Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवारांनी दिला कार्यकर्त्यांना दम : मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही, !
    क्राईम

    अजित पवारांनी दिला कार्यकर्त्यांना दम : मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही, !

    editor deskBy editor deskJanuary 30, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी अजित पवारांच्या मंत्रीचा विरोधक राजीनामा मागत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी बीड येथे घेतलेल्या बैठकीत पदाधिकारयांना सज्जड दम दिला आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, चारित्र्य आणि जनमानसात प्रतिमा स्वच्छ ठेवा. चुकीचं काम केल्यास मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री पदाची सुत्र हातात घेतल्यानंतर आज दि. ३० त्यांचा पहिलाच बीड दौरा आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ‘खपवून घेणार नाही’ असा दम देतानाच कानपिचक्या दिल्या.

    पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार म्हणाले की, बीड सध्या सातत्याने चर्चेत आहे. पण ज्या घटनांमध्ये तथ्य असेल तिथे कारवाई करणार. खंडणीची प्रकरणं खपवून घेणार नाही. रिव्हाल्वर लावून फिरतील त्यांचा परवाना रद्द करण्यास सांगणार. चुकीची माणसं आजूबाजूला ठेऊ नका. रिल वगैरेही खपवून घेतली जाणार नाहीत. आपलं आपलं स्वत:च चारित्र्य स्वच्छ ठेवा, असा अप्रत्यक्ष टोला पवार यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

    चुकीचं वागू नका जवळचा असेल तरी कारवाई होणार. कोणी काय केल तर राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. कोणावर अन्याय होऊ देणार नाही. जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. विकासकामे करत असताना खंडणीचे प्रकार करू नका, नाहीतर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. जर कोणी वेडेवाकडे प्रकार केले तर सगळ्यांना नियम सारखे असतील. माझी कामाची पद्धत वेगळी आहे. सर्व कामे दर्जेदार झाली पाहिजेत, असा इशाराही त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे तरुणाचा खून; जवळच्या मित्रावर संशय

    January 14, 2026

    धरणगाव नगर परिषदेत विनय (पप्पू )भावे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    January 13, 2026

    सोनवद–अहिरे रस्त्यावर भीषण अपघात; भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.