Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथील बैसरन येथे लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 30 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जखमी आहेत. मृतांत दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा सांडला. दरम्यान, सौदी अरेबिया दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. तत्पूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. गृहमंत्री शहा हेही तातडीने काश्मीरला रवाना झाले असून आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या हल्ल्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तोंडाला रूमाल बांधून चोरीच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरणाऱ्या मालेगावच्या तरुणाला मंगळवारी चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे हवालदार अजय पाटील, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटोळे, विलास पवार, समाधान पाटील हे मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शहरातील सराफ गल्ली परिसरात रात्री पेट्रोलिंग करीत असताना एक इसम अंधारात तोंडाला रूमाल बांधून चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होता. त्यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस समाधानकारक केली असता तो उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मोहम्मद सुब्राती मोहम्मद रफीक (२५, बिस्मिल्लाह नगर, मालेगाव, जि. नाशिक) असे त्याचे नाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घरात घुसून पतीने त्यांची पत्नी रुपाली नरेंद्र काकडे (३४) यांच्यावर धारदार सुरीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना २१ एप्रिल रोजी रामेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र काकडे याने दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने पत्नी रुपाली यांच्यावर गळ्यावर आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रुपाली काकडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नरेंद्र काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर १५ ते २० अर्धनग्न तरुणांनी हातात तलवारी, अंडी व मोठमोठे दगड घेऊन महामार्ग अडविला. तसेच अनेक वाहनांवर हल्ला केला. दगडफेक केल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना २१ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, तांबापुरा परिसरातील मतीन पटेल व त्यांचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथून जळगावकडे येत असताना गाडेगावनजीक एका पाईप कंपनीजवळ १५ ते २० अर्धनग्न तरुणांनी हातात तलवारी, अंडी व मोठमोठे दगड घेऊन महामार्ग अडविला. तसेच अनेक वाहनांवर दगडफेक केल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहनांमध्ये महिला व लहान मुलेदेखील होतेमतीन पटेल व इतरांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन…

Read More

मेष राशी श्री गणेश म्हणतात की, आज बहुतेक कामे व्यवस्थित सुरू होतील, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. कौटुंबिक सुविधांच्या खरेदीत खर्च जास्त होईल. पैशाचे व्यवहार किंवा उधारीच्या कामांपासून दूर रहा. एखाद्याशी संवाद साधताना चांगल्या शब्दांचा वापर करा. वादासारखी परिस्थिती उद्भवू शकते. सध्या निर्णय घेण्यात काही अडचण येऊ शकते. व्यवसायातील सध्याची कामे थोडी मंदावतील. वृषभ राशी श्री गणेश म्हणतात की, दुपारची परिस्थिती अनुकूल असेल. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या कामांची रूपरेषा तयार करा. कौटुंबिक आणि सामाजिक कामांमध्ये तुमचा वेळ चांगला जाईल. मनात ऊर्जा आणि आनंद राहील. या काळात एखाद्या नातेवाईकाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. अडचणीच्या वेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या व्यवसायाला आता शेतीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता मत्स्य व्यवसायाला देखील शेतीप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्य खात्यासंदर्भात हा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यानुसार आता मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला जाणार आहे. हा निर्णय गेम चेंजर ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे मत्स्य…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून आधी महायुतीत नाराजी होती मात्र केंद्राचे आदेश आल्यानंतर नाराजी थंड झाली होती आता मात्र भाजपच्या मंत्र्यांने केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नवीन चर्चा सुरु झाली आहे. मी एक मंत्री आहे, वरिष्ठ मंत्री आहे. महाराष्ट्रात फक्त गृहखाते राहिले, बाकी सर्व खाती झाली, असे विधान भाजप नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तासगाव येथे शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या मंडळातर्फे दुर्गामाता मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महिलांच्या सर्व आजारांच्या संदर्भात…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक नेत्यांसह अभिनेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा मेल आल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा मेल चेन्नई येथून आल्याचे बोलले जात आहे. याबाबतची माहिती मिळताच औरंगाबाद उच्च न्यायालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. न्यायालयाच्या सर्व दरवाजांसमोर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच हा मेल कोणी पाठवला आहे, याबाबत पोलिस अधिकचा तपास करत आहे. अधिकची माहिती अशी, आज दुपारी 12 च्या सुमारास हा धमकीचा मेल आला होता. धमकीचा मेल आल्याची माहिती उच्च न्यायालय प्रशासनाने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ…

Read More

पुणे: वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी याला नकार दिल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे. एक रुपयात पीकविमा दिला जात होता. मात्र, अनेक शेतकर्‍यांनी या योजनेत चुना लावल्याने ही योजना अडचणीत आली आहे. आम्ही ते सगळं काढलं आहे. आता तुमच्या भल्याचं करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता याबाबत नव्याने विचार केला जात असून, मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री यांची एकत्रित बैठक झाली आहे. तीत शेतकर्‍यांना चांगला कार्यक्रम देणार आहोत, अशी माहिती पवारांनी या वेळी दिली. जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाच्या वतीने ‘दिशा…

Read More

लोणावळा ; वृत्तसंस्था राज्यातील पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा बॅटरी हिल या ठिकाणी एका भरधाव ट्रकचालकाने समोर जाणार्‍या एका कारला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये ही कार समोरून येणार्‍या दुसर्‍या कारवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये पुण्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी (दि. 20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी सागर पांडुरंग इंगुळकर (रा. पुणे) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यामध्ये अपघाताची फिर्याद दिली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाने भरधाव समोर जाणार्‍या इनोव्हा कार पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे इनोव्हा समोरून येणारी एर्टिगा कार जाऊन…

Read More