Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एसीबीची मोठी कारवाई : २५ हजाराची लाच घेताना अधिकारी अटकेत !
    क्राईम

    एसीबीची मोठी कारवाई : २५ हजाराची लाच घेताना अधिकारी अटकेत !

    editor deskBy editor deskMarch 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव  : प्रतिनिधी

    धरणगाव येथे काल दि.२१ रोजी दीड हजाराची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक करण्यात आले असतांना आज पुन्हा एकदा जळगाव एसीबीने धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावातील ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीने तक्रारदाराकडून गटारी आणि गावहाळ बांधकामाच्या बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात तक्रारदाराने २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, ज्यासाठी त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये) केली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार २२ मार्च रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. आरोपी ब्राम्हणे यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

    पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!

    August 22, 2026

    मैत्री नाकारली अन् तरुणाचा संताप अनावर : मध्यरात्री घरासमोर गोंधळ, जीवे मारण्याची धमकी

    August 21, 2026

    गुटख्याने भरलेली पिकअप धडकली अन् जीव गेला!

    August 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.