Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ३४ हजार रुपये किमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना शाहूनगरातील एका घरात एमडी ड्रग्जचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्री ९ वाजता शाहूनगरातील सर्फराज जावेद भिस्ती (वय २३) याच्या घरी छापा टाकून ५ लाख ३४ हजार रुपये किमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

मेष राशी आज तुम्हाला व्यवसायात असे यश मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. तुम्हाला राजकीय मोहिमेची कमान मिळू शकते. त्यामुळे समाजात तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत अधीनस्थ आणि वरिष्ठांशी चांगला समन्वय राहील. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. वृषभ राशी आज आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. जमीन, इमारत, वाहन इत्यादी खरेदी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वर्तन संतुलित ठेवा. अन्यथा आर्थिक नुकसान आणि बदनामी होऊ शकते. मिथुन राशी आज कौटुंबिक बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. जे तुमच्या मनाला शांतता देईल. नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यासात व्यस्त राहून विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रेमसंबंधांमध्ये परिस्थिती फारशी चांगली राहणार नाही.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एक कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की एक पद मिळायचे, असा गौप्यस्फोट नीलम गोऱ्हे यांनी केला. नीलम गोऱ्हे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर ठाकरे गटानेही सडेतोड उत्तर दिले. त्यांना 4 वेळा आमदार केले, त्यांनी 8 मर्सिडीझ दिल्या का? असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. सध्या दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. साहित्य संमेलनात…

Read More

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूकिनंतर आता स्थानिक निवडणुकीकडे सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात गाठीभेटी सुरु झाल्यास असून आता शिंदेसेना मनसेही फोडण्याचा उद्योग करत असल्याने राज ठाकरे प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यांनी आॅपरेशन टायगरचे जनक, उद्योगमंत्री उदय सामंत यांना आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी बोलावून घेतले आणि त्यांची खरडपट्टी काढली. मनसेच्या काही जिल्हाध्यक्षांना शिंदेसेनेने आॅफर दिल्याचे कळताच राज भडकले. दुसऱ्यांचे नेते किती दिवस पळवणार? पक्षबांधणीसाठी स्वतः पदाधिकारी घडवावे लागतात. मनसे फोडण्याचा विचारही करू नका, अशा शब्दात त्यांनी सामंत यांना सुनावले, अशी माहिती सूत्रांनी दिली. सामंत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही ऑफर दिली जात आहे. त्यासाठी सामंतांच्या पुढाकाराने मंत्री शंभूराज…

Read More

धरणगाव :  प्रतिनिधी धरणगाव-एरंडोल रस्त्यावरील अंबिकानगर येथे दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला. सविस्तर वृत्त असे कि, या अपघातात पहिल्या दुचाकीवरील किरण पुंडलिक मराठे (३५, रा. बोरखेडा बुद्रुक) आणि दुसऱ्या दुचाकीवरील राकेश दुपसिंग बारेला (४५), शानूबाई राकेश बारेला (३५) आणि कानबाई राकेश बारेला (५ वर्ष, रा. चाचपणी, दुधखेडा बलवाडी, मध्य प्रदेश) हे जखमी झाले. यात शानूबाई हिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह धरणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे

Read More

जळगाव : प्रतिनिधी एका गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकातील महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आठ महिलांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. दरम्यान, यातील चार महिलांना याआधी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक झाली आहे. आता या गुन्ह्यातही त्यांना अटक होणार आहे. सविस्तर वृत्त असे कि, रामानंद नगरचे पोलिस पथक २० रोजी एका आरोपीला अटक करण्यासाठी पिंप्राळ्यातील हुडको भागात गेले असता तेथे जुन्या भांडणाच्या कारणावरून विद्या शंकर सोनवणे (वय २१) या तरुणीस व तिच्या कुटुंबाला घरात जाऊन मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. हा वाद मिटवत असताना लक्ष्मी अनिल हरताळे, ललित निळकंठ शिरसाठ, उज्ज्वला रमेश…

Read More

यावल : प्रतिनिधी भालोद गावाजवळ मजुरांनी भरलेली चारचाकी उलटल्यामुळे त्यातील १८ जण जखमी झाल्याची घटना शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील हिंगोणा येथून काही मजूर भालोद येथे हरभरा कापणीसाठी जाताना ही घटना घडली. भालोद, ता. यावल गावाच्या पुढे चारचाकी वाहन उलटले. हे वृत्र वाऱ्यासारखे परिसरात पसरले. यामुळे नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींमध्ये लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत मजुरांचा समावेश आहे. अपघातात गोदीबाई बारेला, शारदा मुंगीलाल बारेला (वय १०), दिपाली जगदीश बारेला (वय ८), मंगू जगदीश बारेला (वय २०), प्रमिला बारेला (वय २१)…

Read More

मेष राशी रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित लोक हळूहळू त्यांच्या व्यवसायात सुधारणा करतील. विवेक वापरा. दिवस तुमच्यासाठी समान लाभ आणि प्रगतीचा काळ असेल. काम संथ गतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक बाबतीत, तुमची वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन पावले उचला. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कामांबाबत बोलणी होईल. मिथुन राशी आज प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर करा. सामाजिक नियमांचे पालन करा. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य राहील. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय वाढेल. कर्क राशी न्यायालयीन प्रकरणातील अडथळे दूर होतील. काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने समाजात तुमचा प्रभाव वाढेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर…

Read More

मालवण : वृत्तसंस्था पुणे, हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. एका युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दि.२२ सकाळी ११. २० च्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली. रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय २४) यांच्यावर उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते.…

Read More

भडगाव : प्रतिनिधी भडगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर आता मोठी कारवाई करीत दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. सत्यपाल दत्तात्रय निकम (रा. वडजी, ता. भडगाव) असे अटक केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी शेख मुनाफ शेख युसुफ (वय ३५, व्यवसाय – महा. बॅटरी दुकान, रा. हकीम नगर, भडगाव) यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान, भडगाव शहरातील बाळद रोड परिसरातून त्यांच्या दुकानासमोर उभी असलेली १०,००० रुपये किमतीची लाल रंगाची बजाज सी.टी. १०० मोटारसायकल (क्र. एमएच १९ एए १०९६) अज्ञात चोरट्याने…

Read More