जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसीमधील ई-सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीच्या कार्यालयातून तीन चोरट्यांनी तीन लाखांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जिग्नेश शरद शेठ (वय ४५) यांची एमआयडीसी सेक्टर ई मध्ये ग्रीन एन इको सोल्युशन नावाची कंपनी आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ऑफिसमधील ड्रॉवर तोडून आत ठेवलेली ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा सर्व प्रकार कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीला आल्यानंतर कंपनीचे मालक जिग्नेश शरद शेठ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.