जळगाव : प्रतिनिधी पारोळानजीक एप्रिल २००९ मध्ये झालेल्या सावित्री फटाका कारखान्यातील स्फोटात २४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पारोळा येथील दोन माजी नगराध्यक्षांसह तीन जणांना दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सहा जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या खटल्यात ३८ साक्षीदार फितूर झाले आहेत. अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी सोमवार दि.२८ रोजी हा निकाल दिला. माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, त्यांचा भाऊ चंद्रकात एकनाथ शिरोळे, चंद्रकांत यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे या तीन जणांचा शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा-अमळनेर रस्त्यावरील सावित्री फायर वर्क्स फॅक्टरीत १० एप्रिल २००९ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास…
Author: editor desk
मेष राशी श्री गणेश म्हणतात की, सकारात्मक राहण्यासाठी काही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवा. तुम्ही घरातील देखभाल आणि साफसफाईच्या कामांमध्ये देखील व्यस्त राहू शकता. विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील. हा वेळ आत्मचिंतन घालवा. यामुळे तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोणत्याही अशुभ सूचना मिळाल्याने मनामध्ये अशांतता आणि ताण येऊ शकतो. व्यावसायिक कामे सामान्य राहतील. वृषभ राशी श्री गणेश म्हणतात की, कोणत्याही सकारात्मक कार्याबद्दल एखाद्या व्यक्तीसोबत विचारांची देवाणघेवाण होते. यामुळे तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. भविष्यात उत्पन्नाचे साधन देखील मिळू शकते. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असेल.…
धरणगाव : प्रतिनिधी ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र म्हणजे आपुलकी, माया, जिव्हाळा असलेली जागा आहे. जेष्ठाच संघर्षमय आणि प्रेममय आयुष्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या अनुभवाचं, आशीर्वादाचं मोल अनमोल आहे. तुमच्या प्रत्येक सुरकतीत संघर्षाची, जिद्दीची, प्रेमाची कथा दडलेली आहे. आज तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने फुलण्यासाठी एक सुंदर विरंगुळा मिळावा, यासाठी आम्ही हे विरंगुळा केंद्र उभारले आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बचत गटांची जिद्द, धरणगावच्या विकासाचा आधारस्तंभ असून महिलांच्या बचत गटांसाठी व्यापारी संकुल करीता 2 कोटींचा निधी मंजूर केला असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लखपती दीदी होण्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण करून विरंगुळा केंद्राची चाबी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. आता भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध नवीन कारवाई केली आहे. केंद्र सरकारने कारवाई करत अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे, भारतीय युट्यूब वापरकर्त्यांसाठी शोएब अख्तर, आरजू काझमी आणि सय्यद मुझम्मिल शाह यांसारख्या पाकिस्तानी चॅनेलचा प्रवेश मर्यादित करण्यात आला आहे. भारत सरकारने केलेल्या कारवाईनंतर, यूट्यूबवर पाकिस्तानी चॅनेल शोधताना, “राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारी आदेशांमुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही” असा मजकूर असलेला एक पेज दिसतो. सरकारी काढून टाकण्याच्या विनंत्यांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया गुगल पारदर्शकता अहवाल (transparencyreport.google.com) ला भेट द्या.” यासोबतच काही पाकिस्तानी…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील भाविकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया आज औपचारिकपणे सुरू झाली. चाल उत्सव विग्रह डोलीमध्ये विराजमान असलेली भगवान केदारनाथची पंचमुखी भोग मूर्ती उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातून धामाकडे रवाना झाली आहे. डोली यात्रा श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात सुरू झाली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. परंपरेनुसार, कपदोद्घटनाची प्रक्रिया केदारनाथचे रक्षक मानले जाणारे भगवान भैरवनाथ यांच्या विशेष प्रार्थना आणि पूजेने सुरू झाली. संध्याकाळी ७ वाजता ओंकारेश्वर मंदिराच्या गर्भगृहात भगवान केदारनाथ आणि भगवान ओंकारेश्वर यांची पूजा आणि आरती करण्यात आली. रविवारी…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील बोर घाटात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार पिंटू बोडोले (वय 30) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ऋतिक बोडोले यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने संपूर्ण रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय 28) आणि दोन मुले -ऋतिक (वय३) व आठ महिन्यांचा टेंगुराम – यांच्यासह भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. रविवार (दि.27) रोजी रात्रीच्या सुमारास बोर घाटात, खेरगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या थार जीपने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की…
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही घटना रविवार रात्री 10 वाजून 30 ते 11 च्या सुमारास घडली. अपघातानंतर महामारगावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरकठोरा शेत शिवारात डोंगरदे वस्तीच्या मागील शेतात केळीच्या पिकास पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला मात्र, प्रसंगवधान राखत शेतकऱ्यांने बिबट्याच्या तोंडावर माती फेकली व जोर जोरात आरडा ओरड केल्याने बिबट्या तेथुन पळाला, तर या बिबटयांने एक बकरी फस्त केलेली दिसुन आली आहे. बिबट्या सह एक त्याचे पिल्लू देखील सोबत असल्याने शेतकऱ्याने सांगीतले आहे. या घटनेनंतर डोंगरकठोरा परिसरात भिती पसरली असुन वनविभागास माहिती देण्यात आली आहे. वन विभागाकडून या शेत शिवारात विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांची गस्त सह टूप कॅमेरे लावण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरकठोरा ता. यावल येथील शेतकरी मनोहर बळीराम पाटील हे गुरूवारी नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नरडाणा येथे अमळनेर मार्गे जातांना गलवाडे रस्त्यावर तीन जण मोटरसायकलवर येवून रस्त्यात ट्रक अडवून ट्रक ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याकडून १ हजार रुपये हिसकावले आणि मालकाकडून एक लाख रुपये मागितल्याची घटना दि.२७रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर घडली. सविस्तर वृत्त असे कि, अनिल अश्रूबा विलग रा. कोनोसी ता. शिवगाव जि. अहिल्यानगर हा अहिल्यानगर येथील स्वप्नील झिने यांचा हायवा ट्रक क्रमांक एम.एच. १६, सी.ई.४७९७ मध्ये भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे अमळनेर मार्गे जातांना गलवाडे रस्त्यावर तीन जण मोटरसायकलवर आले आणि त्यांनी मोटरसायकल पुढे लावून ट्रक अडवला. एक जण केबिनमध्ये चढून म्हणाला की, मी कैलास…
जळगाव : प्रतिनिधी माझ्याने आता सहन होत नाही जानू असे वाक्य लिहून तरुणीसोबतचा फोटो इन्टाग्रामवर स्टोरी ठेवत सतिष बाविस्कर (वय २२) या तरुणाने आत्महत्या केली. हा तरुण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता, त्याच नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात त्याने जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील आशाबाबा नगरात राहणारे रामचंद्र पाटील हे नूतन मराठा महाविद्यालयात प्लंबिंग काम करण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. महाविद्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृहाजवळ एका चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक जण दिसला. त्यांनी लागलीच घटनेची माहिती महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला दिली. घटना समजाच अनेकांनी…

