जळगाव : प्रतिनिधी “धरण होणार म्हणून मी जमीन घेतली नव्हती. ती जमीन माझ्या वडिलांच्या नावावर असून 100 वर्षांपूर्वीचे उतारे सुद्धा काढले तरी तेच समोर येतील,” असे स्पष्ट शब्दांत स्पष्टीकरण माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. गिरीश महाजन यांच्या आरोपांना उत्तर देताना खडसे यांनी खुलासा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि राजकीय महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीसंदर्भात अधिकाऱ्यांबरोबर तीन ते चार तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, “भूसंपादन, पुनर्वसन, ग्रामपंचायत विभाजन यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. इंदूर-हैदराबाद महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना मागील कायद्यानुसार पाचपट मोबदला मिळत होता. आता मात्र फक्त दोनपट मोबदला…
Author: editor desk
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवरील बेसमेंटमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर मुरूम कोसळून 2 जण ठार, तर 3 जण जखमी झालेत. बीड पायपास वरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी ही घटना घडली आहे. संग्राम नगर उड्डाणपुलाच्या शेजारी कॅपिटल ट्रेड सेंटर (सीटीसी) या व्यापारी संकुलाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासाठी 60 ते 70 फूट खोल मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात इमारतीचा पाया व बेसमेंटचे काम सुरू होते. मंगळवारी सकाळी या ठिकाणी 5 हून अधिक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक आमदार रोड लगतचा मुरुम ढासळला आणि तो थेट खाली काम करणाऱ्या मजुरांवर पडला. या…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून जबर मारहाण करत अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना आता ताजी असतांना आता संभाजीनगरमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील टेंडरच्या वादातून बांधकाम ठेकेदारासह त्याच्या मित्राचे अपहरण करत डांबून बेल्ट, रॉड, केबलने दहा ते पंधरा जणांनी विवस्त्र करत अमानुष मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.६) मध्यरात्री दोन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सुधाकरनगर भागात घडली आहे. या प्रकरणी पोलिस पुत्र शरद भावसिंग राठोड (वय-३३, रा. कुमावतनगर, देवळाई चौक, सातारा परिसर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून…
जळगाव : प्रतिनिधी प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई शुक्रवारी झाली होती. या प्रकरणी डॉ. जयवंत मोरे याला जि.प.तून निलंबित करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. पोलिसांकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ४ वाजता रंगेहात अटक केली होती. तक्रारदाराच्या शासकीय कामासाठी आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य…
जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेची धडक लागून ऋषीकेश आनंदा मिस्तरी (२५, रा. हरिविठ्ठलनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ७) शिरसोली ते जळगावदरम्यान घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, हरिविठ्ठलनगरातील ऋषीकेश मिस्तरी हा तरुण मजुरी काम करायचा. रविवारी शिरसोलीदरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर खंबा क्रमांक ४१६/४१४ जवळून जात असताना त्याला रेल्वेची धडक लागली व त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेथून जात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. या परिसरातील नागरिकांनी मयताची पटवली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक…
जळगाव : प्रतिनिधी भंगार विक्रेत्याकडून जप्त केलेल्या बनावट नोटा प्रकरणात या नोटांचे सिंडीकेट चालविणाऱ्या डॉ. प्रतिक सुरेश नवलखे (४३, रा. ब-हाणपूर, मध्यप्रदेश) याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली. त्याला ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉ. नवलखे हा पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या चेतन सावकारे याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून पाचशे रुपये दराच्या ९८ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी खंडवा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या मोहम्मद हकीम आमीन याची चौकशी केली असता, त्याने या बनावट नोटा मध्यप्रदेशात डॉ. प्रतिक नवलखे याच्याकडून घेतल्याचे सांगितले होते. बनावट नोटांचे सिंडीकेट चालविणारा प्रतिक…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील कुरंगी येथे घरच्या शेतात भर दुपारी विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. कुरंगी येथील ३२ वर्षीय विवाहित तरुण भूषण आनंदा पाटील हा नेहमीप्रमाणे कुरंगी गावाजवळीलच सोनटेक शेतशिवारातील त्याच्या स्वतःच्या शेतात आई-वडिलांसोबत मका पिकाच्या कामानिमित्त गेला होता. दुपारी विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी पोहोचला असता काठावर पाय घसरून मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार होय. भूषण पाटील हा विहीरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बऱ्याच वेळानंतर या घटनेबाबत ग्रामस्थांना माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे शिवारातील अहमदाबाद येथून अमरावती येथे गुटखा, सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या कंटेनरला पोलिस महानिरीक्षक यांचे पथक व पारोळा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सोमवारी पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरून गुटखा घेऊन कंटेनर जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नाशिक येथील पोलिस महानिरीक्षक यांचे पथक व पारोळा पोलिस दाखल झाले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास म्हसवे शिवारात कंटेनर आला असता पोलिसांनी कंटेनरला अडवून झाडाझडती घेतली असता पुढील भागात कंटेनरमध्ये प्लास्टिकच्या ताडपत्री, मागील बाजूस ५० ते ६० मोठ्या पिशव्यात सुगंधी तंबाखू, गुटखाजन्य पदार्थ ठेवल्याचे आढळून आले. याबाबत चालक भरत वीरसिंग…
रावेर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील विरोदा ते सीमेवरील पाडळे बु-अहिरवाडी या आंतरराज्य मार्गाने मध्य प्रदेशातून रावेरकडे गायी व त्यांच्या चार वासरांची अवैध वाहतूक करणारे लालमाती, ता. रावेर येथील मालवाहू वाहन रावेर पोलिसांनी पाडळे-अहिरवाडी रस्त्यावर पकडून १० गायींची सुटका केली. वाहन मालक व चालकासह तीन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ही घटना ६ एप्रिल रोजी दुपारी घडली. पोकॉ. श्रीकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत आरोपी वाहनमालक रामसिंग ऊर्फ भाया रायसिंग अजनारे व चालक आकाश शांताराम आवले (बारेला) (दोन्ही रा. लालमाती, ता. रावेर) व अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विशाल…
मेष राशी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. समाजात मान-सन्मान मिळू शकतो. सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठेची जाणीव ठेवा. राग टाळा. कोणतेही चुकीचे काम करू नका. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी विनाकारण वाद टाळा. वृषभ राशी खाजगी व्यवसायात गुंतलेल्या लोकांनी समस्यांवर शांततेने तोडगा काढावा. कोणतीही समस्या वाढू देऊ नका. अन्यथा तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. मिथुन राशी वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपाबाबत चर्चा होऊ शकते. आधीच प्रलंबित पैसे मिळू शकतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जुने व्यवहार करताना काळजी घ्या. कर्क राशी प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या कमतरतांकडे न पाहता चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. नातं गाढ होईल. कौटुंबिक समस्यांमुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढू…

