Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी मॉर्निंग वॉक केल्यानंतर कारमध्ये बसल्यावर कारमालकाला जळण्याचा वास येऊन काही वेळातच कारने पेट घेतला. ही घटना शुक्रवारी (२४ जानेवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास लांडोरखोरी उद्यानानजीक घडली. कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने यात कारमालकाला कोणतीही इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शनगर परिसरातील गुरमीर सिंग हे त्यांची कार (क्र. एमएच १९ बीयू ३००१) लांडोरखोरी उद्यानाजवळ लावून आत फिरायला गेले होते. फिरून झाल्यानंतर ते कारमध्ये बसले व त्यांना काहीतरी जळका वास आला व सुरुवातीला धूर निघाला. त्यावेळी सिंग हे खाली उतरले आणि काही क्षणांत कारने पेट घेतला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या एका बंबद्वारे आग विझविली. या घटनेत कार पूर्णपणे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी परधाडे येथे झालेल्या रेल्वेत आग लागली, याची बोंब ठोकल्यामुळे एकाने रेल्वे बोगीतील चेन ओढली आणि रेल्वे थांबताच प्रवाशांनी उड्या घेतल्या. त्यामुळे १२ जणांचा समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला, या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचली आहे. त्यामुळे बोंब ठोकणारा रेल्वेतील चहा विक्रेता आता चौकशीच्या ‘रडार’वर आहे. पुष्पक एक्स्प्रेस जळगाव स्थानकावरून पाचोऱ्याकडे निघाली. तेव्हा काहीसा धूर निघत असल्याचे चहा विक्रेत्याने पाहिले. त्यानंतर त्याने आग लागल्याची बोंब ठोकली. त्यामुळे जनरल बोगीतील प्रवासी घाबरले. त्यातील एका चेन ओढली. त्यामुळे रेल्वेचालकाने वेग आवाक्यात आणत परधाडे स्थानकावर गाडी थांबविली. त्यानंतर जीवाच्या भीतीने प्रवाशांनी क्षणातच उड्या घेतल्या. तशातच समोरून कर्नाटक एक्स्प्रेस प्रतितास ११०च्या वेगाने…

Read More

मेष : आज इच्छित काम मार्गी लागेल;पण तुम्ही कायदेशीर अडचणीत सापडणार नाही, याची काळजी घ्‍या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, म्हणून तुमचे काम थोडी काळजी आणि प्रामाणिकपणे करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जास्त कामाचा ताण आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो. वृषभ : आज तुम्‍ही भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित केल्‍यास नक्कीच यश मिळेल. फोनद्वारे महत्त्वाचे करार मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घसादुखीचा त्रास संभवतो. मिथुन : सकारात्मक आणि संतुलित विचारसरणीमुळे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. न्‍यायालयात प्रलंबित प्रकरण असल्‍यास तुमच्या बाजूने निर्णय येण्याची शक्यता आहे. भावांसोबतचा वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहराचे विकासाचे व्हिजन असलेले आणि सर्वसामान्य जनतेसह सर्वपक्षीय मोट बांधणारे, सर्वांना आपलेसे असलेले नेतृत्व म्हणजेच प्रदीप भाऊ रायसोनी यांच्याकडे पाहिले जाते. प्रदीप भाई रायसोनी यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ज्यांना आपण राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणतो असे अमित एकनाथ पाटील यांनी देखील यासाठी पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून समजते. एका सोशल मीडियाच्या ग्रुप वर राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू अमित पाटील यांनी देखील परखड मत मांडले आहे. जळगाव शहराला प्रदीप रायसोनी यांच्या सारखे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व हवे. भाजपाला कधी एवढे यश मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मिळाले होते परंतु गिरीश…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसांनी छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र त्यापूर्वीच या चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शन झाला आहे. आता या ट्रेलरवरून वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छावा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे, तर माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करत आपली भूमिका मांडली आहे. या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीच्या तिकिटात वाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे तिकीट दरात 14.97 टक्के वाढ होणार आहे. ही दरवाढ आजपासून (24 जानेवारी) लागू होईल. तसेच एसटीसोबत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही वाहनांच्या दरात 3 रूपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. लालपरीचे भविष्य अंधांतरी होते. हे वाटत असताना दररोज तीन कोटी रूपयांचे नुकसान होत होते. ते दरवाढीमुळे कुठेतरी कमी होईल. प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसतो.…

Read More

भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील भंडारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. याठिकाणी असलेल्या आयुध निर्माण कंपनीत स्फोट होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना जवाहरनगर येथून समोर आली आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही. या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, “काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील,” असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सह-जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, तसेच गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते. काल झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल व विघ्नहर्ता रुग्णालय येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सर्व नऊ जखमींना गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात कालपासून शरद पवार व अजित पवार एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच आता शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले कि, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. तर या संदर्भात सामंजस्याने प्रश्न सुटावा असे आमच्या नेत्यांचे मत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे संकेत शरद पवार यांनी यांदी दिले आहेत. इतकेच नाही तर अजित पवार यांच्याशी केवळ एका प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली आहे. आमच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेतील संशयित राहुल ऊर्फ प्रेम शांताराम सोनवणे (वय २१) व शैलेश ऊर्फ पंकज शांताराम सोनवणे (वय २६, दोन्ही रा. बौध्द वसाहत पिंप्राळा हुडको) हे दोघे कानळदा रस्त्यावरील शेतात लपून बसले होते. रामानंद नगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुकेश रमेश शिरसाठ या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याची निर्घण हत्या केली होती. त्यातील दोघे फरार होते. पो.नि. राजेंद्र गुंजाळ यांनी गुप्त माहिती मिळाल्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक फौजदार संजय सपकाळे, हवालदार इरफान मलिक, हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, रवींद्र चौधरी, उमेश पवार व जुलालसिंग परदेशी…

Read More