जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. दि. १८ रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड पार पडली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध जाहिर करण्यात आली. यावेळी चेअरमनपदी रोहित निकम यांची तर व्हा. चेअरमनपदी अरविंद देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच जिल्हा दूध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली होती.
चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध होण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठामंत्री व जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, पदमश्री ॲड. उज्वल निकम, आ. मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न केले व चेअरमन व व्हा. चेअरमन निवड बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून विवेक जगताप यांनीे काम पाहीले. तर यावेळी संचालक संजीव मुकुंदराव पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, यादवराव विष्णू पाटील, रामनाथ चिंधु पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, मंगेश भरत पाटील, शांताराम चंद्रा सोनवणे, श्वेतांबरी रोहित निकम, सोनल संजय पवार, अरूण बाबुराव देशमुख, गजानन मल्हारराव देशमुख, प्रशांत लिलाधर चौधरी, विवेक राजाराम पाटील, अरविंद भगवान देशमुख, निळकंठ आनंदा नारखेडे, पुंडलीक दौलत पाटील, प्रताप हरी पाटील, अरूण आत्माराम पाटील आदी उपस्थित होते.