Author: editor desk

वरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोहर्डी गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी १८ रोजी रात्री ८. ३० वाजता लोंखडी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे. नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रालाचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरून नागपूर कडून भुसावळकडे येणारा ट्रक क्र सी जे १५ वाय वाय ९८१९ लोखंडी साहित्य घेऊन गुजरातकडे जात होता. दरम्यान तालुक्यातील बोहर्डी गावा जवळील नागराणी पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. ट्रक चालक मेराजुल अन्सारी रेहमान अन्सारी रा. गोखुला मिसवा मोलहारी (बिहार) हा जागीच ठार झाल्याची घटना घडली. ट्रक उलथल्यामुळे त्यातील लोखंडी रॉड, पाईप रस्तावर पडल्यामुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अजिंठा चौफुली येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी मध्यरात्री २ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन चालकांसह त्यांच्या टँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अजिंठा चौफुली येथे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिस पथक मंगळवारी रात्री २ वाजता गस्तीवर असताना अजिंठा चौफुली येथून संशयास्पदरीत्या जाणारे दोन टँकर त्यांनी थांबवले. त्यावेळी चालकांची चौकशी केली असता दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.  पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही टँकरमध्ये बायोडिझेल भरलेले आढळून आले. पोलिसांनी (जीजे १२ बीटी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अयोध्यानगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात आर्थिक कारणावरून वाद झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी संशयित आरोपी स्वतःहून पोलिस स्टेशनला जमा झाला आहे. मोहित सुनील चौधरी (२४, रा. भादली, ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील (२३, रा. हनुमान नगर) याच्याशी मोहितची मैत्री होती. दोघांमध्ये यापूर्वी आर्थिक देवाण-घेवाण झालेली होती. या कारणावरून बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अयोध्या नगरातील हनुमान मंदिराजवळ मोहित चौधरी हा आला असता धीरज पाटील याच्याशी त्याचा वाद झाला. या वादातच धीरज पाटील याने मोहितच्या पोटावर सपासप चाकूचे…

Read More

यावल : प्रतिनिधी चोपडा रस्त्यावर सावखेडासीम या गावातून दोन ट्रॉल्यामध्ये ऊस भरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना वाघोदा पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाले आणि थेट पुलावरून नदीपात्रात कोसळले. या दुर्घटनेत ३२ वर्षीय चालक जागीच ठार झाला. २० वर्षीय क्लीनर हा गंभीर जखमी आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सावखेडासिम येथून दोन ट्रॉल्यांमध्ये ऊस भरून चालक राकेश जयराम बारेला (वय ३२, रा. छोटी शिरवेल, ता. सेंधवा, जि. बडवाणी मध्यप्रदेश) हा ट्रॅक्टर (एम. एच. १९/ सी. व्ही. ११२४) घेऊन हा चोपड्याला जाताना वाघोदा गावाजवळ नदीच्या पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाले आणि थेट पुलावरून ते नदीत कोसळले. या अपघातामध्ये राकेश बारेला…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी पूर्ववैमनस्यातून वाद होऊन २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना पाचोरा येथील बाहेरपुरा भागात मंगळवारी रात्री १२:३० वाजता घडली. ई यात संशयिताला अटक झाली आहे. सविस्तर वृत्त अस कि, शहरातील महात्मा फुलेनगर येथील रहिवासी हेमंत संजय सोनवणे (वय २०) असे खून ना झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री तो मित्रांसोबत घरी जात असताना बाहेरपुरा भागातील व्ही. पी. रोडवर रोहित गजानन लोणारी (२३, रा. शिवकॉलनी, पाचोरा) याने हेमंत याच्याशी वाद घातला. रोहितने कमरेला असलेला चाकू काढून हेमंत याच्या पोटात खुपसला. मारेकरी तिथून पसार झाला. पोलिसांनी हेमंतला खासगी दवाखान्यात दाखल केले. नंतर त्याला लागलीच जळगाव…

Read More

मेष राशी श्रीगणेश सांगतात की, आज कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवला जाईल. मित्रांसोबत भेटीगाठी फायदेशीर ठरतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधताना काळजी घ्‍या. लहानशा निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. व्यावसायिक कामे सुरळीत सुरु राहतील. वृषभ राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज संवाद कौशल्‍याने इतरांवर प्रभाव टिकवून ठेवाल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. घरात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे आगमन देखील एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करू शकते. तुमच्या गुणांचा सकारात्मक पद्धतीने वापर केला तर चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा. मिथुन राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही पैशाशी संबंधित काही नवीन धोरणे राबविण्‍यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक सुखसोयींवरही खर्च…

Read More

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षापासून मनोज जरांगे पाटील अनेक उपोषण व आंदोलन करीत असतांना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यांनी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला असून या विषयी ते सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. यातच जरांगे पाटील हे शिवजयंती निमित्ताने धाराशिव आले होते. या कार्यक्रमात त्यांनी मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. मराठा आरक्षणाची मागणी दडपण्यासाठी सरकारनं दोन मंत्र्यांच्या सोबतीनं नवं आंदोलन उभारण्याचा डाव रचल्याचा खळबळजनक दावा यावेळी बोलताना त्यांनी केला आहे. तसेच हे आंदोलन उभे करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या दोन मंत्र्यांच्या चर्चा झाली असल्याचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव शहरात भव्य जिल्हास्तरीय “जय शिवराय, जय भारत” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, राष्ट्रीय सेवा योजना आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या पदयात्रेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शुभारंभ आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी 9 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे आणि चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरासह महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींनी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले असून, सोशल मीडियावरदेखील शिवरायांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनीही पोस्टद्वारे छत्रपती शिवरायांच्या शौर्याला नमन केले आहे. पण, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी X वर पोस्ट करताना मोठी घोडचूक केली आहे. त्यामध्ये X (ट्विटर) वर अभिवादन करताना, छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी चक्क श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील X वरुन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. मात्र, त्यांच्या पोस्टमध्ये मोठी घोडचूक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीचा…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी धरणगाव, चोपडा आणि जळगाव या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकर-भोकर पूल उभारणीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने २० कोटी निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात मंत्रालयात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. पुलाच्या पूर्णत्वानंतर परिसरातील नागरिकांना मोठी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील विकासाला वेग मिळणार आहे. १५० कोटींच्या पुलासाठी टप्प्याटप्प्याने निधी मंजूर ८८४ मीटर लांब, १० मीटर रुंद आणि २७ मीटर उंच असलेल्या या पुलाच्या उभारणीसाठी १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम…

Read More