रावेर : प्रतिनिधी गेल्या 26 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी रावेर तालुक्यातील झुरखेडे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.15) रोजी तापी नदीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शांततेत आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. जलसमाधी आंदोलनात शंभरहून अधिक शेतकरी, महिलांचा मोठा सहभाग होता, तर काही वयोवृद्ध नागरिकांनीही उपस्थिती लावली. हातात फलक घेऊन नदी पात्रात उतरलेल्या ग्रामस्थांनी “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली. दरम्यान, आंदोलनादरम्यान चार नागरिकांना भोवळ आल्याने क्षणभर तणाव निर्माण झाला. त्यापैकी एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, 26 वर्षांपूर्वी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटासोबत शरद पवार यांचा गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शरद पवार आमच्यासोबत आले असते तर देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही पवारांचे स्वागतच आहे. खासदार पवारआणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रच होते, आजही एकत्र आहेत. अजित पवारांचे म्हणणे एकच होतेकी शिवसेना तुम्हाला चालते तरभाजप का चालत नाही? तेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांद्या लावूनदेशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीआले असते तर देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. अजूनही वेळ गेलेली नाही शरद पवार व अजित पवार एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा मिळत…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील सानेनगर परिसरात लग्नाच्या दोनच दिवस आधी एका तरुणीने गळफास आत्महत्या घेऊन केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, दीपाली सुभाष पाटील (वय २२) या तरुणीने १५ मे रोजी पहाटे ३:४० वाजता स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपालीचा विवाह गडखांब येथील एका तरुणाशी १७ मे रोजी ठरलेला होता. त्यानिमित्त १५ तारखेला तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १४ तारखेला रात्री तिच्या घरी संगीताचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दीपालीने स्वतः नृत्यही केले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच पहाटे अचानक ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दीपालीची आई पहाटे उठल्यावर…
चाळीसगाव : प्रतिनिधी शांताबाई या फेसबुक अकाउंटवर बदनामी केली व ३० हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी शांताबाई अकाउंटधारकासह दोघे व अन्य साथीदारांविरोधात १४ मे रोजी चाळीसगाव शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शेख अजीज शेख बशीर खाटीक यांच्या फिर्यादीवरून १४ मे रोजी शांताबाई अकाउंटधारक रणजितकुमार सुदेश दरोडे व मुराद पटेल (दोघे रा. चाळीसगाव) व इम्रान शेख (रा. मेहुणबारे) यांच्या व इतर साथीदारांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘शांताबाई’ या नावाने फेसबुक अकाउंटवर समाजातील प्रतिष्ठित लोकांची बदनामी व त्यांच्यावर चिखलफेक केली जात होती. हिंगोणे येथील माध्यमिक शिक्षक शेख अजिज शेख…
जळगाव : प्रतिनिधी तुकारामवाडी परिसरात खुनाच्या रागातून गुंडांच्या एका टोळक्याने हैदोस घातल्याची घटना गुरुवारी पहाटे २:३० वाजेच्या घडली. तुकारामवाडी व सम्राट कॉलनीतील तीन घरांवर सशस्त्र हल्ला चढवला. लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर करत मालमत्तेचे नुकसान केले. घरात घुसून महिलांना अश्लील शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही जणांना ताब्यात घेतले आहे. शारदा ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा आकाश व टिनू गोसावी यांच्यात चार ते पाच वर्षापासून सुरेश ओतारी यांच्या खुनाच्या रागातून वाद सुरू आहे. याच रागातून टिनू गोसावी आणि त्याच्या साथीदारांनी पहाटे त्यांच्या घरावर हल्ला केला.…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील काझी प्लॉट भागातील रहिवासी इकबाल पिंजारी व फरीद पिंजारी यांच्या घरातील लग्न कार्य असल्याने वन्हाड हे गुरुवारी बुलढाण्याकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील टीव्ही फ्रीज, इलेक्ट्रिक समान आणि इतर साहित्य जळून सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, पिंजारी यांच्या परिवारातील रजार या तरुणाचे लग्नकार्य असल्यामुळे सकाळी आठ वाजता वन्हाड बुलढाण्याकडे निघाले. यानंतर काही वेळातच त्यांच्या घरामध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीचा धूर पसरल्याने सभोवतालच्या नागरिकांनी त्वरित मदत कार्य केले. ही माहिती शेजारी राहणाऱ्या नाजीम याने पिंजारी यांना दिली. दरम्यान, पापा मेंबर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घरात…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज वेळ अनुकूल आहे. आपल्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन केल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता . रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्नाचे स्रोत वाढतील तसाच खर्चही वाढेल. वैयक्तिक गोष्टींमध्ये बाहेरच्यांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. मार्केटिंगकडे अधिक लक्ष द्या. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, जवळच्या नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. जोखमीच्या गोष्टींमध्ये रस असेल तर यश मिळेल. अहंकार व आत्मविश्वासावर ताबा ठेवा. आपली ऊर्जा सकारात्मक मार्गाने वापरा. व्यवसायात थोडासा मंदीचा काळ येऊ शकतो. पती-पत्नीचे संबंध अधिक घनिष्ठ होतील. सांधेदुखीची जुनी…
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन नाच केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एका लग्नाच्या वरातीत घडली असून, आमदार खरात हातात तलवार घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ खरात यांच्यासह अनिल गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी लग्नाच्या मिरवणुकीत हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब उघडकीस आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात हे एका लग्नाच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीसाठी लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली होती तर विरोधकांकडून बहिणींना २१०० रुपये मिळावे याची मागणी करीत असतांना आता लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला असून तब्बल अडीच हजारांहून अधिक बनावट खाती आढळली आहेत. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातमधील असून तो सध्या फरार आहे. दरम्यान, याप्रकरणानंतर राज्याचा महिला विकास विभाग खडबडून जागा झाला आहे. दीड कोटी केसरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना सोडून एक कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा हवेत विरून गेली.…
अमळनेर : प्रतिनिधी भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणारी रेल्वे मार्गावरील मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना १५ रोजी प्रताप महाविद्यालयाजवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून रेल्वे चे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. डब्बे खाली पडल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवासी रेल्वेच्या प्रवाश्यांचे हाल होणार आहेत. स्टेशन पासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्ती कामाला सुरुवात केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नेमका अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

