Author: editor desk

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा समस्या वाढू शकते. विरोधकांच्या कारस्थानांपासून दूर राहा. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अधिक मेहनत घेतली तर परिस्थिती सुधारेल. वृषभ राशी आज व्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आधीच सुरू असलेल्या समस्या कमी होतील. मालमत्ता खरेदी करण्याची योजना होऊ शकते. मिथुन राशी आज प्रेमसंबंधांमध्ये भावनिक ओढ वाढेल. ताण टाळण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवा. प्रेमसंबंधात रागावर नियंत्रण ठेवा. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात परस्पर आनंद आणि सुसंवाद वाढेल. कर्क राशी आज आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या असतील. ताप, डोकेदुखी,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज मोठे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? याकडे लक्ष लागले असताना आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी 2100 रुपये देण्याबाबत मोठे विधान केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांत खुश असल्याचेही ते म्हणालेत. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. महायुती सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता राज्याचे राजकारण तापले आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश आहे. आजवर केंद्र शासनाकडून काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे. दहशतवादी घटना संपुष्टात आल्या आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र शासनाचे सर्व दावे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पोकळे ठरले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला तेथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती याचे आश्चर्य वाटते. याचा अर्थ आपली यंत्रणा किती गाफील आहे हे स्पष्ट होते. पहलगाम दहशतवादी हल्ला विषयावर राजकारण न करता…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार असतांना शिंदेंचे आ.संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतापले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाडच्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला. मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिकाऱ्यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरीत मध्यरात्री दीड वाजता राम विश्वास बोरसे (वय २६) या रिक्षा चालकाच्या घरावर २५ रोजी मध्यरात्री दीड वाजता तीन जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली. दिनेश भारत चौधरी, सागर जाधव व नागपुरे या तिघांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, राम बोरसे हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. २५ रोजी रात्री वडील विश्वास बोरसे, बहीण व भाचे असे घरात झोपलेले असताना दीड वाजेच्या सुमारास दिनेश चौधरी व त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांनी घराच्या पोर्चमध्ये येऊन लोखंडी दरवाजावर गोळीबार केला. या आवाजाने विश्वास बोरसे उठले असता, तिघांनी भिंतीवरून…

Read More

चोपडा : प्रतिनिधी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवरच सीआरपीएफच्या निवृत्त जवानाने गोळी झाडून तिचा खून केला. या गोळीबारात जावईही गंभीर जखमी झाला. तर, घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला. गोळीबाराची ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉ आंबेडकर नगरात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर लोकांनी या निवृत्त जवानाला मारहाण केली. यात तोही गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तृप्ती अविनाश वाघ (२४) असे मृत कन्येचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (२८, दोघे रा. करवंद, शिरपूर, ह. मु. कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी सासरा किरण अर्जुन मंगले (४८, रा.…

Read More

मेष राशी रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा प्रकरण नंतर पोलिसांपर्यंत पोहोचू शकते. काही मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची भीती असेल. व्यवसायात, एखादा विश्वासू व्यक्ती तुम्हाला फसवू शकतो. तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीपासून दूर जावे लागू शकते. तुम्हाला एक नको असलेला प्रवास करावा लागेल. वृषभ राशी आज व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च होतील. जास्त नफा मिळविण्याच्या प्रयत्नात, एखाद्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. मिथुन राशी प्रेमसंबंधात विश्वासघात झाल्यामुळे आज तुमचे मन धक्कादायक असेल. कुटुंबात अनावश्यक संघर्ष होण्याची शक्यता आहे. मारामारीमुळे हिंसाचार होऊ शकतो. आणि तुम्हाला मायग्रेन देखील होऊ शकतो.…

Read More

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसापूर्वी शेतक-यांनी पीकविमा योजनेत चुना लावला या विधानाचा शेवटी ‘परतीचा चुनाच’ झाला, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौ-यावर आले आणि त्यांच्या विधानाच्या विरोधात शेतकरी संघटनांचा स्फोट झाला. या सगळ्या घटनेमुळे पवारांच्या परभणी दौ-याला राजकीय वादळाचा रंग आला. त्याचवेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी ‘दादांचे विधान म्हणजे जखमेवर मीठ नाही, तर चुना चोळणे आहे’ असा घणाघाती शाब्दिक हल्ला चढवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस, महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे, ‘ताफ्यावर प्रतिकात्मक चुना फेकून’, त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.…

Read More

 मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोशल मिडिया एक्सवर एक पोस्ट केली आहे. “वेळ आलीये, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी” अशा आशयाची पोस्ट शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली असून सध्या ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. शिवसेनेची पोस्ट चर्चेत…! वेळ आलीयं, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी! प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय, कमेंटसचा पाऊस या पोस्टद्वारे शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांना पुन्हा साद घातली असल्याची चर्चा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी “शासकीय कार्यालय हे लोकांना आपल्याला न्याय मिळेल, अशी भावना असलेलं ठिकाण असतं. जिथे येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्याला निराशा येणार नाही, असे उत्तम काम अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या हातून व्हावं,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात उत्तम काम करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या कार्याचा विशेष गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल विभागासाठी तयार केलेला १० दिवसांचा कृती आराखडा हे केवळ घोषणापत्र नसून, शिवकालीन सुशासनाच्या तत्त्वांवर आधारित एक आधुनिक धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आराखड्यात शेतरस्त्यांच्या अडथळ्यांचं निवारण, जिवंत नोंदींचे अद्ययावतीकरण, थकबाकी वसुली, ‘हर घर…

Read More