जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ३४ हजार रुपये किमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना शाहूनगरातील एका घरात एमडी ड्रग्जचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्री ९ वाजता शाहूनगरातील सर्फराज जावेद भिस्ती (वय २३) याच्या घरी छापा टाकून ५ लाख ३४ हजार रुपये किमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्फराज जावेद भिस्ती याच्यावर यापूर्वीही आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हा संशयित आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.