Author: editor desk

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापुरातील पोलिस ठाण्यातच नाइंट्या नावाच्या दारुड्याने पोलिस निरीक्षकाच्या छातीवर बुक्की मारून थुंकल्याची घटना घडली. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने नाइंट्या ऊर्फ ओंकार संतोष नलावडे (रा. सुंदराबाई डागा प्रशालेच्या जवळ, सोलापूर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास प्रजा मटण स्टॉलच्या बाजूला, रामलाल चौक (सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी पोलिस अंमलदार दिनेश घंटे यांनी फिर्याद दिली आहे. नाइंट्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी व जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांपूर्वी तडीपार केले होते. १९ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास रामलाल चौक येथे आरोपी व इतर तीन व्यक्तींमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी…

Read More

सातारा : वृत्तसंस्था राज्याचे ग्राम विकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या सातारा शहरातील महिलेला खंडणी प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे .शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली एक कोटी रुपये खंडणी घेत असताना तिला पकडण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील एका महिलेला मानसिक त्रास दिल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार व शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटले होते या प्रकरणी त्याचे वृत्तांत करणारे एका पत्रकाराला सुद्धा अटक झाली होती .सदर महिलेने जयकुमार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा हुडको भागात मंगळवारी रात्री १० वाजता किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी घटना झाली. या हाणामारीत लाकडे, दगड, विटा आणि कोयत्याचा वापर करून एकमेकांना जखमी करण्यात आले. या संदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको भागातील दोन गटांमध्ये मंगळवारी रात्री १० वाजता किरकोळ वाद झाला. पहिल्या गटातील पूजा शशिकांत सावळे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राहुल निकम, अनिता निकम, सोनाबाई रणशिंगे, ज्योती निकाळजे, गणेश निकाळजे, निखिल निकाळजे, विशाल निकाळजे, मुकेश निकाळजे आणि हिराबाई निकाळजे या नऊ जणांविरूद्ध तर दुसऱ्या गटातील निखिल गणेश निकाळजे (वय १९)…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात नवीन रुग्णालयाचे काम सुरू करायचे असून, त्यात तुम्हाला पार्टनर बनवितो, असे आमिष दाखवीत जळगाव शहरातील एकाने हॉटेल व्यावसायिकाची तब्बल २० लाख ७३ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शोएब अब्दुल (वय ३०, रा. सदगुरू अपार्टमेंट, शाहूनगर) हे जळगाव शहरात हॉटेलचा व्यवसाय करतात. १५ जून ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान मोहसीन गुलाब पिंजारी (रा. संगम बेकरीजवळ) यांनी मोहम्मद शोएब अब्दुल यांना जळगाव शहरात एक रुग्णालय सुरु करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी काही रक्कम लागणार असल्याचे पिंजारी याने मोहम्मद अब्दुल यांना सांगितले.…

Read More

रावेर : प्रतिनिधी शहरातील एका व्यापाऱ्याकडून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारीत करण्याची धमकी देऊन १ लाखाची खंडणी घेताना रावेर पोलिसांनी रंगेहाथ पकडलेल्या महिलेच्या मायाजालात रिक्षावाला, बॅटरीवाला, डॉक्टर, पीडीत व्यापाऱ्याचा आप्तेष्ट व जिल्ह्यातील काही वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस व वनरक्षकांसह तब्बल ५० ते ६० जण अजून बळी पडले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी तथा या महिलेचा मुलगा निर्मल चुन्नीलाल पाटील (वय २१, रा लोणी, ता. चोपडा) यास रावेर पोलिसांनी अटक करून या महिलेसह रावेर न्यायालयात हजर केले असता दोघांना सोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात विवाहबद्ध झाल्यानंतर सुखी संसारवेलीवर एक मुलगा व एक मुलगी अशी…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तब्बल १७ वर्षाच्या सहजीवनानंतर मातृत्वाच्या सरी बरसल्या. जुळ्या मुलांचा जन्म झाल्याची आनंदवार्ता समजल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघालं… परंतु नियतीच्या मनात काही वेगळचं होतं… काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं… डोळेही न उघडलेल्या चिमुकल्यांना आईच्या ममत्वापासून पोरकं व्हावं लागलं… जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन तासांतच आईने जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३८) असे या दुर्दैवी आईचे नाव. उत्राण येथील सासर असलेल्या ज्योती चौधरी या परिवारासह पाचोरा येथे वास्तव्यास होत्या. बाहेरपुरा भागातील माहेर असलेल्या ज्योती यांना लग्नाच्या १७ वर्षानंतर मातृत्वाची चाहूल लागली आणि पती, आई, वडील, भाऊ यांच्यासह नातेवाइकांना आनंद झाला. बुधवारी वेदना होऊ…

Read More

मेष राशी आज कामात अनावश्यक धावपळ होईल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात अधिक लक्ष द्यावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही शुभ संकेत मिळतील. क्रीडा स्पर्धांमध्ये येणारे अडथळे दूर होतील. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले उत्पन्न न मिळण्याचे संकेत आहेत. खर्च देखील उत्पन्नाच्या समान प्रमाणात होईल. आर्थिक बाबतीत पूर्वी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मिथुन राशी आज प्रेमसंबंधांमध्ये तीव्रता असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. कोणाचीही दिशाभूल करू नका. वैवाहिक जीवनात काही सुखद घटना घडू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. प्रिय व्यक्ती घरी आल्यावर तुम्हाला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आता घरोबा करण्याचा जवळपास निश्चित केला आहे. तशी एक बैठक देखील पार पडली आहे. यामुळे आता अजित पवारांची पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट भक्कम करण्यासाठी व्यूह रचना सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार पक्ष आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. 35 लक्ष, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने एकमताने राम सुतार यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली. राम सुतार यांचे वय सध्या शंभर वर्षे आहे. ते अजूनही आपल्या कामात तितक्याच तडफेने व्यस्त आहेत. त्यांनी उभारलेली पुतळे आणि शिल्पाचे जगभरात कौतुक झाले. त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. राम वनजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत. त्यांच्या नावावर जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बवनवण्याचा विक्रम आहे. 100…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट येण्याची शक्यता आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मार्च महिन्यातील पहिल्या टप्प्यापासून उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हाच कमाल तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत पोहोचला आहे. बुधवारीदेखील राज्यात कमाल तापमानाचा पारा सर्वात अधिक ब—ह्मपुरीत 41.5 अंशसेल्सिअस एवढा नोंदला गेला. मात्र, अवकाळी पावसामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ओडिसा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.…

Read More