Author: editor desk

भडगाव : प्रतिनिधी शेळ्यांच्या बंदिस्त वाड्यावर हल्ला करून बिबट्याने १४ शेळ्या ठार केल्या. ही थरारक घटना वाडे ता. भडगाव येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाडे येथील पोलिसपाटील भूषण फकिरा पाटील यांचे बेलवाडी शिवारात शेत आहे. शेतातच बंदिस्त शेड बांधून त्याठिकाणी शेळ्या सोडण्यात आल्या होत्या. या शेडला सभोवताली ताराची उंच जाळी बसवलेली आहे. तरीही बिबट्याने जाळी आणि शेडवर चढून १४ शेळ्या ठार केल्या. रात्री केळीला पाणी देऊन तसेच शेळ्यांना चारा-पाणी देऊन हे शेतकरी घरी निघून गेले. भूषण पाटील व भाऊ कृष्णराम पाटील हे दोघेही सोमवारी सकाळी शेतात गेले असता शेळ्या मृतावस्थेत आढळून…

Read More

मेष श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही आवश्यक काम वेळेवर पूर्ण कराल. कठीण कामात यश मिळाल्‍याने तुमची प्रतिमा उजळून निघेल. खर्च वाढल्यामुळे आर्थिक नियोजन करावे लागले. झटपट यशासाठी बेकायदशीर कृत्‍यांमध्‍ये सहभागी होवू नका; अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. व्यवसायात नवीन योजना राबवण्यासाठी हा चांगला काळ आहे. काही समस्येमुळे घरात संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. वृषभ श्रीगणेश सांगतात की, आज दिवसाची सुरुवात उत्तम राहील. संपर्कक्षेत्रात झालेली वाढ फायदेशीर ठरेल. तुम्हाला स्वतःला उर्जेने परिपूर्ण वाटेल. घरात कोणतेही शुभ काम देखील पूर्ण होऊ शकते. यावेळी सार्वजनिक कल्याणकारी कामांमध्ये तुमची आवड वाढेल. घर बदल किंवा प्रवासाशी संबंधित काही प्रकारचा ताण देखील असू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी नेहमीच जात असतात. मात्र आता शिर्डीहून मुक्ताईनगरला परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पती व तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडला आहे. मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. असून जखमींवर उपचार सुरू आहेत या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय 46) हे आपल्या पत्नी रुपाली पाटील (वय 40) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12.30 वाजता…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे व शिंदे गटाच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता विधानसभा 2014 निवडणुकीत नीलम गोऱ्हे यांनी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप नाशिक महापालिकेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केला. बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही पैसे मागितले नाही. शिवसेनेने अनेक पद दिली, पण पैसे घेतले नाही. परंतु नीलम गोऱ्हे यांच्याकडून मी माझे पैसे परत घेतले, असेही विनायक पांडे यांनी म्हटले. पुण्यातील ठाकरे गटाचे गटनेते अशोक हरनावळ यांनीही नीलम गोऱ्हे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. मी शिवसेनेचा शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपमहापौर, महापौर होतो पण शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरे यांनी कधीही माझ्याकडून पदासाठी एक रुपयाही मागितलेला नाही. फक्त त्यांनी…

Read More

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंप व नायरा पंपाच्यामध्ये रस्ता दुभाजकाला इर्टिगा धडकली. गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतल्याने गाडी आणि गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांसह दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्दैवी घटना दि. २४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचले असून यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना माहिती दिली तसेच अग्निशामक दल यांनादेखील ताबडतोब माहिती दिली. सविस्तर वृत्त असे कि, जामखेड नगरपरिषदच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले.…

Read More

चोपडा : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गांजाची कारवाई सुरु असतांना नुकतेच चोपडा ते धरणगाव रोडवरील निमगव्हाण गावातील बसस्थानक समोरील हॉटेल मनोज समोरील रोडवर दुचाकीवरून गांजाची वाहतूक करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यानी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि.२३ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार स्थागुशा पथकातील पीएसआय. गणेश वाघमारे, अनिल जाधव, पो.हे.कॉ.दिपक माळी, पो.हे.कॉ. रवींद्र पाटील यांनी चोपडा ग्रामीण.पो.स्टे.गु. र.न.26/2025 NDPS अंतर्गत 22B,20,प्रमाणे चोपडा ते धरणगाव रोडवरील निमगव्हाण गावातील बसस्थानक समोरील हॉटेल मनोज समोरील  रोडवर आरोपी नामे अमित दिलीप बरडे वय 22 वर्ष रा.जोगवाडा ता.नेवाली जि.बढवाणी म.प्र.हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल Zupeter…

Read More

जळगाव : प्रतिनिधी किर्तन सुरु असतांना त्याठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांकडून शिवीगाळ करीत गोंधळ घातला जात होता. त्यांना शिवीगाळ करु नका असे म्हटल्याचा राग आल्याने सुमारे वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने बिजासन फकिरा घुगे (वय २९, रा. महादेव मंदिराजवळ मेहरुण) या तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास मेहरुण परिसरातील महादेव मंदिरजवळ घडली. अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात पळापळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील महादेव मंदिराजवळ महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी किर्तन सुरु असतांना त्याच परिसरात काही तरुण क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळतांना त्या तरुणांकडून गोंधळ घालून शिवीगाळ केली जात होती.…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील कुन्हाड खुर्द येथे सप्टेंबर २०२४मध्ये झालेल्या बैलजोडी चोरीचा तपास पोलिसांनी लावला असून, या प्रकरणात सहापैकी चारजणांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कुन्हाड खुर्द येथील नंदकिशोर वसंत शिंपी यांच्या मालकीची ४५ हजार रुपये किमतीची एक बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनला दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगाव हरे. पोलिसांनी या गुन्ह्याचा संयुक्तपणे तपास करत गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात गोपाळ शाम पांचाळ (वय २३), आशिष उत्तम पाटील (१८), अंकुश ऊर्फ आकाश दगडू तडवी (२०, कुन्हाड,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी विसनजी नगरातील स्वीट मार्टजवळ घडली. याप्रकरणी तरुणांविरुद्ध परस्परविरोधात दोघा दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील विदगाव येथील यश संजय कोळी (वय २०) आणि संशयित अरबाज खान (रा. धरणगाव) हे दोघे एकाच ठिकाणी कामाला आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोघेही कामावर असताना ‘औषधांचा ट्रे व्यवस्थित लाव’ असे सांगितल्याचे वाईट वाटल्याने अरबाज खान याने यश कोळी याला शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी यश कोळी याने दिलेल्या तक्रारीवरून अरबाज खान याच्यासह इतर दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसीमधील ई-सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीच्या कार्यालयातून तीन चोरट्यांनी तीन लाखांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिग्नेश शरद शेठ (वय ४५) यांची एमआयडीसी सेक्टर ई मध्ये ग्रीन एन इको सोल्युशन नावाची कंपनी आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ऑफिसमधील ड्रॉवर तोडून आत ठेवलेली ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा सर्व प्रकार कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीला आल्यानंतर कंपनीचे मालक जिग्नेश शरद शेठ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली…

Read More