पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील पुणे येथील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबतीत ते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्याला कारणही तसेच आहे. रवींद्र धंगेकर यांनी व्हाट्सअपला स्टेटस ठेवत सगळ्यांच्या नजरा खिळवल्या आहेत. गळ्यात भगवा परिधान करून धंगेकर यांनी ‘शहा का रुतबा’ हे गाणे त्याला लावले आहे. त्यामुळे आता धंगेकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये भारतीय…
Author: editor desk
जालना : वृत्तसंस्था राज्यातील जालना येथे मजुराच्या पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मध्यरात्री साडेतीन वाजता दुर्दैवी घटना घडली. महिला आणि १३ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले, पण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी – चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम करणारे मजूर होते.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना घडली. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था ‘आरोप झाल्यावर मंत्र्यांनी एक क्षणही पदावर राहणे योग्य नाही. हा त्यांचा दोष आहे. मंत्र्यांचे आचरण, विचार शुद्ध असायला हवेत. जीवन निष्कलंक हवे. अपमान सहन करण्याची शक्ती असेल तरच जनता तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे अनुकरण करील,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. अशा व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वीच विचार होणे आवश्यक होते, अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या प्रमुखांचे कानही टोचले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अण्णांनी ही प्रतिक्रिया दिली. पण त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. हजारे म्हणाले, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गोंदेगाव ते रोटवद दरम्यान रस्त्याच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० फेब्रुवारीला रात्री साडेदहा वाजता घडली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील रोटवद येथील देवकाबाई शिवाजी मराठे (वय ५५) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी शिवाजी मराठे हे आपली आई देवकाबाई मराठे यांच्यासोबत २० फेब्रुवारी रोजी नातेवाईकांकडे चिंचपुरा गावाला गेले होते. तेथील काम आटोपून घरी परतत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात देवकाबाई मराठे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कॉन्ट्रॅक्टरने रस्त्यावर…
जळगाव : प्रतिनिधी वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् तिथेच उद्योजकाला जाळ्यात अडकवून फ्रेंचाइजीच्या नावाने ३९ लाख ५० हजार रुपयात गंडविण्यात आले. अशोक गिरधर बियाणी (६८, रा. गणपतीनगर) असे उद्योजकाचे नाव आहे. दीपेश कमलेश रूपानी (रा. श्रीराम कॉलनी) व आकाश सूरजमल सिध्दू उर्फ आकाश वर्मा (रा. अमरावती) या दोघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अशोक बियाणी यांचा मुलगा निकुंज बियाणी याला दीपेश रूपानी याने हर्बोलाईफचे वजन कमी करण्याचे उत्पादन – विकत दिले होते. नंतर फ्रेंचाइजी घेण्याचा सल्ला देत गुंतवणूक करण्यास सांगितले. रूपानी व कंपनीचे व्यवस्थापक आकाश वर्मा या दोघांनी योजना सांगून फसवणूक केली. सायबर…
जळगाव : प्रतिनिधी खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटताच भावासोबत घरी शाहू नगराकडून जात असताना प्रतीक हरिदास निंबाळकर उर्फ पपई (२८, रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर मारेकरी तिथून लगेच पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता शाहू नगरात घडली. भूषण भरत सोनवणे (वय २५. रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्या खुनाच्या गुन्ह्यात प्रतिक चार वर्षापासून कारागृहात होता. या खुनाचा बदला म्हणून प्रतिकच्या खुनाचा प्रयत्न झाला. सविस्तर वृत्त असे कि, ८ नोव्हेंबर २०२० रोजी भूषण भरत सोनवणे उर्फ अठ्ठा याचा खून झाला होता. या गुन्ह्यात प्रतिकला अटक झाली होती. २१ रोजी सायंकाळी कारागृहातून सुटका झाली. प्रतिक याला ९…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील परसाडे येथील शेतकऱ्याच्या खळ्याला गुरुवारी अचानक आग लागली. यातएका बैलाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसरा बैल भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. खळ्यातील शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, परसाडे येथील शेतकरी प्रभाकर शंकर पाटील यांचे गावालगत खळे आहे. या खळ्यात गुरुवारी अचानक आग लागली. आग लागल्याचे निर्दशनास येताच नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावल नगरपालिकेचा अग्निशमनबंबही दाखल झाला. फायरमॅन कल्पेश बारी, कैलास काटकर, शिवाजी पवार यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. आग लागताच नागरिकही मदतीला सरसावले. मात्र आगीचे रौद्ररूप धारण…
जळगाव : प्रतिनिधी रेल्वेत चढताना तोल जाऊन पडल्याने जळगावातील पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरातील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे येथे मंगळवारी सायंकाळी घडली. चेतन (जय) दिनेश पाटील (२०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, तो गेल्या काही दिवसांपूर्वीच पुणे येथील एका कंपनीत नोकरीला लागला होता. मंगलवारी सायंकाली तो रेल्वेत चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्यातच त्याचा अंत झाला. रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडील मोबाइलवरील क्रमांकावरून चेतन याच्या मामाला या घटनेची माहिती दिली. यानंतर चेतन याच्या परिवाराला अपघाताची माहिती देण्यात आली. त्याचा मृतदेह बुधवारी दुपारी जळगावात आणण्यात आला. त्यावेळी आई, वडील आणि नातेवाइकांनी एकच आक्रोश…
मेष राशी आज कामातील अडथळे दूर होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची नवीन व्यवसायाकडे आवड वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक आनंदाचा आणि प्रगतीचा असेल. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज ज्या लोकांकडून तुम्हाला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे ते तुमचा विश्वासघात करतील. पैशाच्या कमतरतेमुळे तुमचे काही महत्त्वाचे काम बिघडेल. अपेक्षेप्रमाणे विक्री न झाल्यास व्यवसायात फायदा होणार नाही. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. मिथुन राशी प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांमधील मतभेद वाढू शकतात. त्यामुळे विश्वास कमी होऊ शकतो. प्रेमात एकमेकांबद्दल विश्वासाची भावना ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कर्क राशी आज तुमची तब्येत थोडी नरम राहील. जे गंभीर आजाराने…
चाळीसगाव / मुंबई – जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या चाळीसगाव वासियांना आनंदाची बातमी मिळाली आहे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून केंद्र व राज्य पुरस्कृत अमृत २.० योजनेंतर्गत थेट गिरणा धरणावरून १५० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. सदर योजनेमार्फत शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी गिरणा धरणावरून वाढीव ४.०२३ दलघमी बिगरसिंचन पाणी आरक्षण प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले असून जलसंपदा मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने आज दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय प्रकाशित केला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहर वासीयांची सन २०५६ पर्यंतची म्हणजे पुढील ३० वर्षांची…

