Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शतपावली करत असताना नंदा विकास कोळी (३७, रा. दशरथ नगर) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनपोत दुचाकीस्वाराने ओढून नेत तो पसार झाला. चोरटा हा समोरून आला व दुचाकीचा वेग कमी करीत त्याने काही क्षणातच सोनपोत ओढली. ही घटना २५ रोजी जुना खेडी रोड परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्युटीपार्लरचा व्यवसाय असलेल्या नंदा कोळी या मैत्रिणीसह रात्री शतपावली करीत असताना जुना खेडी रोडवर समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून एक जण आला व त्याने कोळी यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची सोनपोत तोडून नेली. चोरट्याने सोनपोत ज्या ठिकाणाहून लांबविली त्या…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे या गावाजवळ शेत विहिरीत ३२ वर्षीय महिलेस एका तरुणाने ढकलून तो तेथून फरार झाला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. महिलेला विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व तिच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात सलमान पठाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, बऱ्हाणपूर येथील ही महिला सलमान पठाण (रा. पातोंडा, ता. लालबाग) याच्यासोबत रविवारी मनुदेवी दर्शनाकरिता आली होती. दुपारी १ वाजता ते शेतात नाष्टा करत होते. नाष्टा झाल्यानंतर या तरुणाने महिलेला विहिरीत किती खोल पाणी आहे, हे पाहण्यास सांगितले. ती विहिरीत डोकावत असताना तिला त्याने विहिरीत ढकलून दिले.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील साकेगाव महामार्गावर वाय पॉइंटलगत महामार्ग ओलांडत असताना अज्ञात भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने हरीण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. साकेगाव वनविभाग तसेच शेत शिवारामध्ये हरणांचे व निलगायींचे मोठ्या प्रमाणात कळप आहेत. मात्र, जंगलाचा होणारा ऱ्हास व वनविभाग हद्दीत सातत्याने होणारे गौण खनिजाचे उत्खनन आदी कारणांमुळे नीलगायी व हरीण हे आता महामार्गाकडे अर्थात रहिवासी परिसराकडे येऊ लागले आहेत. अशातच सोमवारी महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये हरीण जागीच ठार झाले. ठार झालेल्या हरीणाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. साकेगावकरांनी रस्त्यावर पडलेल्या हरणाला कडेला केले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी देहविक्री प्रकरणात शासकीय आशादीप महिला वसतिगृहात असलेली १९ वर्षीय बांगलादेशी तरुणी शनिवारी रात्री या वसतिगृहातील स्वच्छतागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पसार झाली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यात ही बांगलादेशी तरुणी आढळली होती. तिच्याकडे पासपोर्ट, व्हिसा अथवा भारतात वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे तिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २२ डिसेंबरपासून ही तरुणी शासकीय आशादीप महिला वसतिगृहात होती. हा प्रकार घडला त्यावेळी आशादीप वसतिगृहातील कनिष्ठ काळजीवाहक मनीषा किरण पाटील, सुरक्षारक्षक वैशाली विजय पाटील, महिला पोलिस परवीन तडवी या नाइट ड्युटीवर होत्या. तीन-तीनजणी असताना बांगलादेशी तरुणीने पलायन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीशी मैत्री करून नंतर तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला इंदूरसह शिरसोलीच्या जंगलात नेऊन तिच्यावर एकाने बलात्कार केला. हा प्रकार जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी नितेश धनराज राठोड याच्यासह त्याला मदत करणारे तीन जण अशा एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीशी नितेश राठोड (रा. धानवड, ता. जळगाव) याने मैत्री करून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. त्यानंतर तिचा एकटीचा तसेच सोबत काढलेले अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इंदूरमधील प्रीतमपूर भागासह शिरसोलीच्या जंगलात नेऊन तिच्यावर…

Read More

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही ध्‍येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम कराल. बेकायदाशीर कामात गुंतलेल्‍यांपासून सावध राहा. अचानक काही खर्च होऊ शकतात. आर्थिक प्रश्‍नी निर्णय घेण्यास अडचण येत असेल तर ज्‍येष्‍ठांचा सल्‍ला घ्‍या. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल. वृषभ : आज तुम्ही घेतलेला महत्त्वाचा निर्णय योग्‍य ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अतिआत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो, याची जाणीव ठेवा. संवाद साधताना नकारात्मक शब्द वापरू नका. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. मिथुन : आज कोणतेही काम घाई गडबडीत पूर्ण करण्‍याचा प्रयत्न करु नका. शांतपणे केलेली सर्व कामे योग्यरित्या पूर्ण होतील. सकारात्‍मक विचार तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल. स्वतःला श्रेष्ठ मानणे नुकसानकारक ठरेल.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रावेर ते सावदा रस्त्यावर गस्त करीत असताना अवैध वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे. रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. 26 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी सावदा गावाजवळ टाटा कंपनीच्या MH -04 FJ 3248 या क्रमांकाच्या मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता त्यात सागवान पलंगाचे चार नग व एक सोपासेट मिळून आले. या माला विषयी 27 वर्षीय वाहन चालक गणेश भीमराव खैरनार यास पास परवान्याची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. सागवान पलंग व सोपा मालाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यावर पाईपलाइन चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र दाखल गुन्ह्यानंतर ते फरार होते. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठाकडून सुनील महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामिनाला मंजुरी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महापालिका मालकीची जुनी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने २ डिसेंबर २०२४ रोजी काढली जात होती. या पाईप चोरीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र…

Read More

प्रयागराज : वृत्तसंस्था देशातील उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. देशभरासह परदेशातून देखील असंख्य भाविक रोज प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान आज ४६ लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणीत पवित्र स्थान केले. तर १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात १३. २१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात स्‍नान केल्‍याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे. महाकुंभात केवळ सामान्य लोकच नाही तर मोठे राजकीय व्यक्तिमत्व देखील सहभागी होत आहेत. गृहमंत्री अमित शाह आज (दि.२७) महाकुंभ मेळ्यासह, त्रिवेणी संगम स्नान तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यापूर्वी शहा यांनी उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी कुंभमेळा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. राज्य सरकारमधील गोंधळामुळे राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी तूर खरेदी केंद्र अद्याप सुरु होऊ शकते नाही, असा आरोप आ.पवारांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक हजार कोटींचा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावला गेला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे बहुमताच्या हवेत उडणाऱ्या राज्य सरकारने थोडे जमिनीवर येऊन गंभीरता दाखवत तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्ट माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे.…

Read More