मेष राशी नोकरीत स्थान बदलण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कला आणि अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना कठोर संघर्ष करावा लागेल. राजकारणात गुंतलेल्या लोकांना एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि संगत मिळेल. वृषभ राशी आज प्रेमसंबंधांमधील अडथळे कमी होतील. इतरांच्या फसवणुकीत अडकू नका. काळजीपूर्वक विचार करून आणि तुमच्या बुद्धीचा वापर करून निर्णय घ्या. प्रेमविवाहाची योजना आखणाऱ्यांनी घाई करू नये. विवाहाशी संबंधित कामात येणारे अडथळे दूर होतील. मिथुन राशी आज वडिलांसोबत वाद होऊ शकतो. नको असलेल्या प्रवासाला जावे लागू शकते. आज कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, नाहीतर पस्तावाल. कर्क राशी जवळपास पूर्ण होत आलेल्या कामात अडथळे येतील. लपलेले शत्रू गुप्त…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. या यशाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह हजारो चाळीसगावकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आम्ही सर्व एक असल्याचा संदेश दिला. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व माजी सैनिकांचा चाळीसगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर तिरंगा यात्रेत चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला.…
पुणे : वृत्तसंस्था देशात यंदाचा मान्सून वेळीआधीच दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला असून २७ मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. १ जून ते ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. यातच आता राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात यंदा मे महिन्याच्या मध्यात हवामानात मोठा बदल दिसून आला. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार…
मुंबई: वृत्तसंस्था राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असतांना दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून आता ‘बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने सर्वांना सावध राहण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. 2020 मध्ये आलेल्या कोविड-19 महामारीने जगभरात हजारो लोकांचा बळी घेतला. सध्या पुन्हा एकदा कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिल्पा शिरोडकर यांचा पॉझिटिव्ह अहवाल चिंतेचा विषय ठरला आहे. त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी “ना झुके हैं, ना बिके हैं, ना टूटे हैं, हम बाळासाहेब के चेले हैं, खुलकर लड़े हैं और खुलकर जिए हैं !” या जोशपूर्ण शायरीने सुरुवात करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या संवाद मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जनतेच्या हृदयाशी जोडलेली आहे. शिवसेना म्हणजे चळवळ, शिवसेना म्हणजे जनतेच्या मनातील ताकद.” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना आगामी नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आवाहन…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतान संभाजीनगर येथील नातेवाईकांना भेटून लातूरकडे निघालेल्या भरधाव कारवरील चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या खाली जाऊन चार पाच पलट्या खाल्या. या दुर्घटनेत कारमधील माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. त्यात चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने छ. संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयात दाखाल केले आहे. ही दुर्घटना धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव दर्गा (ता.अंबड) जवळील सौंदलगाव फाट्यानजीक आज (दि.१९) सकाळी नऊ च्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, रोहिणी अमर चव्हाण (वय ३२) आणि नुरवी चव्हाण (वय २) या मायलेकीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील बिल्दी फाट्याजवळ बसने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, असलम शहा सलीम शहा (वय ३६, रा. रोहीण खेडा, बुलढाणा ह. मु. मुस्लिम मोहल्ला, किनगाव ता. यावल) हे १८ मे रोजी पाचोऱ्याहुन जळगावच्या दिशेने मोटरसायकलने जात असताना पाचोरा तालुक्यातील बिल्दी फाट्याजवळ जळगावकडुन पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या बसने असलम शहा यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात असलम शहा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना सातत्याने घडत असतान एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं समोर आलं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, कोणतीही जीवीतहानी झालेली नाहीये. आग लागल्याची घटना घडली त्यावेळी आमदार देखील विधानभवनातच होते. एकीकडे आज विधानभवनात विविध समित्यांच्या उद्घाटनाचा क्रार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली, अग्निशमन दालाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. घटनास्थळी धुराचे लोट…
जळगाव : प्रतिनिधी संसदेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार २०२५ यंदा जाहीर झाला असून, महाराष्ट्राने यामध्ये बाजी मारली आहे. राज्यातील सात खासदारांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा ज्या महाराष्ट्रातील खासदारांची निवड झाली आहे, त्यात पुढील नावे आहेत: • सुप्रिया सुळे • श्रीरंग बारणे • अरविंद सावंत • नरेश म्हस्के • स्मिता वाघ • मेधा कुलकर्णी • वर्षा गायकवाड तसेच इतर देशपातळीवरील नेत्यांमध्ये भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवर आधारित असून, प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी दिले जातात.…
उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या अधिक वाढतात. उन्हाची तीव्रता, घाम, प्रदूषण आणि दुर्लक्ष यामुळे डार्क स्पॉट्स, टॅनिंग, पिंपल्स, आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा वाढतो. अशावेळी बाजारात मिळणाऱ्या महागड्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा उपयोग करूनही फारसा फरक जाणवत नाही. पण नैसर्गिक उपाय म्हणजे घरगुती उटणं हे डार्क स्पॉट्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया अशाच ५ घरगुती उटणांबद्दल जे तुम्ही घरी सहज तयार करू शकता. १. हळद आणि बेसन उबटन साहित्य: ३ चमचे बेसन अर्धा चमचा हळद गुलाबपाणी (ऑयली स्किनसाठी) / दूध (ड्राय स्किनसाठी) कसं वापरावं: सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर १५-२० मिनिटं लावा. हे उबटन पिगमेंटेशन आणि डार्क…

