वरणगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अचानक संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयाला पत्नीने विरोध केला असता संतप्त होऊन शिक्षकाने तिला मारहाण केली. पत्नीने वरणगाव पोलिसात पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. सोनाली गोसावी यांनी दिल्या माहिती नुसार वृत्त असे की, भीमराव गोसावी हे दर्यापूर प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाद झाला. त्यानंतर त्यांनी दि. १६ रोजी पत्नीवर हल्ला केला आणि ते फरार झाले. त्याबाबत पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दाखल केली होती. दोन दिवसांनी गोसावी हे वरणगाव पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी घर सोडून मंदिरात राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जिल्हाभरातील सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा पोलिस दलाकडून सोमवारी सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० वाजेदरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अनेक अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. दारूबंदी, जुगार, गांजा सेवन करणाऱ्या १०१ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी दारूबंदीच्या ५६ केसेस दाखल केल्या, तर सट्टा जुगाराच्या २९ प्रकरणांचा पर्दाफाश केला. यासोबतच, अंमली पदार्थ विरोधी कारवाईत (एनडीपीएस) १६ जणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट (एनबीडब्ल्यू) बजावणीत पोलिसांनी मोठी यश मिळवले असून ४१ वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांकडून जिल्हाभरात नाकाबंदी देखील लावली…
अक्षय तृतीयेच्या दिवशी काय म्हणते तुमचे राशिभविष्य ? मेष राशी श्री गणेश म्हणतात की, काम जास्त असले तरी तुम्ही घर आणि कुटुंबाच्या आनंदासाठी वेळ काढाल. घराच्या देखभालीशी संबंधित काही कामे होतील. यावेळी तुमच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या योजना सुरू करा. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. कारण त्यांचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. न्यूनगंडाची भावना देखील राहू शकते. एखाद्याशी संवाद साधताना योग्य शब्द वापरा. कामाच्या ठिकाणी कोणतेही कागदपत्रे किंवा ऑर्डर पूर्ण करताना योग्य ती काळजी घ्या. वृषभ राशी श्री गणेश म्हणतात की, घरात खूप दिवसांनी पाहुणे आल्याने आनंदी वातावरण असेल. तसेच कोणताही कौटुंबिक वाद मिटेल. मुलाच्या कोणत्याही सकारात्मक कृती तुम्हाला दिलासा देतील. तुमच्या…
मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने एक रुपयात पीकविमा योजना सुरू करण्यात आली होती मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने नवीन पिक विमा योजना जाहीर केली आहे. सुधारित पद्धतीने पिक विमा योजना लागू करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बरोबरच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी स्वातंत्र्य योजना देखील मंत्रिमंडळाने मंजूर केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. पिक विमा योजनेमध्ये ज्या पद्धतीने घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीच्या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर त्या संदर्भात कारवाई…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये ६ महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला आहे. या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मोठं आर्थसहाय्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील ६ जणांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र…
सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय रुग्णालयातील डॉ. वैशंपायन शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टराने हॉस्टेलच्या रूममध्ये जीवन संपवल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. आदित्य नामबियर असे जीवन संपवलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयातील हॉस्टेल परिसरात शहर पोलिसांनी धाव घेतली. सदर घटनास्थळावर रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठी गर्दी केली आहे. जीवन संपवल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी शिकाऊ डॉक्टराचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आला आहे. मृत आदित्य यांनी जीवन का संपवले याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात शरद पवार पक्षाला मोठे धक्के बसत असतांना आता जळगाव जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे २ मे रोजी, तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी होणाऱ्या एका बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. गुलाबराव देवकर यांच्यासोबत दोन माजी आमदार, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका यांच्यासह अनेक मोठे पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या संभाव्य राजकीय बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून खुनाच्या घटना समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथून समोर आली आहे. पत्नीस नांदवण्यास पाठवण्याच्या वादातून जावयाने धारदार शस्त्राने हल्ला करुन सास-याचा खून केल्याची घटना घडली. वडिलांचा वाचवण्याचा प्रयत्न करणा-या मेहुण्यासह सासूवरही हल्ला केल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवार, २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आरोपी मंगेश देविदास सलगर (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, कोळेगाव) याने पोलिस हेल्पलाईन ११२ वर कॉल करुन मदत मागितल्याचा प्रकारही समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक बापूराव मासाळ (२४) यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी मंगेश सलगर (३५,…
जळगाव : प्रतिनिधी निंभोराहून येथून जळगावकडे येणाऱ्या बसला महामार्गावरुन समोरुन येणाऱ्या ट्रकने कट मारला. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली. बसमध्ये साधारण ४० ते ५० प्रवासी होते, मात्र सुदैवाने बसमधील कोणाला काहीही दुखापत झाली नाही. ही घटना दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास आहुजा नगर ते द्वारकागनर स्टॉपदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथून (एमएच २०, बीई २४२१) क्रमांकाची बस प्रवासी घेवून जळगावकडे येत होती. महामार्गावरुन येत असतांना आहुजा नगर ते द्वारकानगर स्टॉपच्या दरम्यान, समोरुन ओव्हरटेक ट्रक येत होता. त्या ट्रकने बसला कट मारल्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला उतरली.…
जळगाव : प्रतिनिधी पारोळा तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नात्याला काळिमा लागल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सख्या मेव्हण्याने शालकाच्या नावे असलेली विमा पॉलिसी व दिलेल्या स्कुटीचा अपघातात विम्याचा लाभ मिळवण्यासाठी फागणे येथील शालकास पारोळा हद्दीत ठार मारून त्याचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना देऊन बनवाबनवी केली होती. याप्रकरणी मेव्हण्यासह त्याच्या एका साथीदारास पोलिसांनी सखोल माहितीच्या आधारे २७ रोजी ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पारोळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याबाबत उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रारंभी १७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मयत समाधान शिवाजी पाटील (वय २६) याचा पारोळा हद्दीत अपघात झाल्याची नोंद धुळे…

