जळगाव : प्रतिनिधी भरधाव ट्रकने दुचाकीजवळ उभे असलेले श्रीपाद प्रभाकर कुलकर्णी (५४, रा. अमळनेर) यांना धडक दिली. त्यात त्यांचा डावा चिरडला जाऊन गंभीर जखमी झाले. हा अपघात दि. ९ एप्रिल रोजी आकाशवाणी चौकात झाला होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील श्रीपाद कुलकर्णी हे आकाशवाणी चौकात दुचाकीजवळ उभे होते. त्या वेळी भुसावळकडून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच १८, एपी २९६७) कुलकर्णी यांचा डावा पाय चिरडला गेला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकों उषा सोनवणे करीत आहेत.
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात गस्त सुरु असतांना चाळीसगाव पोलिसांनी मालेगाव चौफुलीवरुन जात असलेल्या वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना २० लाख ६९ हजार रुपये किंमतीचा ४२ किलो ५८३ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी मालेगावच्या कार चालकाला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून घटनेच्या तपासासाठी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अरूण बाविस्कर, पोलीस कर्मचारी राहूल सोनवणे, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर पाटोळे, दीपक चौधरी हे बुधवारी सकाळच्या सुमारास गस्त घालीत होते. यावेळी त्यांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मालेगाव रस्त्यावर धुळे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलात असताना कोणाशी संपर्कात असावे, याचे भान न ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना निलंबित करण्यात आले. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. निलंबन काळात या प्रकरणाची चौकशी भुसावळ विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. इग्स प्रकरणात फरार असलेल्या संशयितांशी २५२ वेळा संपर्कात असल्याच्या कारणावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना पोलिस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची जळगाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. ड्रग्स प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. मात्र पोलिस दलात काम करीत असताना कोणाशी…
मेष राशी श्री गणेश म्हणतात की, ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. एखाद्या खास व्यक्तीचा पाठिंबा मिळाल्याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप मजबूत वाटेल. तरुण त्यांच्या कठोर परिश्रम आणि योग्यतेने ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील. कौटुंबिक वादामुळे भावंडांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. एकमेकांशी असलेल्या नात्यातील अंतर वाढू नये याची काळजी घ्या. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार काम करा. कार्यक्षेत्रातील सध्याची परिस्थिती तशीच राहील. वृषभ राशी श्री गणेश म्हणतात की, तुम्हाला फोन किंवा ईमेलद्वारे काही विशेष माहिती मिळेल जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने आणि क्षमतेने प्रत्येक आव्हान स्वीकाराल. महिलांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव असेल. भावनिकतेऐवजी, तुमच्या स्वभावात व्यावहारिक आणि थोड्याशा स्वार्थी भावना आणा. ओळखीच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असतानाच बुधवारी केंद्रीय कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक पार पडाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीमध्ये ज्या नागरिकांचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला, त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना बैठकीत घेण्यात आलेल्या…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था सासरी नांदत असताना होत असलेला शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने विवाहित तरुणीने आत्महत्येचा पर्याय निवडत आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 26) नगर तालुक्यातील देहरे येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील देहरे येथील पूनम विशाल लांडगे (वय 28) या विवाहितेने शनिवारी सकाळी 10च्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली आहे. पूनम हिचा विवाह 3 वर्षांपूर्वी देहरे येथील विशाल रावसाहेब लांडगे या लष्करी जवानासोबत झाला होता. तिला एक दीड वर्षाची लहान मुलगी आहे. तिच्या आत्महत्येनंतर तिचे वडील गोविंद गंगाधर पठारे (वय 53, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली होती, या सरकारसाठी हि योजना गेमचेंजर ठरली होती. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा होतात. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 करू असं आश्वासनं महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं. आता राज्यात महायुती सरकार आलं असून, शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढवलेलं नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या असून महायुती सरकारच्या विरोधात अहिल्यानगरमधील श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. महायुती सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बाभळे येथील गट नंबर ५९ मधील शेतात दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी अंदाजे ९:३० वाजता आग लागली. या आगीत ईश्वर विठोबा महाजन आणि लक्ष्मण विठोबा माळी या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. विद्युत तारेमुळे ठिणगी पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत ईश्वर विठोबा महाजन यांच्या दोन हेक्टर क्षेत्रातील ठिबक सिंचनासह चारा आणि जमा करायचा बाकी असलेला मका कणीस जळून खाक झाला, ज्याची अंदाजित किंमत तीन लाख रुपये आहे. तर, लक्ष्मण विठोबा माळी यांच्या दोन हेक्टर बावीस आर क्षेत्रातील ठिबक सिंचनाची पाईपलाईन पूर्णपणे खराब…
कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही, परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज एका अधिकाऱ्याने वर्तवला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम आणि पोलिस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीची घटना रात्री ८:१५ वाजता ऋतुराज हॉटेलच्या परिसरात घडली. चौदा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक लोकांनी इमारतीच्या खिडक्यांमधून आणि बाल्कनीतून उड्या मारून जीव वाचवला, असे पोलीस आयुक्त वर्मा यांनी सांगितले. कोलकाता…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मीनाताई ठाकरे संकुल भागात २४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराबाबत रामानंदनगर पोलिसांनी सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी मीनाताई ठाकरे संकुल भागात महेंद्र समाधान सपकाळे (२०, रा. पिंप्राळा) हा मित्र भूषण अहिरे याचा वाढदिवस साजरा करत असताना आरोपींनी गोळीबार केला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात सहा संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल भिका कोळी (पिस्तूलसह), अक्षय ऊर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धीरज ऊर्फ वैभव ऊर्फ गोलू कोळी, सागर अरुण भोई ऊर्फ…

