Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वितरण कंपन्यांनी 50 रूपयांनी वाढ केली आहे. जनरल ग्राहक तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ही दरवाढ लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने किचनचे बजेट बिघडणार आहे. 14.2 किलोग्रॅमचे गॅस सिलिंडरची किंमत आता 853 रूपये आणि उज्वला गॅस योजनेतील सिलिंडरची किंमत आता 553 रूपये इतकी असणार आहे. जनरल ग्राहकांसाठी दरवाढीपुर्वी 14.2 किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत 803 रूपये होती. ती आता 853 रूपये झाली आहे. तर उज्वला ययोजनेतील ग्राहकांसाठी गॅसची किंमत 503 रूपये होती ती 553 रूपये इतकी झाली…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांची वाढ होईल. सध्या दिल्लीत पेट्रोल ९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. नवीन किमती मध्यरात्री १२ वाजेपासून लागू होतील. सध्या सरकार पेट्रोलवर प्रति लिटर १९.९० रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर १५.८० रुपये आकारत आहे. या वाढीनंतर पेट्रोलवर उत्पादन शुल्क २१.९० रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर १७.८० रुपये प्रति लिटर होईल. जून २०१० पर्यंत, पेट्रोलची किंमत सरकार ठरवत असे आणि दर १५ दिवसांनी ती बदलत असे. २६ जून…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाल्यानंतर आता औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नपूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचेदेखील नामांतर होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले, औरंगजेबाने त्याच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिवचे नाव बदलले गेले. नगरचे नाव बदलले गेले. हे सगळे ‘बाद’ ‘बाद’ आहे ना त्यांची नावे बदलण्याची प्रोसेस आम्ही करीत आहोत. औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सनसनाटी आरोप केला आहे. गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे एकनाथ खडसे म्हणालेत. यासंदर्भात अमित शहा यांच्याकडे कॉल रेकॉर्ड असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली एक क्लिप प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगला रात्री अशा’, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून सोबत काढलेल्या तरुणीच्या आक्षेपार्ह फोटोवर अश्लील शिवीगाळ लिहून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. काही वर्षापूर्वी ती गावी गेल्यानंतर नात्यातील तरुणाशी तिची ओळख व त्यांचे प्रेम जुळले होते. त्यांनी सोबत फोटोदेखील काढले होते. त्यानंतर तरुण दारूच्या नशेत तरुणीवर संशय घेऊन भांडण करीत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत प्रेमसंबंध तोडले. याचा राग आल्याने त्याने सोशल मीडियावर तरुणीसोबतचा फोटो आणि त्यावर अश्लील शिवी लिहून तो व्हायरल केला. तरुणीने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहून तिने एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणारा तरुण नात्यातीलच आहे. ही घटना तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी अत्याचार करणारा गणेश अशोक बोरसे याला अटक करण्यात आली असून, त्याला ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातीलच गणेश बोरसे याने गावठाण परिसरातील शेतालगतच्या नाल्याजवळ अत्याचार केला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला. अत्याचार केल्यानंतर तरुणाने अल्पवयीन मुलीला धमकावणे सुरू ठेवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली. त्यानंतर तिला शासकीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जन्म दाखल्यांच्या नोंदीसाठी तहसीलदारांचे बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात असून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. जन्म-मृत्यूचे दाखल्यासाठी तहसीलदारांचे बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी ज्यांनी जन्मदाखले घेतले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी तर केली जात आहेच शिवाय या प्रकरणात तहसीलदारांचे बनावट आदेश तयार करण्याच्या संशयावरून दोन जणांना एलसीबीने ताब्यात घेतले आहे. त्यांची विविध मुद्यांवर चौकशी केली जात आहे. आता दोन जण ताब्यात घेतले असले तरी यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून पोलिस…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खेडगाव येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तश्रृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाणारा वेरुळी (ता. पाचोरा) येथील सचिन रामू सोनवणे (२५) हा तरुण खेडगावनजीक जामदा डावा कालव्यात पाय घसरून पडला. पाण्याचा प्रवाहात तो वाहून गेला. त्याच्या सोबत असलेल्या खेडगाव व वेरुळी येथील तरुणांनी त्याचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. रविवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, सचिनचा शोध घेण्यासाठी डावा कालवा जामदा येथून रविवारी दुपारी पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. मिलाल्लेया माहितीनुसार, गिरणा धरणातून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता पी. टी. पाटील यांनी दिली.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील देशमुख वाड्यात माजी सरपंच आलिम देशमुख व मित्र परिवारातर्फे रमजान ईदमिलननिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले होते. याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच विजय पाटील, शरद कोळी, उद्योगपती शरद कासट, दिलीप पाटील, विजय झवर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे आदी उपस्थित होते. जि. प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पत्रकार हेमंत अलोने, विजय महाजन, सावखा पठाण, नईम देशपांडे, सलीम खान, पंढरीनाथ ठाकूर, अरुण पाटील, डॉ. राजू देशमुख, डॉ. परवेज देशपांडे, कालू खाटीक, अनिल सोमाणी, श्रीकृष्ण साळुंखे, मुन्ना झवर, दीपक झवर, गोपाल सोनवणे,…

Read More

मेष राशी आज तुम्हाला नको त्या प्रवासाला जावे लागेल. प्रिय व्यक्तीपासून दूर गेल्याने तुम्हाला दुःख होईल. व्यवसायात अज्ञात लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा फसवणूक होऊ शकते. नोकरीत असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे तुमचा अपमान होईल. दूरदेशीच्या नातेवाईकाकडून चिंताजनक बातमी मिळू शकते. वृषभ राशी आज व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. जमा झालेले भांडवल कौटुंबिक खर्चासाठी खर्च होऊ शकते. जुन्या पैशाच्या व्यवहाराबाबत विनाकारण वाद होऊ शकतात. कष्टकरी वर्गाला मेहनत केल्यावरच पैसा मिळेल. मिथुन राशी आज प्रेमात असलेल्या जोडप्यांमध्ये विनाकारण वाद होऊ शकतात. कोणत्याही नवीन प्रस्तावावर घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात शंका व गोंधळामुळे दुरावा वाढू शकतो. कर्क…

Read More