Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी शहरातील स्वस्तिक टॉकीज परिसरात भरधाव बसचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी दुचाकींना चिरडले असून या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमीवर उपजिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी रूग्णालयात धाव घेतली आणि मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरातील गजबजलेल्या भागात आज भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दोन दुचाकींना चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात आयोजित एका छोटेखानी सोहळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात पावसाचा कहर सुरु असतांना अवकाळीचा फेरा सुरूच असून सोमवारी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. निफाड तालुक्यात मौजे सुकेणे येथे वीज अंगावर पडून शेतकरी दिपक रंगनाथ रहाणे (40) ठार झाले तर नाशिक तालुक्यात जातेगाव येथे बारावर्षीय आदित्य राजाराम वळवे या मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. येवल्यात विवाहितेच्या अंगावर होडिंग पडल्याने गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातही अवकाळीने थैमान घातले. वादळवार्‍यांसह जोरदार पावसामुळे सप्तश्रृंगी गडाकडे जाणार्‍या रस्त्यावर दगड कोसळल्याने चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. चांदवडला पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. वडगाव पंगू येथे पोल्ट्री फार्मवर सोमवारी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (मंगळवार) मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावर चर्चेचं वर्तुळ होतं. अखेर अजित पवार गटाने अनुभवसंपन्न आणि ओबीसी समाजातील प्रभावशाली नेते असलेल्या भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असताना आता एक खळबळजनक घटन पुण्यातील वारजे माळवाडी भागातून समोर आली आहे. शिवसेनेच्या युवासेना (शिंदे) जिल्हाप्रमुखाच्या वाहनावार गोळीबार करण्यात आला आहे. निलेश राजेंद्र घारे असे जिल्हाप्रमुखाचे नाव असून, सोमवारी मध्यरात्री त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबाराच्या हल्ल्यात निलेश घारे यांना कुठल्याही स्वरुपाची हानी झालेली नाही, ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राजेंद्र घारे हे आपल्या घरी निघाले होते. दरम्यान, ते वारजे माळवाडी इथल्या गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. कार पार्क केल्यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण वाढले असतांना आता धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा लावून कारवाई करत एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३), असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार एक शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच लाख रुपये किमतीचे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाच्या चार लाख रुपयांच्या बिलाचा चेक मिळाल्यानंतर, तक्रारदार दुसऱ्या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जळगाव पोलिसांच्या मदतीने जेरबंद झाला आहे. अझहर निजाम खाटीक (रा. मेहरुण) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो गुन्हा घडल्यापासून फरार होता.  आरोपीच्या शोधासाठी सायबराबाद पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्यांनी जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आरोपीबाबत माहिती दिली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली. पोलिस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सूचना देऊन मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायबराबाद पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस फौजदार विजयसिंग पाटील व पोलिस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रवींद्रनगर भागातील रहिवासी वल्लभ सुभाषचंद्र अग्रवाल (५१) आणि म्हसावद येथील ओम जिनिंग अॅण्ड प्रेसिंगचे मालक अशोक रामकरण पोरवाल या दोन कापूस व्यापाऱ्यांची तब्बल १ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तराखंडमधील एका वस्त्रोद्योग कंपनीच्या संचालकांसह तिघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (दि. १८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वल्लभ अग्रवाल यांनी एमआयडीसी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार अग्रवाल यांची उमाळे येथे चिरायू कॉटन इंडस्ट्रीज नावाची जिनिंग फॅक्टरी आहे. ते दलालांमार्फत कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तीन वर्षापूर्वी ‘इंडियन कमोडिटीज डॉट कॉम’चे संचालक दिनेश हेगडे यांच्यामार्फत त्यांची ओळख…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील खिर्डी येथील शेती शिवारात निंभोरा पोलिसांनी दोन गावठी पिस्तुलासह एकास अटक केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीचे नाव अनिल रामलाल बारेला असे आहे. सविस्तर वृत्त असे कि, खिर्डी खुर्द शिवारात शेतकरी निळकंठ पुंडलिक बढे यांच्या मालकीच्या शेतातील घराजवळ एक व्यक्ती दहशत माजविण्याच्या उद्देश्याने दोन गावठी पिस्तूल बाळगून असल्याची माहिती निंभोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत झडती घेतली असता दोन गावठी पिस्तूल मॅक्झिनसह मिळून आले.  ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभय ढाकणे, हवालदार योगेश चौधरी, पो. ना. सुरेश पवार, अमोल…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील कुन्हे पानाचे गावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. बंद घरातून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी दरवाजा उघडताच संदीप वसंत पाटील (४०) या ट्रक चालकाचा मृतदेह घरात आढळला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संदीपची पत्नी माहेरी निघून गेल्याने सध्या तो एकटाच राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. याबाबत संदीप पाटील याचे काका एकनाथ पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसात माहिती दिली. शुक्रवारी बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने एकनाथ पाटील व त्यांचा मुलगा गजानन पाटील यांनी जावून पाहिल्यावर संदीपने साडीने गळफास घेतल्याचे दिसले. संदीपच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मृतदेह…

Read More