मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई येथील दादर परिसरात हा अपघात झाला आहे. सुनील शिंदे यांच्या कारला बेस्ट बसची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सुनील शिंदे यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात सुनील शिंदे यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या संदर्भातील अधिकची माहिती अशी, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हे प्रभादेवी येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी ते दादर येथून पुढे जात असताना समोरून एक बेस्ट बस आली आणि समोरच्या बाजूने सुनील शिंदे…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांकडून मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने धरणगाव नगर परिषदेने नियोजन करून प्रथमतः फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करून त्याठिकाणी अतिक्रमित फेरीवाल्यांना स्थलांतरीत केले. त्यामुळे मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला. धरणगाव नगर परिषदेने गत १५ दिवसांपासून फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिली होती. त्यानुसार नुकतेच नगर परिषदेने विशेष मोहीम राबवत सर्व फेरीवाल्यांना नियोजित ठिकाणी स्थलांतरित केले. या कारवाईमुळे मोकळा झालेल्या मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होवू नये यासाठी नगर परिषदेने विशेष पथक नियुक्त केले आहे. तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात…
चाळीसगाव : प्रतिनिधी धुळेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका इसमास कट मारल्याने त्याचा तोल जाऊन तो ट्रकच्या चालक बाजूकडील मागील चाकात आला. त्यात ट्रकचे चाक त्याच्या शरीरावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव ईश्वर सूळ (६३, तळेगाव, ता. चाळीसगाव) असे त्याचे नाव आहे. शहरातील रस्त्याच्या कडेला ज्ञानदेव सूळ हे उभे असताना बस स्थानकाच्या दिशेने भरधाव वेगाने ट्रक आला. हा ट्रक एवढा वेगात होता की, तो वळणावर वळवत असताना चालकाचा ताबा सुटला आणि तेवढ्यातच अचानक एका दुचाकीस वाचवत असताना ट्रकचा धक्का त्यांना…
भडगाव : प्रतिनिधी शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्यास नागरिकांच्या सहाय्याने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भवानी बाग परिसरातील रामकृष्णनगरमधील रहिवासी आत्माराम चिंधा पाटील हे आपल्या पत्नीसह मुलीकडे बाहेरगावी गेले होते. आत्माराम पाटील यांचे घर बंद असल्याने प्रवीण संभाजी पाटील (३५, बाह्मणे, ता. एरंडोल), विभोर जुलाल जाधव (हिगोणे जवखेडे, एरंडोल) या दोघा चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे ३:१० वाजता बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या घरासमोरील रहिवासी संदीप भास्कर मराठे (मुकटीकर) यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी…
रावेर : प्रतिनिधी निरुळ येथील अशोक देवीदास खैरे हा आजे सासऱ्यांचा दशक्रिया विधी आटोपून रावेरहून निरुळला जात असताना त्याला समोरून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात अशोक याचा मृत्यू झाला. ही घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून रावेरकडून निरूळला दुचाकी क्रमांक एमएच १९- ईआय ४८१९ ने घरी परत येत असताना समोरून आलेल्या दुचाकी क्रमांक एमपी ६८ – एम ४२५६ वरील चालक आरोपी सोपान गजानन भोई (वय ४५) याने धडक दिली. त्यात अशोक देवीदास खैरे (वय ३३) हा गंभीर जखमी झाला. त्याला भुसावळ येथे रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी…
जळगाव : प्रतिनिधी टास्क पूर्ण करून नफ्याचे आमिष दाखवत पहिल्या दोन टास्कवर नफा तर दिला, मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे सांगत सोनल नितीन पाटील या ४० वर्षीय महिलेची पाच लाख २९ हजार ६१६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ६ ते १४ जानेवारी दरम्यान घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळची पुणे येथील रहिवासी असलेल्या सोनल सध्या जळगावातील मनीषा कॉलनी परिसरात राहतात. चार जणांनी टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करून घेतले. महिलेला टास्कची माहिती देऊन त्यातून नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांनी दोन टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना नफा दिला;…
मेष : आर्थिक गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. घराच्या नुतणीकरणाविषयी चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुलांना यश लाभेल. आळसामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या कामाप्रती समर्पित रहा. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्यही चांगले राहील. वृषभ : दिनचर्येत केलेल्या बदलामुळे मनशांती लाभेल. तुमच्याविषयी दुसरे काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा.स्वत:च्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून निर्णय घ्या. मैत्राबरोबरील संबंध बिघडणार नाहीत, याबाबत काळजी घ्या. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. मिथुन : आज बहुतांशवेळ कुटुंबासोबत व्यतित कराल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. दुपारनंतर प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागेल. तरुणाईने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे. कामांची ठिकाणी समर्पित वृत्तीने कार्यरत राहा.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने नुकतेच पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था देशभरात अनेक विद्यार्थी मोबाईलमध्ये जुगारच गेमच्या नादात काय करतील कुणीही सांगू शकत नाही अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली आहे. बीसीएसचा विद्यार्थी प्रदीप निपटे याची मोबाईल गेमच्या जुगारात जिंकलेले पैसे हरल्याच्या वादातून त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन मावस भावानेच निघृण हत्या केली. रूम पार्टनर येण्यापूर्वी चादरीने मृतदेह झाकून मृतदेहाशेजारी गेम खेळत बसला. संशय येऊ नये म्हणून पतंग खेळण्याच्या बहाण्याने निघून गेला. पुन्हा परत येऊन मृत झाल्याची खात्री केली. सोशल मीडियावर मिस यूचे स्टेटस ठेवले. अत्यंत शांत डोक्याने त्याने प्रदीपची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शुक्रवारी (दि.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ तील बहिणीसाठी महत्वाची बातमी आहे. पडताळणी पूर्वीच 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने ही माघार घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय. योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या अर्जांची पडताळणी होण्याआधीच राज्यातील सुमारे 4 हजार महिलांनी आपला अर्ज या योजनेतून मागे घेतले…

