Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : कामायनी एक्स्प्रेसला बॉम्बने उडवण्याची धमकी !
    क्राईम

    मोठी बातमी : कामायनी एक्स्प्रेसला बॉम्बने उडवण्याची धमकी !

    editor deskBy editor deskMay 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    कामायनी एक्स्प्रेसला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती भोपाळ रेल्वे पोलिस प्रशासनाने दुपारी १२:४८ वाजता प्रसारित केली. दरम्यान, खंडवा स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसला पोहोचताच तत्काळ खबरदारी घेत, सुरक्षा यंत्रणांनी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तासभर कसून तपासणी केली.

    सविस्तर वृत्त असे कि, यादरम्यान, आरपीएफ, जीआरपी, सिव्हिल पोलिस, डॉग स्क्वॉड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामायनी एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांची कसून तपासणी करण्यात आली. आयपीएफ खांडवा स्वतः घटनास्थळी तपासणीसाठी उपस्थित होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्लॅटफॉर्म परिसर पूर्णपणे बंद करून आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. श्वान पथक आणि पोलिस पथकाने कसून तपासणी केल्यानंतर, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. खात्री झाल्यानंतर ही गाडी सुरक्षित असल्याची घोषित करण्यात आली.  धमकी देणाऱ्या कॉल्सचा सोर्स मोबाइल नंबर ट्रॅक करण्यात आला आहे. यानंतर १:५३ वाजता खंडवा स्थानकावरून ट्रेन सुरक्षितपणे रवाना झाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.