Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर देशासह राज्यातील प्रमुख शहरे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल. मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेसला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू झाला आहे. असे सांगितले जात आहे की ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या दगडी बँकेची नोकर भरती प्रक्रिया ऑफलाइनची औपचारिकता सुरू झाली आहे. कंपनीच्या चर्चेसाठी व काही डीलिंग साठी जिल्हा बँकेतील प्रमुखासह चार्जेस चार ज्येष्ठ संचालकांनी दिल्लीत जाऊन संबंधित कंपनीशी चर्चा केली आहे. त्यानंतर कागदावर आकडेमोड सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात रेट देखील अंतर्गत फुटलेला आहे. पुन्हा जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुणांची गर्दी दगडी बँकेच्या पुढार्‍यांच्या दारात उभी झाली आहे. दगडी बँकेत अंतर्गत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये देखील खुली ऑफर सर्व संचालकांना दिली गेली त्यामुळे अंतर्गत आर्थिक गुदगुल्या अनेकांना फुटले आहे. जे सहा महिन्यापूर्वी एकमेकांचे खडे फोडत होते आता मात्र ते गळ्यात गड्या घालून दिल्ली वारी करून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था नैऋृत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (१५ मे) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली असून, त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराच्या काही भागासह, संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असल्याने पावसाच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी तर जोरदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तुरुंगात लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून जोरदार वादंग सुरु झाले असतांना आज या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. “संजय राऊत हे पाकिस्तान सारखे आहेत, गुन्हे करायचे आणि ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळायचं,” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेप्रमुख राज ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. तुरुंगात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी एक तरी फोन करायला पाहिजे होता, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लग्नाचे अमिष दाखवित २० वर्षीय तरुणीवर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरामधील हॉटेलमध्ये नेत अत्याचार करण्यात आला. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी दि. १५ मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सनी प्रमोद उमक (वय २४, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका भागात राहणारी २० वर्षीय तरुणीची हरीविठ्ठल नगरमधील सनी उमक याच्याशी ओळख झाली. त्यानंतर तरुणाने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतर मात्र तरुणाने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. तरुणाकडून आश्वासन दिल्यानंतर…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी घरगुती वापरासाठी असलेले ३५ गॅस सिलिंडर अवैधरीत्या विक्रीसाठी नेत असलेल्या वाहनावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. १६ मे रोजी सकाळी १० वाजता तरवाडे शिवारात मालवाहू वाहन (एमएच १९ सीवाय ०४६०) या वाहनातून हे सिलिंडर मिळाले. यासंदर्भात सविस्तर अहवाल तहसीलदार व एचपीसीएलच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या कारवाईमुळे गॅसच्या काळाबाजारप्रश्नी खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पो.हे.कॉ. ओंकार सुतार व गोवर्धन बोरसे यांनी ही कारवाई केली. गाडी थांबवून तपासणी केली असता एच.पी. गॅस कंपनीचे ३५ सीलबंद आणि १ रिकामा सिलिंडर आढळून आला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव बसने चारचाकी वाहनाला कट मारल्याने अपघात होऊन चारचाकीतील प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (१५ मे) जळगाव ते भुसावळ रस्त्यावर झाला. सदर बसचालकाने अंमली पदार्थ सेवन केल्याचे आढळून आल्याने वाहकालाच बस मुक्ताईनगरपर्यंत न्यावी लागली. याप्रकरणी बसचालक विजय शिवाजी पाटील (रा. खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबादजवळ चारचाकी वाहनाला जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या बसवरील (क्र. एमएच ०६ एस ८५३४) चालक विजय पाटील याने वाहनाला कट मारला. यात वाहनाचे नुकसान होण्यासह प्रवासीही जखमी झाले. हे प्रकरण नशिराबाद पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे अपघातग्रस्त चारचाकी वाहनाच्या चालकाने नुकसान भरपाईची मागणी केली. बस वाहकाने जळगाव…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील बसस्थानकावरुन सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स लांबविणाऱ्या महिलांच्या टोळीला पोलिसांनी काही वेळातच अटक केली. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी सरलाबाई जिजाबराव पाटील आणि त्यांचे पती जिजाबराव पाटील हे १५ रोजी दुपारी बाराच्या दरम्यान मुक्ताईनगर बसस्थानकात येऊन कुन्हा बसमध्ये चढत असताना गर्दीमध्ये पाच ते सहा अनोळखी महिला चढण्यासाठी धक्काबुक्की करत होत्या. त्यांपैकी एकीने सरलाबाईजवळील पर्समधील सोन्याचे दागिने पर्ससह लंपास केले. हे लक्षात येईपर्यंत त्या पाच-सहा महिला बसस्थानकातून पसार झाल्या होत्या. चोरी झाल्याने सरलाबाई रडू लागल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी प्रमोद सौंदळे हे पोहोचले व झालेला प्रकार त्यांनी सौंदळे यांना सांगितला. सौंदाळे यांनी तत्परता दाखवत भ्रमणध्वनीवरून पोलिस…

Read More

मेष राशी आज अचानक एखादा लांबचा प्रवास किंवा परदेश प्रवास घडू शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाद वाढू शकतात. धार्मिक कार्यांवरील श्रद्धा कमी होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खडतर जाऊ शकतो. वृषभ राशी आज तुम्हाला नोकरीत बढती तर होईलच पण महत्त्वाची जबाबदारी मिळेल. व्यवसायात नवीन सहकारी फायदेशीर ठरतील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला व्यवसायाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल मिथुन राशी आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबात प्रेम आणि जवळीक वाढेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. तब्येतीची चांगली काळजी घ्या. कर्क राशी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी जळगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. नागरिकांनी सुमारे 70 फूट लांबीचा तिरंगा ध्वज हातात घेत नेहरू चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढली. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर राष्ट्रगीताने यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, राधेश्याम चौधरी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.…

Read More