नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात घडलेल्या थरार घटनेची एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला आज सोमवारी (दि.२०) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला शनिवारी (दि.१८) दोषी ठरवले होते. त्याला आज सियालदह न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) संजय रॉय याला फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. तसेच पीडितेच्या पालकांच्या वकिलांनीदेखील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला शिक्षा सुनावली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी कोलकातामधील संपूर्ण सियालदाह न्यायालय परिसरात…
Author: editor desk
महाकुंभनगर (प्रयागराज) : वृत्तसंस्था देशातील महाकुंभमेळावा विविध कारणाने चर्चेत येत असतांना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यात रविवारी भीषण आग लागली. त्यात 19 तंबू जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवळपास एक डझन बंबांनी एक तास लढून आग आटोक्यात आणली. भाविक आणि साधूंना सुरक्षितस्थळी हलवल्याने मोठी दुर्घटना टळली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून आदित्यनाथ यांच्याकडून माहिती घेतली. महाकुंभ मेळ्यात गॅसच्या दोन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे भषण आग लागली. वाहता वारा आणि राहुट्या व तंबूतील ज्वलनशील पदार्थ यामुळे आग वेगाने पसरली. लालबहादूर शास्त्री पुलाजवळील सेक्टर 19 मध्ये आगीचा प्रारंभ झाला.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना धुमधडाक्यात सुरू केली. राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना दर महिन्याला या योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जातात. आता ही रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेचा लाभ अर्ज भरणाऱ्या सर्व महिलांना दिला. कुणाचेही नाव बाद केले नाही. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर आता सरकारने या अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. ज्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बिनिफिट ट्रान्स्फरद्वारे योजनेच्या लाभाची राशी महिलांच्या खात्यावर वर्ग करत आहे. 1500 रुपये खात्यावर आल्याने अनेक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील डीमार्ट परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या व्यक्तीवर रामानंद नगर पोलिसांनी कठोर कारवाई केली. शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विनोद बाविस्कर (रा. बांभोरी, ता. धरणगाव) याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. आरोपी बेकायदेशीरपणे तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री आरोपीला तलवारीसह पकडले. घटनास्थळी तलवार जप्त करून त्याच्या ताब्यातून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यात आले. शनिवारी, १८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता रामानंद…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगरात घर खाली करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी होवून एकमेकांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार १८ रोजी सकाळी ९.३० वाजता घडला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधात एकुण ९ जणांविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील शिवाजी नगरात अनिल हरगोविंद सिंधवाणी (वय ६०) आणि प्रविण अशोक अग्रवाल (वय ३४) असे दोन कुटुंबिय वास्तव्याला आहेत. दोघांच्या परिवारात १८ जानेवारीला सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घर खाली करण्यावरून वाद झाला. यात पहिल्या कुटुंबातील अनिल सिंधवाणी यांच्यासह शृती हरगोविंद्र सिंधवाणी आणि क्रीश अनिल सिंधवाणी यांना मारहाण करून जखमी करत त्यांच्या घरातून ३ लाख…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील रांजणगाव फाट्यावर महामार्ग क्रमांक २११वर क्रूझर चारचाकी व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर ६ जण जखमी झाल्याची घटना १९ जानेवारीला दुपारी १.३० ते २ वाजेदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे तांडा येथील कृष्णा संजय जाधव (वय १९) हा दुचाकी (एमएच १९, एएस ८४७३) वर त्याची आजी चंदाबाई मलखान पवार (रा. कोंगानगर, ता. चाळीसगाव) यांना घेवून चाळीसगाव कडे येत होता. तर रांजणगाव फाट्यावर चाळीसगावकडून संभाजीनगर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर (एमएच- २०, सीएच- ६५२२) या चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील चंदाबाई मलखान पवार यांचा…
मेष : आज सकारात्मक विचाराने समस्यांवर तोडगा निघण्याचा मार्ग सापडेल. नवीन उर्जेने आपल्या कार्यवर लक्ष केंद्रीत कराल. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असेल तर तुमच्यासाठी अनुकूल निकाल येण्याची शक्यता आहे. शेजार्यांशी वाद टाळा. भावांसोबतचे वाद शांततेने मिटवा. व्यवसायात परिस्थिती जैथे राहील. वृषभ : धार्मिक आणि सामजिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक मोठे खर्च निघाल्याने आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. मुलांच्या नकारात्मक कृतींने चिंता वाढण्याची शक्यता. व्यावसायिक कामासाठी प्रवास होईल. जोडीदारचे सहकार्य लाभेल. मिथुन : आज ज्येष्ठांकडून मार्गदर्शन लाभेल. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक टाळा. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता कमी आहे. दैनंदिन दिनचर्या तुम्हाला निरोगी ठेवेल. कर्क :…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना सुरु असतांना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. तातडीने आयआरबी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसने अचानक पेट घेतल्याने वाहतूक ठप्प झाली. आग विझताच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला तळेगाव टोलनाक्याजवळ भीषण आग लागली. पुण्याहून मुंबईला जाताना शावशाही बसने अचानक पेट घेतला. या शिवशाही बसमधून 12 प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाच्या प्रसंगावधाने…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक भागात गुन्हेगारी घटना घडत असतांना आज पहाटेच्या सुमारास शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात जुन्यावादातून घरातील कुटुंबावार चॉपर आणि कोयता, प्राणघातक हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना रविवारी सकाळी १० वाजता झालेल्या घडली. या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तर जखमी झालेल्या ५ जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबावर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये मुकेश रमेश शिरसाठ ( वय- २६…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी महिलांसह तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच शाहूवाडी तालुक्यातील चिखलवाडी येथे बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एकाने स्वतःच्याच सावत्र मुलीवर तिला ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. यातून मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर शाहूवाडी पोलिसांत तिच्या बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम दत्तात्रय दळवी (वय 55) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःच्या सावत्र मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. नराधम बापावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) नुसार शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येळवण जुगाई येथे धोंडीराम दळवी हा…

