मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरातील गोरेगाव फिल्मसिटी शेजारील नागरमोडी पाडा येथील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्व भागातील संतोष नगर भागात ही भीषण आग उसळली आहे. सायंकाळी 7.30 च्या सुमारास ही आग लागली असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या संतोष नगर परिसरात दाखल झाल्या असून आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे व सध्या कूलिंगचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथे लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. संतोष नगर भागातील घरांमध्ये असलेल्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील वेगवेगळ्या परिसरातून दुचाकी चोरुन नेणाऱ्या संशयित आकाश सुरेश शिंदे (वय १९, रा. साईनगर, कुसुंबा, ता. जळगाव) व सुरज मुनेंन्द्र दिवेव्दी (वय २२, रा. एमआयडीसी सेक्टर डी) या दोघ चोरट्यांच्या एमआडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी मंदिर परिसरातून दि. १ रोजी रात्रीच्या सुमारास सिद्धार्थ दीपक शर्मा यांची तर दुसऱ्या घटनेत शिरसोली रस्त्यावरील रॉयल ट्रर्फ येथून दि. १४ रोजी साईरस महेश बोंडे रा. किसनराव नगर, गिरणा पंपिंग रोड रामानंद नगर यांची दुचाकी चोरुन नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर भागातील हुडको परिसरात एका १४ वर्षाच्या मुलीला पाण्याच्या मोटारीमुळे विजेचा धक्का लागून ती मयत झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सोनल सुरेश बाविस्कर (वय १४, रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव) असे मयत बालिकेचे नाव आहे. ती वडील, आजी, आजोबा आणि लहान भाऊ व बहीण यांच्यासह राहत होती. गुरुवारी सायंकाळी नळाला पाणी आले होते. पाण्यासाठी मोटर लावलेली असताना सोनलचा हात मोटरला लागला आणि त्यातून विद्युत प्रवाह असल्यामुळे विजेचा धक्का लागल्याने ती जागीच फेकली गेली. आजूबाजूच्या नागरिकांनी ही घटना पाहताच तिला…
जळगाव : प्रतिनिधी गुजराल पेट्रोलपंप परिसरातील निवृत्ती नगरातील संकल्पसिध्दी अपार्टमेंटमध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरातून १८ रोजी चोरट्यांनी ५० हजार रुपये रोख व एक ग्रॅमची अंगठी चोरली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अवघ्या ४८ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घरफोडीतील संशयिताला ताब्यात घेऊन, चोरीला गेलेला माल हस्तगत केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सेवानिवृत्त शिक्षक अनिल लक्ष्मण सपकाळे हे त्यांच्या आईला भेटण्यास गेले असताना अर्पाटमेंट मधील बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम सोन्याची अंगठी चोरुन नेली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सचिन भागवत सपकाळ (रा. मोहाडी, ता.…
पाचोरा : प्रतिनिधी येथील तरुणाच्या खून प्रकरणात वापरण्यात आलेला चाकू पूरविणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. तिसरा एक जण अल्पवयीन आहे. त्यास बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री हेमंत संजय सोनवणे (२०, रा. बाहेरपुरा, पाचोरा) या युवकाचा रोहित गजानन लोणारी (२१, रा. शिवकॉलनी, पाचोरा) याने चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणात रोहित यास चाकू पुरविणारा एक अल्पवयीन आहे. त्यास ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. तर चाकू लपविणारा पृथ्वीराज राजू भोई (२०, रा. बाहेरपुरा, पाचोरा) यास पोलिसांनी अटक केली आहे. रोहित यास तीन दिवसाची…
मेष राशी आज तुम्हाला कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. विरोधी पक्ष तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. व्यावसायिक समस्यांबाबत अधिक जागरूक राहावे लागेल. नोकरदार लोकांसाठी परिस्थिती अनुकूल राहणार नाही. वृषभ राशी आज वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचा अडथळा दूर होईल. नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक क्षेत्रात जुन्या उत्पन्नाच्या स्रोतांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मिथुन राशी आज तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची पुन्हा पुन्हा आठवण करून वाईट वाटेल. अज्ञात व्यक्तीकडून अपेक्षित मदत मिळाल्याने तुमचे धैर्य आणि मनोबल वाढेल. कर्क राशी आज शारीरिक आणि मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबिक सदस्यांचे प्रेम आणि आपुलकीने हृदय प्रभावित होईल.…
बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासुन महायुतीचे मंत्री मुंडे यांच्यावर भाजपचे आ.सुरेश धस गंभीर आरोप करीत असतांना पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषद घेत पिकविमा घोटाळ्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा घोटाळ्याचे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून नॅनो युरिया, नॅनो डीएपीबाबत चर्चा केली असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंडे यांनी पाठवले असल्याचेही सुरेश धस यांनी सांगितले आहे. सुरेश धस म्हणाले, 6 मार्च 2023 रोजी धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. त्यात मूळ बाबी बदलून नॅनो युरिया, नॅनो…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांना आणि त्यांच्या भावाला नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. १९९५ साली कागदपत्रांची फेरफार व फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. यात १९९५ साली शासनाच्या १० टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी शासनाकडे आपले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून भारतातील साखरेच्या किंमतीत ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खराब हवामान आणि साखर निर्यातीमुळे साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे साखरेच्या किंमतीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. साखर हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याने येणाऱ्या काही महिन्यात साखर महागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचे वृत्त आहे. व्यापार आकडेवारीनुसार, एस -30 ग्रेडच्या साखरेसाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या किंमती १७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्विंटल प्रति ३ हजार ७९० रुपये आहेत. ही किंमत एका महिन्यापूर्वी प्रतिक्विंटल ३ हजार ५६५ रुपये आणि दोन महिन्यांपूर्वी प्रतिक्विंटल ३ हजार ३८० रुपये होती. मागील वर्षाच्या तुलनेत साखरेच्या किंमती ६.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि गेल्या दोन…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या आता पुन्हा एकदा अडचणी वाढताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा करत 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या काळात पिकविमा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यात आता भर म्हणजे करुणा शर्मा यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग येथे जाऊन भेट घेतली होती. आता सुप्रिया सुळे यांनी बीड प्रकरणी लक्ष घातल्यानंतर आता करुणा शर्मा यांनी सुप्रिया सुळे यांची भेट…

