Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी !
    क्राईम

    रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी !

    editor deskBy editor deskFebruary 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील गोंदेगाव ते रोटवद दरम्यान रस्त्याच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० फेब्रुवारीला रात्री साडेदहा वाजता घडली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील रोटवद येथील देवकाबाई शिवाजी मराठे (वय ५५) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी शिवाजी मराठे हे आपली आई देवकाबाई मराठे यांच्यासोबत २० फेब्रुवारी रोजी नातेवाईकांकडे चिंचपुरा गावाला गेले होते. तेथील काम आटोपून  घरी परतत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात देवकाबाई मराठे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

    दरम्यान, कॉन्ट्रॅक्टरने रस्त्यावर काम सुरू करताना कोणत्याही प्रकारचा सूचना फलक लावलेला नव्हता, त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप रोटवद येथील ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे पाईप टाकलेले  असताना त्यावर केवळ माती टाकली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने अपघात होत आहे, असा ही आरोप नागरिकांनी केला आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.