Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसापासून समान नागरी कायदा लागू होण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आज उत्तराखंडमध्‍ये समान नागरी कायदा लागू झाला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ‘यूसीसी’च्या पोर्टल आणि नियमांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. उत्तराखंड हे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. उत्तराखंडमध्‍ये २७ मे २०२२ रोजी समान नागरी संहितेसाठी तज्ञ समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने २ फेब्रुवारी २०२४ रोजी सरकारला आपला अहवाल सादर केला. यानंतर, ८ मार्च २०२४ रोजी विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले. विधानसभेतून मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले. येथून १२…

Read More

धुळे : वृत्तसंस्था विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आणि अनेक गोष्टींची उकल केली असली तरी लोकांचा तंत्र-मंत्र, काळी नजर, काळी जादू आणि अघोरी कर्मकांड यावरील विश्वास काडीमात्र कमी झालेला नाही. असाच अघोरी पुजेचा खेळ धुळे जिल्ह्यातील मोहाडी (प्र. डांगरी) येथील स्मशानात मध्यरात्री सुरू होता. या अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाचे सारे सुरळीत चालले असताना एका शेतकऱ्याने त्याला हटकल्याने त्याने स्मशानातून पळ काढला. ‘त्या’ शेतकऱ्याने अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाची पूजा जवळून पाहिली. तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच घसरली. त्यास चांगलाच धाम फुटला, त्याचे पाय लटपटू लागले होते. अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाने एका बोकडाची मान धडावेगळी केलेली होती. दोन जीवंत कोंबड्यांचे पाय दोरीने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला होता आता महाराष्ट्रातील काही भागात थंडीसह उन्हाचा देखील दुपारी चटका बसू लागत आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात पुढील दोन दिवस फारसा बदल होणार नसला तरी या आठवड्यात तापमानातील बदल जाणवणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य आणि पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कमल तापमानाचा पारा हा 33 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यातील आकाश निरभ्र राहणार असून येत्या दोन ते तीन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंशाची वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू…

Read More

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध – बाराभाटी मार्गावर भीषण अपघात घडला आहे. चार चाकी वाहनानी दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी वरील तीन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका महिलेसह पाच महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे. तर या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी देवळगाव येथील रहिवासी असलेले संदीप राजू पंढरे हे आपली पत्नी चितेश्वरी पंढरे यांच्यासोबत दुचाकीवरून नवेगावबांध येथे जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा पाच महिन्यांचा मुलगा संचित पंढरे, पत्नी चितेश्वरी पंधरे आणि…

Read More

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज वडिलोपार्जित मालमत्ता संबंधित प्रश्‍न सुटतील. वैयक्तिक कामात व्यस्त राहाल. कोणाचाही वैयक्तिक बाबींपासून दूर राहणे हितकारक ठरेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार सोडून द्यावा लागेल, तरुणांच्या करिअरच्या चिंता दूर होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवास टाळा. कामात किंवा व्यवसायात सकारात्‍मक विचारातून घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मिथुन : मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची आणि विचारांची देवाणघेवाणीतून अनेक समस्या सहजपणे सोडवल्या जातील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. संशयी वृत्ती टाळून सकारात्मक विचार करत राहा. आज प्रवासाचे नियोजन असेल तर ते पुढे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार असून जळगाव शहराच्या जवळ चिंचोली येथे सर्व सुविंधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 650 खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार असून सिंचनाच्या दृष्टीनेही जिल्ह्यातील 8 प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर 1 लाख 94 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले, याप्रसंगी पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात आज 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सकाळी 10:30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्य पथवर तिरंगा फडकवणार आहेत. महाराष्ट्रातही प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजावंदन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यांनी तिरंग्याला सलामी दिली. महाराष्ट्र पोलिस दलाकडून राष्ट्रगीत सादर करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील प्रगतिशील शेतकरी तथा भाविक एकादशीच्या कार्यक्रमासाठी हाळदा, डकला येथे जात असतांना वाटेतच बसमध्ये त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मयत भाविक कडुबा हिरामण पाटील (वय ७६) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते येथील रोजगार हमी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष, तथा केवडेश्वर महादेव पतसंस्थेचे चेअरमन समाधान पाटील, अनिल पाटील यांचे वडील होत. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कानळदा येथे हौदामधील पाण्यात झोपून प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) तरुणीने या आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (२५ जानेवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका भंगाळे या तरुणीचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून ती मध्यंतरी पुणे येथे नोकरीलादेखील होती. पोलिस पाटील नारायण पाटील यांनी पोलिसात खबर दिली. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील दुध फेडरेशन रोडवर सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना घडल्यानंतर त्याच रस्त्यावर रात्री ९ वाजता पुन्हा भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्यामुळे सिकंदर दिलावर पठाण (५६, रा. राजीव गांधी नगर) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी (२५ जानेवारी) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दूध फेडरेशन रस्त्यावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत रेल्वे गेटकडून शिवाजीनगर उड्डाणपूलाकडे दोन दुचाकीस्वार “रेस” लावून जात होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या रेसमुळे हा अपघात झाला. सिकंदर पठाण हे पायी जात असताना त्यांना धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार काही अंतरावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडकला. सुदैवाने त्या ठिकाणी प्रवासी महिला बचावली. शनिवारी सकाळी…

Read More