मुंबई : वृत्तसंस्था महायुती व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दंगल होते, प्रशांत कोरटकर नागपूरचा आहे. नागपूरलाच दंगल का झाली हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचे सरकार आहे, त्यांच्यावर सामूहिक उपचार करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, नागपूरचा प्रशांत कोरटकर हा त्यांचाच माणूस आहे. तो पळून गेला का नाही हे तेच सांगू शकतात. आपण म्हणायचो तो पळून गेला आणि तो भाजपच्या कार्यालयात असायचा किंवा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंडाची हत्या करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या जवळ पुरून टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. चार दिवसांपूर्वी त्याला काही तरूण त्याला घरातून घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता होता. ही हत्या टोळीयुध्दातून हत्या झाली असल्याची संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश प्रकाश भालेराव ( वय ३१, रा. टेक्नीकल हायस्कूल मागे भुसावळ ) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द देखील होता. यातून बाहेर आल्यानंतर तो भुसावळ…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसीतील हॉटेल सागर जवळ काहीही कारण नसताना एका तरुणाला शिवीगाळ करून डोक्यात बियरच्या बाटल्या टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कडू पाटील (वय-२१) रा. किनगाव ता. यावल ह.मु. रायपूर ता. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरुवारी २० मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता राहुल पाटील हा एमआयडीसीतील हॉटेल सागर जवळून पायी जात असताना रस्त्यावर संशयित आरोपी दिनेश भारत चौधरी आणि ललित महेंद्र पाटील दोन्ही राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव यांनी…
जळगाव : प्रतिनिधी गणेश कॉलनी भागातील एका महाविद्यालय परिसरात अनधिकृतपणे चॉपर घेऊन, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी फिरत असलेल्या तीन जणांना जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यापैकी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन मुलाला समज देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी भागात काही महाविद्यालयीन युवकांकडे कोणतीही परवानगी नसताना हत्यार बाळगत फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस गेले असताना, तीन युवक पोलिसांना येताना पाहून पळून जाण्याच्या तयारीत दिसले. पोलिसांनी तिन्ही युवकांना पकडून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चॉपर आढळून आला
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विटनेर येथील मराठी शाळेजवळ जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या संदर्भात गुरुवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील विटनेर गावात असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात घराच्या अतिक्रमण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दावा टाकण्यात आला होता. या जुन्या वादातून आणि खुन्नस देण्यावरून गुरुवारी सकाळी १०:३० वाजता गावातील मराठी शाळेजवळ दोन्ही गट समोरासमोर आले. यात पहिल्या गटातील अजिंक्य राजू गोलांडे (वय-२२) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की गावातील ग्रामपंचायत सदस्य सागर ईश्वर दिवाने याच्या विरोधात त्यांचे काका सुरेश गोलांडे यांनी…
मेष राशी राजकारणात इच्छित पद मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या आनंदात वाढ होईल. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. कुटुंबात काही शुभ कार्ये पूर्ण होतील. काही महत्त्वाच्या योजना सुरू करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. वृषभ राशी आज पोटाशी संबंधित आजारांमुळे थोडा त्रास होईल. काही आजारामुळे तुम्हाला घरापासून दूर राहावे लागेल. आरोग्याबाबत सावध व सतर्क राहा. न्यूरोलॉजिकल रुग्णांनी जास्त मानसिक ताण घेणे टाळावे. मिथुन राशी राजकारणातील तुमच्या भाषणाचा जनतेवर चांगला प्रभाव पडेल. घरगुती जीवनात आकर्षण आणि प्रेम वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कला आणि अभिनय क्षेत्राशी निगडित लोकांना काहीतरी साध्य होईल. घरात चैनीच्या वस्तू आल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कर्क राशी आजचा दिवस अगदी मनासारखा जाईल.…
जळगाव : प्रतिनिधी दोन दिवसापूर्वी मुंबईत फार मोठ्या राजकीय घडामोडी म्हणता येतील अशा प्रशासकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची गोपनीय पद्धतीने कुणाच्याही कानाला खबर न लागता बदली झाली आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींना धक्काच बसला. ज्या लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीचा बैठकीत निषेधाचा ठराव केला होता ते देखील चांगलेच तोंडघशी पडले. परंतु या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकनाथ खडसे यांचे राज्य आले की काय ते सांगतील ते अधिकारी ते सांगतील तो निर्णय अशा पद्धतीने यामागे राजकारण आहे का असा प्रश्न जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पडला आहे आणि तशी चर्चा देखील रगली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील जादा दराने…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयात लाच मागण्याच्या अनेक घटना घडत असतांना आता नुकतेच धरणगाव पंचायत समितीतील येथील एका अधिकाऱ्याने वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना सहाय्यक कार्यक्रम अधिकार्याला जळगाव एसीबीने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. हा सापळा शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला. प्रवीण चौधरी असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रवीण चौधरी यांनी दिड हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता कार्यालयात प्रवीण चौधरीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली. आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे. राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी विधान परिषदेत प्रश्नावर लेखी उत्तर देताना दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले आहे. यानुसार…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात खुनाच्या घटना घडत असतांना आता जळगाव तालुक्यात देखील एका उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं आहे. युवराज सोपान कोळी असे मयत उपसरपंचाचे नाव आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण असून कोळी यांच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातीलच तिघांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून…

