Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी मुलीची परीक्षा झाल्यानंतर मारवड येथून जळगावकडे परतत असताना कार व लग्नाच्या वाहनाची वहऱ्हाडाच्या समोरासमोर धडक होऊन महेश सुरेश सोनार (५५, रा. विश्वकर्मा नगर, रामेश्वर कॉलनी) हे ठार झाले. या अपघातात मुलगी नयना महेश सोनार (१९) व महेश यांचे मित्र राजेश मिठूलाल धूत (४६, रा. दौलत नगर) हे गंभीर जखमी झाले. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील पिंप्रीजवळ शनिवारी (दि. १०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की यात कारच्या समोरचा भाग चक्काचूर होण्यासह वऱ्हाडाच्या वाहनाचेही नुकसान झाले. या घटनेत वहऱ्हाडीही जखमी झाले सोनार यांची मोठी मुलगी नयना हिची शनिवारी मारवड येथे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरात जामनेर रोडवर जात असलेल्या वृद्धाला जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन तासात अटक केली. ही घटना गुरुवारी घडली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जामनेर रोडवरील कृष्णाली हॉटेलजवळून बुढनशाह रमजानशहा छप्परबंद (वय ७७, राईनामुल हसन मशिद, भुसावळ) जात असताना संशयित अमर कसोटे (रा. झेडटीसी परिसर, भुसावळ) यांनी त्यांच्या पाठीवर आणि मानेवर चापटा मारत पैसे मागितले. बुढनशाह यांनी विरोध केल्यावर संशयिताने त्यांच्या खांद्यावरील बॅग हिसकावून घेतली. अगर ‘किसी को बताया तो तुझे मार डालूंगा’ अशी धमकी दिली. यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या बॅगेमध्ये एकूण ७ हजार रुपये होते.…

Read More

मेष राशी व्यवसायात नवीन करार होतील. एखादा प्रिय व्यक्ती दूरच्या देशातून घरी परतेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस निर्माण होईल. जमिनीशी संबंधित कामात गुंतलेल्या लोकांना यश मिळेल. तुमचे धाडस आणि मनोबल पाहून शत्रू थक्क होतील. वृषभ राशी आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कोणत्याही आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्या. व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. नोकरीत पगार वाढण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होईल. बँक कर्ज फेडण्याच्या कामात गुंतलेल्या लोकांना विशेष यश आणि फायदा मिळेल. मिथुन राशी आज तुम्ही तुमच्या भावंडांकडून विशेष सहकार्य आणि संगत मिळवून भारावून जाल. प्रेमसंबंधात काही धोकादायक काम करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ज्यामुळे प्रेमसंबंधात जवळीक येईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील असे मिस्त्री यांनी सांगितले. https://x.com/PTI_News/status/1921180471033295068 मिस्त्री यांच्या घोषणेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती केला आहे. याबाबत ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हे जाहीर करताना त्यांना आनंद होत असल्याचेही ट्रम्प यांनी…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग देखील सतर्क झाले आहेत. शुक्रवारी उच्च अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुखांमध्ये झालेल्या बैठकीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, सर्वांना मुख्यालय सोडू नका, असे सांगण्यात आले आहे. शुक्रवारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण संचालक, आयुक्तांसह सर्व उच्च अधिकाऱ्यांनी राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीत सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील शक्यतांवर चर्चा झाली. बैठकीनंतर संध्याकाळी विभागांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांना वैद्यकीय रजा वगळता इतर कोणत्याही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असून आता शरद पवार पक्षाचा एक गट अजित पवार यांच्यासोबत येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक मोठं वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे. त्यानुसार, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आता, सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या दोन्ही गट एकत्र आणण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. साताऱ्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला) आपल्‍या निर्णयाची माहिती दिली आहे. आता आगामी इंग्लंड दौऱ्यावर त्याचा संघातील सहभागाची शक्‍यता कमी असल्‍याचे मानले जात आहे. दरम्‍यान, ‘बीसीसीआय’च्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने कोहली याला निवृत्तीबाबतच्‍या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. आता निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना कोहलीच्या भविष्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे क्रिकेट विश्‍वाचे लक्ष वेधले आहे. विराटच्या आधी, हिटमॅन रोहित शर्माने बुधवारी (७ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ७ मे रोजी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लाल चेंडूच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कानळदा-चोपडा रस्त्यालगत आमोदा-घार्डी जवळ कोणतीही परवानगी न घेताच उभारलेल्या गतिरोधकावर दुचाकीला दणका बसून, दुचाकीवरील आईच्या हातात असलेली ५ महिन्याच्या चिमुकलीचा रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वा. घडली. शुक्रवारी या गतिरोधकावर दुचाकी घसरून एक दाम्पत्यदेखील जखमी झाले. सविस्तर वृत्त असे कि, संदीप सोनवणे (वय २६, रा. देवगाव, ता. जळगाव) हे कोळन्हावी येथे माहेरी गेलेल्या त्यांच्या पत्नी ज्योती संदीप सोनवणे (वय २२) यांना घेऊन आमोदाकडून देवगावकडे जात होते. आमोदा-घार्डी या गावाजवळ उभारलेल्या गतिरोधकावर संदीप सोनवणे यांची दुचाकी आदळली, त्याचवेळी ज्योती सोनवणे यांच्या हातात असलेली त्यांची पाच महिन्याची चिमुकली गायत्री सोनवणे ही रस्त्यावर पडली चिमुकलीच्या डोक्याला…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, गर्भवती पत्नीस भेटण्यासाठी सासरी आलेल्या एका जावयाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीची आई आणि संशयिताची सासू हिने फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोठी महिलेची मुलगी सध्या गर्भवती असून तिचा पती काही दिवसांपूर्वी सासरी राहण्यासाठी आला होता. दरम्यान, अल्पवयीन मेहुणीला तब्येतीची तक्रार असल्याचे सांगून जावयाने तिला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगितले. विश्वासाने त्यांनी मुलीला त्याच्यासोबत पाठवले. मात्र सायंकाळपर्यंतही दोघे घरी न परतल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चिंता वाढली.  कुटुंबीयांनी आसपासच्या गावांमध्ये…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना, भरधाव वेगातील कार पुलाच्या भिंतीवर आदळून खाली कोसळल्याने चोपडा येथील दीपक अरुण मराठे (रा. मल्हारपुरा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ मे रोजी रात्री ११ वाजता उमरदे गावाजवळ घडली. दीपक मराठे, पारस महाजन (रा. चोपडा) आणि मोहित नाथबुवा (रा.धरणगाव) हे तिघे त्यांच्या मित्र चेतन वानखेडे यांच्या बहिणीच्या हळदीसाठी बिलवाडी (ता. जळगाव) येथे चारचाकी क्रमांक एम.एच.१२ ए.एन.५३४६ ने निघाले होते. सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल-म्हसावद रस्त्यावरील उमरदे पुलाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर आदळून खाली कोसळली व उलटली. या अपघातात दीपक मराठे याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर…

Read More