भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रहिवासी व रेल्वेत नोकरीला असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिची सोशल मिडीयावर बदनामी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर एका विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहिता ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एका भागात वास्तव्यास असून रेल्वेत नोकरीला आहे. संशयीत अब्दुल रहिम शेख (वय २७, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ) याने दि. १ मार्च रोजी दुपारी साडेतीन ते दि. १५ मार्च व दि. १७ मार्च रोजी सकाळी साडेसहा दरम्यान विवाहितेचा पाठलाग केला व माझ्याशी संबंध ठेव म्हणत गळ घातली, तसे न केल्यास फोटो व्हायरलची धमकी देत पैशांची मागणी केली. पैसे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी मालवाहू वाहनाने अनिता राजू गवळी (वय ४५, रा. कांचनगर) यांना धडक देण्यासह पायावरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना दि. १९ मार्च रोजी सुभाष चौक परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचननगर परिसरात अनिता गवळी या वास्तव्यास आहे. त्या दि. १९ रोजी घरी परतत असताना त्यांना (एमपी ४६, झेडई ९९६४) क्रमाकाच्या मालवाहू वाहनाने धडक दिली. तसेच या वाहनाचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने जबर दुखापत झाली. या प्रकरणी महिलेने दि. २४ मार्च रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ…
मेष राशी राजकीय क्षेत्रातील लोकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल. तुमचे काम करत राहा. इतरांची दिशाभूल करू नका. व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत. नवीन लाभाची शक्यता आहे. वृषभ राशी आज मित्राच्या मदतीने प्रेमसंबंधांमध्ये विशेष यश मिळेल. तुमच्या जोडीदाराला भेटण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधातील समस्या कमी होतील. आनंद आणि सौहार्द वाढेल. वैवाहिक जीवनात आर्थिक महत्त्वाकांक्षेमुळे समस्या वाढू शकतात. मिथुन राशी आज काही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर झाल्यास तुमचे मनोबल वाढेल. धाडस आणि शौर्याच्या जोरावर सुरक्षा जवान महत्त्वाचे यश मिळवतील. सामाजिक जनसंपर्क वाढेल. सत्तेतील लोकांशी जवळीक वाढेल. राजकीय क्षेत्रातील लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. कर्क…
त्यामुळे आमच्यातली युती तुटली ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान ! मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा शिवसेना – भाजप युती कशी तुटली? यावर टीका टिप्पणी सुरु झाली आहे. यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना – भाजप युती कशी तुटली? याविषयी मोठे विधान केले आहे. तत्कालीन शिवसेनेच्या युवराजांनी आधीच 151 जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांचा पक्ष 151 जागांवर अडून बसला होता. आम्ही त्यांच्याकडे 147 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र कौरवांप्रमाणे ते पाच गावे देखील देण्यास तयार नव्हते. त्यामुळे आमच्यातली युती तुटली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपचे ज्येष्ठ…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई येथील धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाला असून काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नौ पार्किंगमध्येच पार्क करण्यात आला होता. आणि रात्रीच्या सुमारास त्या ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे ट्र्कमधील इतर सिलेंडर्सचाही एकामागोमाग स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं. एकूण 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा भडका उडाला आणि आजूबाजूच्या शंभर मीटर पर्यंत उभ्या असलेल्या गाड्या तसेच ट्रकही आगीत भस्मसात झाले. 24 तासांपूर्वी भडकलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात उडलेले सिलेंडरचा शोध घेऊन सिलेंडर वर पाणी मारत कुलिंग करायचं काम सुरु आहे. मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचं…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील तरुण पोलीस भरती होण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या तरुण-तरुणीसाठीं महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. यानुसार, एकूण १०,००० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. सध्या उन्हाळ्याचे तीव्र तापमान आणि जूनपासून सुरू होणारा पावसाळा यामुळे भरती प्रक्रिया गणेशोत्सवानंतर १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून सुमारे ११ ते १३ लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. मागील एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या पोलिस भरतीत १७ हजार ४७१ जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज आले होते. त्यामुळे यावेळीही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतील, असा…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ रेल्वे विभागाकडून माहिती समोर आली असून गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या मुंबई एलटीटी (११०८०) एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस ८ कोचमध्ये एक नकली तिकीट तपासनीस प्रफुल गजबीये याला रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. भोपाळ विभागाचे डीवाय सीटीआय मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २३ रविवार रोजी नियमित तपासणी दरम्यान, एस ८ कोचमध्ये एक प्रफुल गजबीये व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले. त्यास अधिकृत ओळखपत्र विचारले असता त्याच्याकडे रेल्वेच्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांचा अभाव होता. यावेळी प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यानच हा…
जळगाव : प्रतिनिधी घरातील सदस्य गाढ झोपलेले असताना कपिल सुरेश सपकाळे (वय ३२, रा.नशिराबाद, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार दि. २३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथे कपिल सपकाळे हा तरुण वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री कपिल सपकाळे यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घअना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ममुराबाद येथील घराला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत घरातल संपुर्ण साहित्य जळून खाक झाल्याने दोघ भावंडांच्या संसाराची राखरांगोळी झाली. तसेच शहरातील भवानी पेठेत डीपीला आग लागल्याची घटना देखील घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील पांडुरंग कुंभार व प्रकाश कुंभार या दोन भावांचे कुंभारवाडा भागात एकत्र घर आहे. सोमवारी ते कामावर गेलेले असताना शॉर्ट सर्कीटमुळे त्यांच्या घरात आग लागली. आग वाढत जाऊन घरातील टीव्ही, पंखा, धान्य, कागदपत्रे, कपडे व संपुर्ण साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे ७० हजारांपेक्षा जास्त नुकसान झाले असून दोघंही भावांचा संसार उघड्यावर आला आहे. डोळ्यासमोर संपुर्ण…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही राजकारण आणि धार्मिक कार्यात चांगला वेळ घालवाल. प्रभावशाली लोकांशी तुमचे लाभकारी संबंध निर्माण होऊ शकतात. तरुणांना त्यांच्या कठोर परिश्रमाचा योग्य लाभ मिळेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासापासून लक्ष विचलित करून मजा करण्यात वेळ वाया घालवू नये. व्यवसायात विपणन संबंधित कामावर अधिक लक्ष द्या. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे यश घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल. तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल. तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य परिणाम मिळतील. मुलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही वेळ काढा. आज व्यवसाय थोडे मंद होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण…

