Author: editor desk

अमरावती : वृत्तसंस्था गेल्या ७ दिवसापासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गत 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर (एआय-171) विमान अपघातातील मृतांची संख्या 274 वर पोहोचली आहे. लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळलेल्या या विमानात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, तर उर्वरित 33 मृत्यू स्थानिक रहिवाशांचे आहेत. मृतांमध्ये बीजे मेडिकल कॉलेज कॅम्पस परिसरातील 10 डॉक्टर, त्यांचे नातेवाईक, वैद्यकीय विद्यार्थी, कर्मचारी आणि मेघनीनगरमधील रहिवासी आहेत. शुक्रवारी (13 जून 2025) रात्रीपर्यंत चाललेल्या बचाव मोहिमेत 100 हून अधिक कामगार आणि 40 अभियंत्यांनी विमानाचा ढिगारा हटवला. यावेळी ब्लॅक बॉक्स बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी मेसच्या छतावर सापडला, ज्यामुळे अपघाताच्या कारणांचा तपास सुलभ होईल. तपास अधिकाऱ्यांनी 319 मृतदेहांचे अवयव…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा दल) जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. गणेश बापू दैवत (वय ३१, रा. माहीजी, ता. पाचोरा) हे नियमित वॉकिंगदरम्यान मैदानावर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ११ जून २०२५ रोजी गणेश दैवत यांनी ड्युटी पूर्ण करून सायंकाळी मैदानावर फिरण्यासाठी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते मैदानावरच कोसळले. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली होती. पावसातही उठत नसल्याचे पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळ जाऊन पाहणी केली. गणेश यांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी यावल रोडवरील हॉटेल तृभावी मालकाला मारहाण करून खंडणी मागत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन लंपास केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध दि.१२ मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे सविस्तर वृत्त असे कि, यावल रोडवर हॉटेल तृभावीचे मालक किशोर पूनमचंद आईदासानी (वय ४६) यांना दि. १० रोजी दुपारी ४ ते वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी शेख आरीफ शेख कलीम, गोपी साळी, मुजाहिद उर्फ मज्जू डॉन, शाहरुख शेख कलीम व त्याच्यासोबतचा राहणारा पप्पू सर्व (रा. फैजपूर) यांनी बिलाचे पैसे न देता मारहाण केली आणि प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खंडणी मागितली. गळ्यातील १ लाख ८० रुपये किमतीची दोन तोळ्याची…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी नगरपालिकेच्या बालवाडी परिसरात बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शहरातील आगाखान वाडा, शिवाजी नगर येथे एका युवकाला मारहाण करण्यात आली. यानंतर हल्लेखोरांनी युवकाच्या घरात घुसून कुटुंबीयांनाही बेदम मारहाण करत तोडफोड केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गुलाम मोहम्मद शेख बिस्मिल्ला (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. ११ जून रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते घराजवळील नगरपालिकेच्या बालवाडीसमोर बसले होते. त्यावेळी अहमद इब्राहीम कुरेशी, सुलताना बी अहमद कुरेशी आणि साहील मुशीर शेख हे तेथे आले आणि वाद घातला. याला उत्तर दिल्यावर तिघांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी शहरातील येथील छत्रपती शिवाजीनगर व रेणुकानगरला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावरील पुलावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अयुब खान रशीद खान (वय ६५) यांचा मृत्यू झाला. पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, देवा संतोष गुमळकर (रा. वरणगाव, ता. भुसावळ) हा एम.एच. ३७, एच. ९११९ या दुचाकीने लखन सुरेश बाविस्कर, यश मनोज चावरीया, रोहित मुकेशतरु शाह या चौघा मित्रांसह भरधाव वेगाने जात होता. त्याने समोरून येणाऱ्या एम.एच. १९ ई. एम. ७५२९ या दुचाकीला धडक त्याच दुचाकी चालक आयुब खान रशिद खान (रा. साई पार्क वरणगाव), आणि त्यांचे मागे बसलेले…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील तासखेडा येथे विजेचा धक्का बसून पित्यासह लेकीचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना तासखेडा (ता. रावेर) येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजता घडली. समाधान अशोक कोळी (३६) आणि त्यांची मुलगी मानवी कोळी (११) अशी या मृतांची नावे आहेत. समाधान यांच्या वडिलांनाही सुरुवातीला विजेचा धक्का बसला होता, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, समाधान यांचे वडील अशोक माधव कोळी हे घरात कापडे टांगण्यासाठी बांधलेल्या तारेवरील रुमाल घेण्यासाठी गेले असता त्या तारेत वीज प्रवाह उतरला होता. रुमालाला स्पर्श होताच तार तुटली आणि ते बाजूला फेकले गेले. हा प्रकार पाहताच समाधान व मानवी हे त्यांना उचलण्यासाठी…

Read More

मेष राशी नोकरीच्या शोधात तुम्हाला घराबाहेर जावे लागू शकते. व्यवसायात अचानक समस्या वाढू शकतात. तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांचा विश्वास कायम ठेवा. बेकरीच्या कामात गुंतलेल्या लोकांना चांगला नफा मिळेल. वृषभ राशी आज दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातम्यांनी होईल. कला, लेखन, अभिनय या क्षेत्राशी संबंधित लोकांना जनतेकडून प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळेल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या जवळीकतेचा फायदा तुम्हाला मिळेल. जुने वाद मिटतील. मिथुन राशी नोकरीत चांगल्या कामामुळे तुम्हाला आदर मिळेल. राजकारणात काही महत्त्वाची जबाबदारी लोकांना मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळेल. कामासाठी दुसऱ्या ठिकाणी बदली होऊ शकते. कर्क राशी गायनात रस वाढेल. तुमच्या शहाणपणामुळे व्यवसायात मोठी समस्या टळेल. एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून तुमची…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हातले येथे  आज दिनांक 13 जुन 2025 रोजी सामाजिक सभागृह, हातले येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार चव्हाण यांनी विविध प्रशासकीय विभागांनी शासकीय योजनांची माहिती देणे,लाभार्थ्यांना थेट लाभ देणे यासाठी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली व उपस्थित अधिकारी – कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करण्याच्या सूचना दिल्या. समाधान शिबिरे आयोजित करण्यामागची शासनाची भूमिका स्पष्ट करत, शासनाने लोकाभिमुख राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेली ही शिबिरे म्हणजे शासन,प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक ट्विस्ट आला. यावर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास भाजपला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही असे भाजपने ठरवल्याचे या भेटीगाठीवरून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. “ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाचे आम्ही स्वागत केले होते. कुटुंब एकत्र येणार असेल तर त्याला आमचे समर्थन होते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट राजकीय होती की वैयक्तिक होती याची माहिती आपल्याला नाही. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणे…

Read More