बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील जामठी येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर घर व काही दुकाने चोरट्यांनी फोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लांबविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास जामठी येथील राजेंद्र चौधरी यांचे किराणा दुकान तसेच संजय तपे यांचे घर चोरट्यांनी फोडले. यानंतर भारत पान सेंटर, अमोल गोसावी पान सेंटर, क्रिष्णा पाटील ही दुकाने फोडली. यात रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले आहे. चोरट्यांनी दुकाने फोडण्याच्या आधी दुकानासमोर मोटारसायकल लावून चोरीचा प्रयत्न केला आहे. सीसीटीव्हीत दुचाकीवर ये-जा करताना दिसून येत आहेत. तपास बोदवड पोलिस करीत आहेत. गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा निधी खर्च करून गावात सीसीटीव्ही…
Author: editor desk
मेष : मालमत्ता खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे. मुलांकडूनही काही चांगली बातमी आली तर घरात चांगले वातावरण असेल. कधीकधी जास्त विचारांमुळे होणारा ताण तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. याची काळजी घ्या. भावांसोबतचे संबंध सुधारतील. वृषभ : आज तुमच्या वैयक्तिक बाबींबाबत कोणशीही चर्चा करु नका. घराच्या देखभालीशी संबंधित कामांमध्ये खर्च वाढू शकतो. सावधगिरी बाळगा. निर्यात-आयातीशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. मुलाच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदी वातावरण राहील. मिथुन : आज ग्रहमान अनुकूल आहे. संपर्क क्षेत्राचा फायदा होईल. समाजात तुमचा आदर वाढेल. यासोबतच उत्पन्नही वाढू शकते. तुमच्या कामगिरीमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. कर्क : आज एक महत्त्वाचा प्रवास पूर्ण…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा वनपरिक्षेत्रातील चौगांव कक्ष क्र. २६० मध्ये अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक २४ जानेवारी रोजी मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी वनरक्षक श्री. प्रकाश सुभाष पाटील यांच्यावर वाहन चढवून गंभीर जखमी केले. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विना क्रमांकाची मोटारसायकल,सागवान लाकूड ०.१५१ घ.मी असून त्याची अंदाजे किंमत ३०५६ रु. आणि इतर साधने समाविष्ट होती. पुढील तपासादरम्यान चौगांव येथील एका आरोपीच्या घराची झडती घेतली असता, कटाई मशीन, लाकूड कापण्याची अवजारे, ३५ सागवान लाकूड नग आणि तयार पलंग या सर्वाची…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना दि.२४ रोजी शुक्रवारी नाशिकहून सोलापूरकडे जात असलेल्या एसटी बसला नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथे दुपारी आग लागली. त्यात संपूर्ण बस खाक झाली. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 40 प्रवासी सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आगाराची एसटी बस (एमएच 14 बीटी 4952) सकाळी सहा वाजता नाशिकहून सोलापूरला जाण्यासाठी निघाली होती. ही बस नगरहून दुपारी बाराच्या दरम्यान पुढे निघाली. दुपारी एकच्या सुमारास ती मिरजगाव बसस्थानकापासून पाचशे मीटरवर दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ आली, तेव्हा बसच्या इंजिनजवळ काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे चालक संतोष टोपनदारे यांच्या लक्षात आले. इंजिनकडील बाजूने धूर निघत असल्याचेही त्यांना दिसले. त्यांनी तातडीने…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे आज दिनांक २४ जानेवारी रोजी ग्रामससभेचे आयोजन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय वसंतवाडी येथे करण्यात आले. ग्रामसभेचे सुचना पत्र २१ जानेवारी रोजी काढण्यात आले होते या ग्रामसभेसाठी गावातील सर्व शासकीय प्रशासकीय विभागांना सुचना पत्र दिलेलं होते यात ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ तसेच रेशन दुकानदार,म्हसावद पोलीस चौकी, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, पशुसंवर्धन उपकेंद्र जळके,आरोग्य उपकेंद्र जळके,आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळा,व वनविभाग यांचा समावेश होतो . या सभेला ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ सर्व शासकीय प्रशासकीय विभाग कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यासह केवळ ४५ जणांची उपस्थित असल्याने सदर सभा कोरम पुर्ण न झाल्याने तहकूब करण्यात आली . या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील तांडा येथे रहाणारे कै.बाळु भंगु पवार व कै.कबीर भिवा चव्हाण या शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यू झाले होते. या मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या द्वार दर्शनासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे सुपुत्र माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील हे आले असता गावातील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मृत शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती विषयी कैफियत मांडली. यावेळी प्रतापराव पाटील यांनी जर अपघाती मृत्यू झाला आहे तर यांचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. या गोष्टीची जबाबदारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्विकारुन मयत शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून दोन्ही मयत शेतकऱ्यांचे पत्नी श्रीमती…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर उड्डाणपूल ते दूध फेडरेशन रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दि.२५ जानेवारी शनिवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून डंपर ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दूध फेडरेशनजीक असलेल्या भाग्यश्री पेट्रोल पंपासमोर ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ एएन २९०६ विटा घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरचा भीषण अपघात होवून ट्रॅक्टर पलटी झाले. या घटनेत अंकुश आत्माराम भिल वय-२७, रा. डिकसाई ताम जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथे कारच्या धडकेत दीड वर्षाची प्रियांशी संदीप पाटील (रा. अडावद) ही मुलगी ठार झाल्याची घटना अडावद येथील ग्रामपंचायतीच्या जवळ २४ रोजी दुपारी १ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच सपोनि प्रमोद वाघ, भरत नाईक, सतीष भोई, ज्ञानेश्वर सपकाळे, विनोद धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची आई सुवर्णा संदीप पाटील ह्या दुपारी १ वाजेच्या सुमारास घरासमोरील दुकानावर रस्ता ओलांडून ताक घेण्यासाठी जात असताना पाठीमागे मुलगी प्रियांशी ही येत होती. त्याचवेळी चारचाकी क्रमांक एम.एच. ३९ जे. ७४२४ ने मुलीला धडक दिली. त्यात मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव ता. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा…
जळगाव : प्रतिनिधी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन सतीश अशोक संन्यासी (३५, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी आत्महत्या केली. ही घटना २३ जानेवारी रोजी रामेश्वर कॉलनीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वर कॉलनीमध्ये हातमजुरी करणारे सतीश संन्यासी हे कुटुंबासह राहतात. २३ जानेवारी रोजी त्यांनी घरात गळफास घेतला. काही वेळानंतर हा प्रकार त्यांच्या भावाच्या लक्षात आला. त्यावेळी संन्यासी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : प्रतिनिधी रात्री पायी फिरत असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे गजानन विश्वनाथ शेवाळे (५१, रा. न्यू लक्ष्मीनगर) हे जखमी झाले. ही घटना २१ जानेवारी रोजी रात्री संभाजीनगर रिक्षा थांब्याजवळ घडली. याप्रकरणी २३ रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गजानन शेवाळे हे पायी फिरत असताना भरधाव दुचाकीने (क्र. एमएच १९-ईबी ९६११) त्यांना धडक दिली. यात शेवाळे हे गंभीर जखमी झाले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी २३ रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

