Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विमान अपघाताची खरी माहिती उघड होणार? रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा !
    राजकारण

    विमान अपघाताची खरी माहिती उघड होणार? रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा !

    editor deskBy editor deskMarch 18, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यास परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे.

    रोहित पवार म्हणाले की, सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ११ वेळा राज्याचे बजेट मांडलेले अजितदादा अकाली मृत्यू पावले तरी या गंभीर प्रकरणावर साधी चर्चाही विधिमंडळात होत नसल्याचे दुर्दैवी आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषय चर्चेला घेण्याची विनंती केली असून निवेदनही दिले आहे. रोहित पवारांच्या मते, अजितदादांचे योगदान आणि त्यांच्या विमान अपघातासंदर्भातील संशयास्पद बाबी लक्षात घेता, चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे.

    माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी इशारा दिला, “अपघाताशी संबंधित मोठी माहिती माझ्याकडे आहे. सरकार काय पाऊल उचलते ते बघू नाहीतर ती माहिती सार्वजनिक करणार आहोत.” त्यांनी सरकारवरही सवाल उपस्थित केला की, “अजितदादांच्या सोबत सत्तेत असताना, आपण आपल्या माणसाला न्याय देऊ शकत नाही, तर इतरांना काय न्याय द्याल?”

    रोहित पवार पुढे म्हणाले की, शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी हे देखील अजित पवारांच्या विमान अपघातावरील चर्चेला प्रोत्साहन देत आहेत, पण चर्चा होऊ दिली जात नाही. तसेच, VSR कंपनीला वाचवले जात असल्याचा संशय असून, यामागे मोठा माणूस असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. रोहित पवारांच्या या इशार्यानंतर सरकार आणि विधानसभेत यावर चर्चा होणार की नाही, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप प्रदेश माध्यम विभागात मोठा फेरबदल – राज्यभर नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर!

    April 21, 2026

    “डॉलरचे पार्सल” ठरले सापळा; भीती आणि आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन लूट

    April 21, 2026

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.