जळगाव : प्रतिनिधी समाजसेवा, आरोग्य आणि रक्तदान क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे मुकुंद गोसावी यांची रक्तदान जनजागृतीसाठी आरोग्य विभागाच्या ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. उन्हाळ्यात रक्तदानाचा तुटवडा भासतो, अशावेळी थॅलेसेमिया, हिमोपिलिया रुग्णांसह गर्भवती महिलांना सतत रक्ताची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर मुकुंद गोसावी यांनी ‘मिशन सिंदूर’ उपक्रमातून रक्त संकलन व प्रबोधन यामार्फत आरोग्य विभागाला मोठे योगदान दिले आहे. मुकुंद गोसावी यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक वेळा रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली असून, त्यांनी स्वतः रक्तदान शिबिरांचे आयोजनही केले आहे. शहरासह ग्रामीण भागातही रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे…
Author: editor desk
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी सध्या आग लागण्याच्या घटना घडत असतांना आता मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला लागलेल्या आगीने थैमान घातले. या आगीत आतापर्यंत 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही 5 ते 6 जण अडकले असावेत, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लगली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘सेंट्रल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधक असा वाद सुरु झाला असतांना नुकतेच खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदीर येथे पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याशिवाय या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांची देखील विशेष उपस्थिती होती. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे ही देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाबाबात केलेल्या विधानाचा त्यांचे नाव न घेता टोला लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय…
चाळीसगाव : प्रतिनिधी शांताबाई या फेसबुक अकाऊंटवर बदनामी केली व ३० हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी शांताबाई अकाऊंट धारकसह अन्य साथीदारांविरोधात १४ रोजी शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यात शांताबाई फेम रणजितकुमार सुदेशकुमार दराडे याला गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. यातील दोघे आरोपी फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणे येथील शिक्षक शेख अजिज शेख बशीर खाटीक यांच्या बाबतीतही शांताबाई या अकाऊंटवर बदनामीकारक पोस्ट केली होती व त्यानंतर आमच्याकडे तुमचे अजून व्हिडिओ असून आम्ही ते अपलोड करू अशी धमकी देऊन त्यांचेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली जात होती.…
जळगाव : प्रतिनिधी ‘मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!’ असे बहिणीला मोबाइलद्वारे कळवून हिरालाल नारायण चौधरी (५२, रा. विठ्ठलपेठ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कंपनीमध्ये कामाला असलेले हिलाराल चौधरी हे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह विठ्ठलपेठेत राहत होते. ते १४ मेपासून घरून निघून गेलेले होते. १५ मे रोजी त्यांनी त्यांच्या बहिणीशी संपर्क साधून ‘मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!’ असे कळविले होते. त्यानंतर १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात ते गळफास घेतलेल्या अवस्थेत…
भुसावळ : प्रतिनिधी कामायनी एक्स्प्रेसला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती भोपाळ रेल्वे पोलिस प्रशासनाने दुपारी १२:४८ वाजता प्रसारित केली. दरम्यान, खंडवा स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसला पोहोचताच तत्काळ खबरदारी घेत, सुरक्षा यंत्रणांनी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तासभर कसून तपासणी केली. सविस्तर वृत्त असे कि, यादरम्यान, आरपीएफ, जीआरपी, सिव्हिल पोलिस, डॉग स्क्वॉड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामायनी एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांची कसून तपासणी करण्यात आली. आयपीएफ खांडवा स्वतः घटनास्थळी तपासणीसाठी उपस्थित होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्लॅटफॉर्म परिसर पूर्णपणे बंद करून आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. श्वान पथक आणि पोलिस पथकाने कसून तपासणी केल्यानंतर, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. खात्री…
चोपडा : प्रतिनिधी शेतातील कडब्याला आग लागून या आगीत पंडित डोमन रायसिंग (६५) या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अनवर्दे खुर्द, ता. चोपडा येथे शनिवारी दुपारी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, शेतकरी पंडित रायसिंग हे शनिवारी सकाळी हातेड शिवारातील आपल्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शेतातील कडब्याला अचानक आग लागली. ते धुराच्या व आगीच्या तडाख्यात सापडल्याने होरपळून जमिनीवर कोसळले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पंडित हे दुपारपर्यंत घरी आले नाहीत. त्यामुळे घरातील मुले त्यांना बघायला शेतात गेली असता ते जळालेल्या व मयत स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच भाऊबंदांनी शेताकडे धाव घेत मृतदेह घरी…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, गुंतवणुकीसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. घरात बदल या विषयावरही महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुलांना काही विशेष यश मिळू शकते. कुटुंबासोबत मनोरंजन आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्येही वेळ घालवला जाईल. आळशीपणामुळे तुम्ही कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू शकता, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. शहाणपणाने आणि सावधगिरीने वागण्याची वेळ आली आहे. कामाच्या क्षेत्रात अडकलेले काम आता वेग घेईल. घराचे वातावरण आनंददायी असेल. आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवण्यासाठी काही नियोजन कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला मनःशांती आणि तुमच्या आत ऊर्जा भरलेली जाणवेल. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी,…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील बेलसवाडी गावाजवळ मजूर घेऊन जात असलेला आयशर ट्रक उलटून झालेल्या अपघातात सुमारे १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका आयशर ट्रकमधून मजूर रावेरच्या दिशेने जात होते. बेलसवाडी गावाजवळ अचानक ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक उलटून पडला. यात सुमारे १५ स्त्री-पुरूष जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे जखमींमध्ये काही बालकांचा देखील समावेश आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जेसीबीच्या मदतीने आयशर ट्रक हलविण्यात आला होता. तर या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून नुकतेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला. या घटनेचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भारताने ज्या प्रकारे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते. तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये देखील केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, जसे आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले…

