मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील मंत्री नितेश राणे यांनी आता जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्यानंतर शुक्रवारी केलेल्या एक वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. “हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचा धर्म विचारला पाहिजे” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. “दुकानदाराला हनूमान चालीसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका” पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरात एका जनसभेला संबोधित करताना नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं. “त्यांनी मारण्याआधी आपला धर्म विचारला. म्हणून हिंदुंनी सुद्धा काही विकत…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी घरगुती वापराच्या सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून तो गॅस खासगी वाहनात भरण्याचा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील खुल्या जागेत घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १७ रोजी रात्री ७:४५ वाजता घटनास्थळी छापा टाकला असता त्यांना वाहनात इलेक्ट्रिक पंपाद्वारे घरगुती सिलिंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी धनंजय प्रभाकर पाटील (४८, श्रीकृष्ण कॉलनी) आणि अमोल सुभाष बोरसे (३७, धार, ता. अमळनेर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळून १ लाख ५० हजार रुपयांची चारचाकी,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाल्मीक नगर भागात इलेक्ट्रिक फॅन दुरुस्ती करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने महेश राजेंद्र तायडे (वय २५, रा. वाल्मीक नगर, पक्की चाळ) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक नगर परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरातील लाईट गेली होती. त्यावेळी महेश तायडे हा घरातील फॅन दुरुस्ती करत होता. अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी त्याला तत्काळ जीएमसीत दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मयत घोषित केले.
जळगाव : प्रतिनिधी शिरसोली रस्त्यावरील लाकडापासून ठोकळे बनविणाऱ्या सनी ट्रेडर्स या कंपनीला शुक्रवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कंपनीत लाकडी भुसा, कोरडे लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याने, काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीमध्ये कंपनीतील लाकडी ठोकळे, उभे असलेले ट्रॅक्टर आणि इतर साहित्य जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच मनपा अग्निशमन विभागाचे बंब, जैन कंपनीचे बंब घटनास्थळावर पोहोचले. कोरड्या लाकडामुळे आग वाढतच जात होती. त्यात हवेचाही वेग असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन विभागाच्या जवानांनाही मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. या आगीत कंपनीतील लाकडी ठोकळे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत आठ…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील गांधलीपुरा येथील सिद्धार्थ चौक परिसरात धीरज सुनील देवरे हा १६ रोजी रात्री व्यायाम करून दुचाकीने घरी जात असताना साहिलने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. बाजूला उभे असलेले त्याचे मित्र अल्तमश, आकीब, अदनान यांनीही लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १६ रोजी नातेवा-इकांचे…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ येथे ड्युटीला जाणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्याच्या दुचाकीला मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता तरसोदलगतच्या महामार्गाजवळ घडली. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे कि, दिलीप पुना बारी (वय ४५, मूळ रा. शिरसोली, सध्या वास्तव्य रायसोनीनगर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते गुरुवारी सकाळी ९:३० वाजता भुसावळ येथे ड्युटीवर जाण्यासाठी निघाले. तरसोदजवळ मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत बारी हे रस्त्यालगत पडले, त्यात त्यांच्या हाताला व डोक्यालाही जबर मार लागला. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक तपासणी करून, खासगी रुग्णालयात हलविण्यात…
मेष राशी आज तुमचे धाडस आणि शौर्य वाढेल. सुरक्षा क्षेत्रात लोकांना लक्षणीय यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक होईल. व्यवसायात कठोर परिश्रम केल्यानंतर तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. काही अपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. लाडक्या मैत्रीणीची भेट होईल. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. खूप पैसे खर्च करून काही अतिशय महत्त्वाचे काम पूर्ण करता येते. ज्यामुळे भविष्यात आर्थिक फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्ती आणि मालमत्तेसंबंधीचा वाद वरिष्ठ नातेवाईकाच्या मध्यस्थीने सोडवता येईल. मिथुन राशी कोणत्याही प्रेम प्रस्तावावर योग्य विचार करूनच तुम्ही कृती करावी. अधीरतेने आणि घाईघाईने वागणे तुमच्यासाठी हानिकारक…
मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरातील बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याचा उद्धवसेनेच्या वतीने आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करीत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आले. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासह हा हल्ला रोखण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलक उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. पाकिस्तानी ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित दहशतवादी संघटना ‘टीआरएफ’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा निषेध केला जात आहे. शालिमार चौकात झालेल्या आंदोलनात पाकच्या ध्वजाची होळी करीत ‘देश के इन गद्दारोंको गोली मारो सालों को’, ‘राजीनामा द्या आमित शहा राजीनामा द्या’ यासह पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.…
नागपूर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी निषेध केला. हल्लेखोरांनी लोकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हिंदू कधीही असे कृत्य करणार नाहीत ही लढाई धर्म विरूद्ध अधर्म यातील आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले. पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या 83 व्या स्मृतिदिनानिमित्त विलेपार्ले येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, “सध्या जी लढाई सुरू आहे ती लढाई धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. लोकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आले. हिंदू असा प्रकार कधीच करणार नाहीत. हे आपल्या संस्कृतीत…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची सूचना केली. यामुळे सरकारी बाबूंमध्ये एकच खळबळ माजली आहे. सरकारी काम आणि त्याला लागणारा वेळ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सरकारी काम अन् महिनाभर थांब ही म्हण आपल्या व्यवस्थेतील ढिलाई आणि नोकरशाहीच्या जटिलतेचे प्रतीक मानले जाते. सरकारी कार्यालयात एखादे काम करायचे म्हणजे कागदपत्रांची जुळवाजुळव, अधिकाऱ्यांच्या बैठका, आणि नियमांचे पालन यातच बराच वेळ निघून जातो. सामान्य माणसाला या प्रक्रियेचा मोठा त्रास होतो. सरकार डिजिटलायझेशन आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून काही सुधारणा करत आहे. पण तरीही वरील म्हणीचा वारंवार प्रत्यय येत…

