीच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयात देण्यात आला. ज्याठिकाणी इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. या प्रकरणात खान यांच्यासह त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर सहा जणांवर आरोप ठेवण्यात आले होते, ज्यांपैकी बहुतेक जण देशाबाहेर आहेत. आदिला तुरुंगात स्थापन केलेल्या तात्पुरत्या न्यायालयात न्यायाधीश नासिर जावेद राणा यांनी हा निकाल दिला. हा निर्णय तीनदा पुढे ढकलण्यात आला. राष्ट्रीय…

