मुंबई : वृत्तसंस्था अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस संशयिताची सुमारे 3 तासांपासून चौकशी करत आहेत. या प्रकरणात, गुरुवारी एका संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले, जो १५ जानेवारी रोजी पहाटे २.३० वाजता सैफच्या घरात दिसला होता. यानंतर, आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले ज्यामध्ये वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ एक संशयित दिसला. दोन्ही संशयित एकच आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताच नाव शाहिद आहे, असं पोलिसातील सूत्रांनी सांगितलय. शाहीद याला गिरगाव परिसरातून ताब्यात घेतलय. शाहिदवर या आधी सुद्धा तीन-चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. हा…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था पुणे-नाशिक महामार्गवर मुक्ताई धाब्याजवळ आळेफाटाकडून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची पुढे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एसटी बसवर आदळून भीषण अपघात होऊन यात ९ जण ठार झाले. यासह इतर ६ जणांवर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची ही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात शुक्रवारी (दि. १७) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी पोहचले. तसेच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व भाजपा तालुका अध्यक्ष संतोश खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत समजले माहिती अशी की, मुक्ताई धाब्याजवळ…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यााधीच्या वेतन आयोगाची समिती 7 व्या वेतन आयोगासाठी 2016 मध्ये स्थापन करण्यात आली. 2026 पासून 8 व्या वेतन आयोगवर काम सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 व्या वेतन आयोगाला मंजूरी दिली आहे. 7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ आता 2026 पर्यंत राहील. यानंतर आठव्या वेतन आयोगाची समिती तयार होईल. 8 वा वेतन आयोग मिळणार की नाही, यावर शंका उपस्थित केली जात असताना हा…
जळगाव : प्रतिनिधी विनाकारण शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने कांतीलाल श्रीराम सपकाळे (वय ३५, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजता हरिविठ्ठल नगरात घडली. या मारहाणीत लोखंडी झारा तरुणाच्या डोक्यात मारल्याने, तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरातील भाई गल्लीत कांतीलाल सपकाळे हा युवक राहतो. बुधवारी सकाळी ९ वाजता कांतीलाल यांची आई या गटार घाण काढत असताना, त्यावेळी महेंद्र भोई हा त्यांना विनाकारण शिवीगाळ करीत होता. यावेळी कांतीलालने शिवीगाळ का करता असे विचारले असता,…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसाळे येथे घराच्या सामाईक भिंतीवर सेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी तिघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाळे येथील आबा कौतिक महाले (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सामाईक भिंतीवर सेटअप बॉक्स लावत असताना त्याचा आवाज झाला. तो ऐकून शेजारी रितेश महाले व मंगला सुभाष महाले यांनी कुटुंबीयांना शिवीगाळ सुरू केली. यानंतर सुभाष महाले मद्यधुंदीत काठी घेऊन तर रितेश महाले हा लोखंडी रॉड घेऊन आला. दोघांनी मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, आई व मुलगा सोडवायला आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यात आबा महाले…
यावल : प्रतिनिधी वड्री गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डम्पर महसूल विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले. हे डम्पर नदीपात्रात अडकल्याने चालकाने तेथेच सोडून दिले. हे डम्पर जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून तहसील कार्यालयात नेण्यात आले. डम्पर मालकाला दंड ठोठावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, डम्पर क्रमांक एमएच १९ सीवाय ८४८१ हे सुशील मोतीलाल पाटील, रा. जळगाव यांच्या मालकीचे आहे. पथकाने चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालक नीलेश मिस्त्री, रा. पाळधी याने वाहन घेऊन पळ काढला. पाठलाग करताना डम्पर खडकाई नदीपात्रात अडकले. त्यामुळे चालकाने वाहन जागेवरच सोडले. पथकाने नंतर डम्पर नदीपात्रातून बाहेर काढून तहसील कार्यालयात आणले. नदीपात्रात फसलेले डम्पर काढण्याकरिता वड़ी सरपंच अजय भालेरावसह स्थानिक…
चोपडा : प्रतिनिधी शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा लावत गुरुवारी पहाटे दोन ठिकाणी कारवाई करत गांजा वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सहाजणांच्या टोळीला अटक करत त्यांच्याकडून एकूण १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ सापळा लावण्यात आला. अकुलखेडा बसस्थानक परिसरात दोन संशयित आले. त्यांच्याजवळ ३६ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा मिळून आला. यात विजय देवनाथ मोरे (२७, भोरखेडा ता. शिरपूर), अविनाश भिका पाटील (२६, वाघळुद ता. धरणगाव) यांना अटक केली. याचवेळी चारचाकी थांबवून तपासणी केली असता त्यात ४ लाख ७० हजार रूपये किमतीचा…
मेष राशी आज तुम्ही मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. मनोरंजक प्रवासाच्या संधी मिळतील. जमीन खरेदी-विक्रीची संधी मिळेल. सरकारकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. एखाद्या नयनरम्य ठिकाणी फेरफटका माराल. कुटुंबातील तणाव संपुष्टात येईल. लांबच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती राहील. वृषभ राशी आज घरात वेळ द्या आणि प्रियजनांशी जवळीक वाढवा. वादविवादाला चालना देणे थांबेल. आजूबाजूचे वातावरण अस्वस्थ राहू शकते. व्यापारी वर्गाला सरकारी लोकांचे सहकार्य मिळेल. विरोधक राजकारणात सक्रिय होतील. नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अडचणी येऊ शकतात. नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष करू नका. मिथुन राशी भावांच्या पाठिंब्याने पुढे जाल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळू शकते. उद्योगधंद्यात वाढत्या भागीदारांकडून आर्थिक लाभ होईल. जीवनसाथीमुळे समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल.…
जळगाव : प्रतिनिधी शहरात अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना आज दि.१६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील शिव कॉलनी जवळ अपघात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक दिली या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील भारमल पाटील हे वृध्द आपल्या पत्नीसह वास्तव्याला असून आयुर्वेदीक उपचार करण्यासाठी भारमल पाटील हे जळगावा दुचाकी क्रमांक (एमएच १९ बी डब्ल्यू २७३०) जळगाव शहरात येण्यासाठी निघाले. गुरूवारी १६ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवकॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलावरून शहराकडे जात असतांना मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत भारमल पाटील हे रस्त्यावर पडल्याने ट्रकने त्यांना चिरडले आणि…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा धुमाकूळ सुरु असतांना आता मध्य महाराष्ट्रासह बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई या भागातील तापमान 12 ते 16 अंशापर्यंत नोंदवले जात आहे. तर मराठवाड्यामध्ये 18 ते 20 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील तापमानात अंदाजे दोन अंशांनी वाढ नोंदवली जाणार असून विदर्भात मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. राज्यात मागील दोन दिवसापासून किमान तापमानाचा…

