जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील देऊळगाव येथे फत्तेपूर पोलिसांचे वाहन गस्तीवर असताना बुधवारी मध्यरात्री १च्या सुमारास त्यांना देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) येथे विनाक्रमांकाचे वाहन आढळून आले. चालकाशेजारील दोघांना उतरवून चौकशी करीत असताना चालकाने वाहन धामणगाव बढेकडे पळवून नेल्याचा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार मुकेश शालीग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री ११च्या सुमारास पोलिस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त घालत असताना मध्यरात्री १च्या सुमारास देऊळगाव गुजरी येथे संशयित वाहन आढळून आले. चालकाशेजारी बसलेले शेख मुजम्मिल शेख रफिक कुरेशी (२७, माळीखेल, कुरेशी वाडा, बुलढाणा) व रहीम शाहा रहेमान शाहा (४४, बऱ्हाणपूर रोड, जळगाव, मूळ रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद) यांना खाली उतरवून…
Author: editor desk
भडगाव : प्रतिनिधी निंभोरा गावातील तरुणांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून निंभोरा येथील २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना तरवाडे पेठ (ता. चाळीसगाव) येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी निंभोरा येथील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश विकास पाटील (२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला निंभोरा गावातीलच काही तरुण मागील भांडणातून सतत छळत होते. त्यामुळे कल्पेश याने आपल्या मावशीच्या गावी तरवाडे पेठ येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताचे वडील विकास यादव पाटील (निंभोरा) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संशयित देवेंद्र गोरखनाथ पाटील, कुणाल पाटील, अनिल पाटील, आशा पाटील,…
पाचोरा : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीस्वारास मागून जोरदार धडक देत चिरडले. एका पाणीपुरीच्या गाडीला धडक देत त्यास गंभीर जखमी केल्याची घटना दि. २३ रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून गेलेल्या महामार्गावर आशीर्वाद हॉलसमोर नाशिकहून भुसावळकडे राख भरण्यासाठी जात असलेल्या भरधाव डंपर (एमएच १५/एचझेड८८७९) ने त्याच मार्गावरून पुढे जात असलेल्या दुचाकीस्वार हिरालाल काशिनाथ साळवे (५८, गाडगेबाबा नगर, पाचोरा) याला मागून जोरदार धडक दिली. पुढे पाणीपुरीची गाडी घेऊन जात असलेल्या एका परप्रांतीयास या डंपरने धडक देत त्यास जखमी केले. डंपरचालक पवनकुमार महातो (३७, कडोरमा, झारखंड) हा दारूच्या नशेत वाहन चालवत होता. लोकांनी चालकास अडवून त्यास मारहाण करत…
मेष : आज तुम्हाला नवीन संधीचा लाभ घेता येईल. प्रलंबित आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाल; पण तुमची एखादी लहानशी प्रतिक्रिया देखील मोठे नुकसान करू शकते. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ : आज आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. नाते चांगले ठेवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे चांगले ठरेल. घरातील बहुतांश कामे सुरळीत पार पडतील. मिथुन : आजचा दिवस तुम्ही आवडीनुसार व्यतित कराल. कोणावरही अविचारी टीका केल्याने तुमची बदनामी होवू शकते. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात फायदा होईल. रक्तदाबाची समस्या असलेल्या काळजी घ्यावी. कर्क : आज मनोबलाच्या…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यासह केंद्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे तर राज्यात भाजप मोठा पक्ष ठरलेला असतांना आता विरोधक टीकास्त्र सोडत असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, केवळ सत्ता आली म्हणून सत्तेच्या बाजूने येणाऱ्यांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही. या संदर्भात आमची तीनही पक्षांची चर्चा झाली असून महायुतीला धक्का लागणारे नव्हे तर फायदा असलेले प्रवेश होतील, असे स्पष्ट केले. नागपूर येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. गेले काही दिवस शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येण्याच्या बाबतीत तसेच उद्धव ठाकरे शिवसेना एनडीएत सामील होण्याबाबत…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीवर गेल्या काही दिवसपासून महाविकास आघाडीचे नेते टीकास्त्र करीत असतांना व सध्या महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरु असलेल्या वादावर नेते प्रतिक्रया देत असतांना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून राज्यातील राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे. अजित पवार म्हणाले कि, बाबासाहेब पाटील यांना पवार साहेबांशी काही बोलायचे होते, त्यामुळे ते साहेबांजवळ जाऊन बसले. माझा आवाज मोठा आहे. त्यामुळे मी कोठूनही बोललो, तरी आवाज साहेबांपर्यंत जातो, असा खुलासा त्यांनी केला आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी अजित पवार आणि शरद पवार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आपल्या कॉमेडियन स्वभावामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्मा बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कॉमेडियन कपिल शर्माला पाकिस्तानातून ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. कपिलशिवाय अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. ई-मेलमध्ये लिहिले आहे – आम्ही तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही एक संवेदनशील बाब तुमच्या निदर्शनास आणून दिली आहे. हा सार्वजनिक स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला हे गांभीर्याने घेण्याची आणि गोपनीयता राखण्याची विनंती करतो. पाकिस्तानच्या ई-मेलच्या शेवटी लिहिले आहे- जर हे केले नाही तर त्याचा तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोढरे येथील एका व्यक्तीने चारचाकी गाडीसंदर्भात फसवणूक झाल्याची फिर्याद चार वर्षांपूर्वी दिली होती. याप्रकरणी चारचाकी गाडीसह दोन संशयित पसार झाले होते. या प्रकरणात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी चारचाकी हस्त केली असून यापूर्वीच एकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोढरे येथील गुलाब बाबू राठोड यांनी २८ जुलै २०२१ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांच्या मालकीची ६ लाख १५ हजार रुपये किमतीची महिंद्रा एक्सयूव्ही- ५०० ही चारचाकी (एमएच- १७, एझेड ९१७१) बाबत फसवणूक झाल्याचे म्हटले होते. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करत होते. या गुन्ह्याच्या तपासात एक संशयित आरोपी नितीन…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कूलजवळ एसटी बस व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील खडके येथील महिला जागीच ठार तर त्यांचा पती गंभीर जखमी झाल्याची घटना २१ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. अरुणाबाई समाधान राजपूत (वय ४९) असे मयत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दरम्यान, खडके येथील अरुणाबाई राजपूत व त्यांचे पती समाधान रुपसिंग राजपुत हे दुचाकीने अमळनेरकडून खडके येथे जात होते. मंगरुळ जवळील सेंट मेरी हायस्कूलजवळ समोरून येणाऱ्या कल्याण ते रावेर एसटी बसने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या अरुणाबाई राजपूत या जागीच ठार झाल्यात. तर समाधान राजपूत हे गंभीर जखमी झाले असून…
यावल : प्रतिनिधी तडवी कॉलनीत नगरपालिकेचा जलकुंभ आहे. या जलकुंभात सुरक्षा रक्षक नेमलेला आहे. बुधवारी रात्री याच सुरक्षा रक्षकाने जलकुंभाच्या पाण्यात आक्षेपार्ह कृत्य केल्याचा संशय काहीजणांनी व्यक्त केला आणि नगरपालिकेकडे तक्रार केली. नगरपालिकेने तातडीने दखल घेत संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करून त्याला कामावरून कमी केले आणि जलकुंभातील पाणी फेकून जलकुंभ धुवून पुन्हा स्वच्छ करण्यात आला आहे. या जलकुंभात तब्बल तीन लाख लिटर शुद्ध पाणी होते. मोठ्या प्रमाणावर सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. सुरक्षा रक्षकानेच बुधवारी रात्री जलकुंभातील पाण्यात आक्षेपार्ह कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याची नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे दादू…

