• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बोलोरो आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जागीच ठार !

editor desk by editor desk
April 28, 2025
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
बोलोरो आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जागीच ठार !

भंडारा  : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही घटना रविवार रात्री 10 वाजून 30 ते 11 च्या सुमारास घडली. अपघातानंतर महामारगावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. अशोक फुलचंद डेहरवाल, शैलेंद्र लेखाराम बघेले, शैलेश पन्नालाल गोकुळपुरे, मुकेश बिंजेवार या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अविनाश नाकतोडे जखमी आहे. घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलिस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.

Previous Post

यावल तालुक्यात बिबट्याने केला बकरीवर हल्ला : शेतकरी थोडक्यात बचावला !

Next Post

बोर घाटात दुचाकीचा भीषण अपघात : वडिलांसह मुलाचा दुर्देवी मृत्यू !

Next Post
बोर घाटात दुचाकीचा भीषण अपघात : वडिलांसह मुलाचा दुर्देवी मृत्यू !

बोर घाटात दुचाकीचा भीषण अपघात : वडिलांसह मुलाचा दुर्देवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group